म्हाडा वकील पॅनल वरती अँड. संजय सावंत (पाटील) यांची निवड
पुणे /प्रतिनिधी :- गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, पुणे. म्हाडा करीता वकील पॅनल वर अँड. संजय दत्तात्रय सावंत यांची कायदेशीर सल्लागार पदी निवड करण्यात आलेली आहे.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, म्हाडा करीता महाराष्ट्रातील अनेक अनुभवी वकील यांच्याकडून जिल्हा व सत्र न्यायालय, इतर न्यायालय, जिल्हा व राज्य कंज्यूमर न्यायालय, सहकार न्यायालय, महसूल न्यायालय, प्रशासकीय न्यायाधिकरण न्यायालय, इतर कोणतेही न्यायालय, न्यायाधिकरण, प्राधिकरण संदर्भातील दावे चालविण्याकरिता जुलै आणि ऑगस्ट 2025 दरम्यान वकील पॅनल करीता जाहिरातीद्वारे निवेदन अर्ज मागविण्यात आलेले होते. यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये मुलाखती घेण्यात आलेल्या होत्या. त्यासंदर्भात नुकताच म्हाडा कडून निर्णय घेण्यात आला यामध्ये अँड. संजय दत्तात्रय सावंत यांची म्हाडा (MHADA) पुणे वकील पॅनल वर निवड करण्यात आली.
अँड संजय सावंत पाटील यांनी हे सध्या महावितरण, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक मर्यादित (पी.डी.सी.सी बँक), पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जगदंब सामाजिक प्रतिष्ठान, येसूबाई सामाजिक प्रतिष्ठान यावर "कायदेशीर सल्लागार" म्हणून कार्यरत आहेत.
शासकीय, निमशासकीय, कंपनी, राजकीय, सामाजिक अनेक संस्था, तसेच वकिली व्यवसायातील सर्व प्रकारच्या कामाचा अनुभवाची दखल घेऊन म्हाडाच्या सर्व वरिष्ठ अधिकारी साहेब यांनी मिळून अँड. संजय सावंत (पाटील) यांना गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, पुणे म्हाडा करीता कायदा (विधी) विभाग मध्ये वकील पॅनेल वरती कायदेशीर सल्लागार म्हणून निवड केलेली आहे. यासंदर्भात पुणे विभागाचे चिप ऑफिसर मा. श्री. राहुल साकोरे साहेब यांच्या अधिकृत स्वाक्षरीने पत्र देण्यात आलेले आहे. सदरील पत्र पुणे विभागाचे लिगल अँडव्हायजर अधिकारी असलेले मा. डॉ. तुषार जाधव साहेब यांच्या मार्फत आधिकृत पत्र देण्यात आलेले आहे, तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी म्हाडाचे सर्व अधिकारी, तसेच आधी मान्यवर अधिकारी उपस्थित होते.
म्हाडाच्या पॅनल अँडव्होकेट म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अँड. संजय दत्तात्रय सावंत (पाटील) यांनी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार मा. श्री. शिवाजीदादा आढळराव पाटील साहेब, पुणे विभागाचे चिप ऑफिसर मा. श्री. राहुल साकोरे साहेब, पुणे विभागाचे लिगल अँडव्हायजर अधिकारी असलेले मा. डॉ. तुषार जाधव साहेब आणि म्हाडा कार्यालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे विशेष जाहीर आभार व्यक्त केले.

Comments
Post a Comment