कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्ह्यातर्फे महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार

 


खालापूर /सुधीर माने :- जागतिक महिला दिनानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद, रायगड जिल्हा यांच्या वतीने पनवेल येथे आयोजित जिल्हा बैठकीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील विविध शाखांमधील महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात खोपोली शाखेतील पाच महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये खोपोली शाखेच्या माजी अध्यक्षा रेखा कोरे, सदस्य निशा दळवी आणि भारती शहा यांचा सत्कार को.म.सा.प.चे जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी, महिला प्रमुख संध्या देवकर, कोमसाप पनवेलचे अध्यक्ष सुभाष कुडके तसेच विविध शाखांतील पदाधिकारी उपस्थित होते.

ज्या महिला काही कारणास्तव कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नाहीत, त्यांचा सत्कार खोपोली शाखेचे अध्यक्ष प्रकाश राजोपाध्ये यांच्या हस्ते खोपोली शाखेच्या बैठकीत करण्यात आला. यामध्ये माजी अध्यक्षा उज्वला ताई दिघे आणि सदस्य मधुमिता पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

तसेच कु. विश्वजित पोळ यांनी 10 किलोमीटर सायकल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल शाखेतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काही महिला सदस्यांचाही खोपोली शाखेतर्फे गौरव करण्यात आला.

यावेळी ज्यांचे वाढदिवस होते अशा सदस्यांना भेटवस्तू देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाला शाखेचे अध्यक्ष प्रकाश राजोपाध्ये, सेक्रेटरी नरेंद्र हर्डीकर, खजिनदार सुरेश चव्हाण, माजी अध्यक्षा उज्वला ताई दिघे, वामनराव दिघे तसेच इतर सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी