खोपोलीत प्लास्टिक व स्टील वस्तूंचा महासेल : कोणतीही वस्तु फक्त १०० रुपयांत....
खालापूर / सुधीर माने :- खोपोली शहरातील महाराष्ट्र बँकेच्या मागे असलेल्या कमलाबेन हॉलमध्ये ६ मार्च ते १५ मार्च २०२६ या कालावधीत प्लास्टिक व स्टील वस्तूंचा महाधडाका सेल आयोजित करण्यात आला आहे. या सेलमध्ये विविध घरगुती उपयोगाच्या प्लास्टिक व स्टीलच्या वस्तू अवघ्या १०० रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या सेलचे आयोजक प्रकाश बिषणौई यांनी माहिती देताना सांगितले की, अशा प्रकारचे सेल आम्ही महाराष्ट्रातील विविध तालुक्यांमध्ये—उरण, पेण,वाशी, मुंबई आदी ठिकाणी नियमितपणे आयोजित करत असतो. खोपोली येथील नागरिकांसाठीही हा विशेष सेल ६ मार्चपासून सुरू करण्यात आला असून तो १५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
दररोज सकाळी १० ते रात्री १० या वेळेत हा सेल नागरिकांसाठी खुला राहणार आहे. विशेषतः गरीब व गरजू नागरिकांना कमी किमतीत चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले.
नागरिकांनी या महासेलला भेट देऊन खात्रीशीर व उपयोगी वस्तू केवळ १०० रुपयांत खरेदी करण्याची संधी साधावी, असे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment