उप अधीक्षक भूमी अभिलेख, खालापूर कार्यालयात विशेष मदत कक्ष सुरू

 


खालापूर कर्जत/सुधीर देशमुख – ऑनलाईन मोजणी अर्ज भरताना नागरिकांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन उप अधीक्षक भूमी अभिलेख, खालापूर कार्यालय येथे विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.


याबाबत माहिती देताना उप अधीक्षक श्री. प्रमोद जरग यांनी सांगितले की, खालापूर येथे ई-मोजणी व्हर्जन 2 या प्रणालीद्वारे मोजणी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, ऑनलाईन अर्ज भरताना अनेक नागरिकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.


मोजणी अर्जासोबत 7/12 उतारा किंवा मिळकत पत्रिका, बिनशेती मोजणीसाठी मंजूर रेखांकन आडाखडा, पोटहिस्सा मोजणीसाठी स्थानिक प्राधिकरणाकडून मंजूर रेखांकन, ओळखपत्र आदी कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच ऑनलाईन भरलेला अर्ज व चलन जनरेट करून ते अपलोड करण्याची प्रक्रिया अनेकांना क्लिष्ट वाटत आहे.


या पार्श्वभूमीवर नागरिकांना तातडीने आणि सुलभ सहकार्य मिळावे, यासाठी कार्यालयात विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आला असून, मोजणी अर्जाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी