सामाजिक कार्यासाठी रेखा सखाराम जाधव यांना “महाराष्ट्र भूषण सन्मान”
खोपोली /प्रविण कोल्हे :- समाजासाठी केलेल्या छोट्याशा कार्याची दखल घेत रेखा सखाराम जाधव यांना “महाराष्ट्र भूषण सन्मान” प्रदान करण्यात आला आहे. समाजात सातत्याने सामाजिक कार्य करत असलेल्या रेखा जाधव यांच्या कामाची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला.
या सन्मानाबद्दल भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, समाजासाठी केलेल्या छोट्याशा कार्याला मिळालेला हा “महाराष्ट्र भूषण सन्मान” आयुष्यात कायम स्मरणात राहील. या सन्मानामुळे कृतज्ञता, अभिमान आणि पुढे आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
“महाराष्ट्र भूषण सन्मान” मिळाल्याचा आनंद शब्दांत सांगता येत नाही. हा सन्मान माझ्या कामासाठी नवी प्रेरणा असून समाजासाठी अधिक जोमाने काम करण्याची उर्जा देणारा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Comments
Post a Comment