7 वर्षीय नायरा मोहम्मद रफी शेख हिचा पहिला रोजा पुर्ण...

 

तब्ब्ल 13 तास उपवास ठेवत चिमुकलीने दाखवला 
श्रद्धा आणि संयमाचा आदर्श....

देगलूर/जावेद अहमद :- दि. १९ फेब्रुवारीपासून पवित्र Ramadan महिन्याला प्रारंभ झाला असून मुस्लिम बांधव या पवित्र महिन्यात रोजा (उपवास) ठेवून अल्लाहची उपासना करतात. आत्मशुद्धी, संयम, त्याग आणि दानधर्माचा संदेश देणारा हा महिना इस्लाम धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.


अटकळी येथील रहिवाशी व सध्या Mumbai येथे वास्तव्यास असलेल्या शाहीन मोहम्मद रफी शेख या Brihanmumbai Municipal Corporation (बृहन्मुंबई महानगरपालिका) मध्ये स्टाफ नर्स पदावर कार्यरत आहेत. त्यांची ७ वर्षीय चिमुकली नायरा मोहम्मद रफी शेख हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीरित्या पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.


तब्बल १३ तास अन्न व पाणी न घेता नायराने श्रद्धा, संयम आणि आत्मविश्वासाचे उत्तम उदाहरण घालून दिले. इतक्या लहान वयात पहिलाच रोजा पूर्ण केल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. रोजा पूर्ण झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिचे अभिनंदन करून तिला प्रोत्साहन दिले. नातेवाईकांनीही तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

नायराच्या या पहिल्या रोजामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्या या कृत्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. लहान वयात धार्मिक कर्तव्याची जाणीव ठेवून तिने दाखवलेला संयम इतर मुलांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.


रमजान महिन्यात रोजा ठेवण्यामागील उद्देश केवळ उपवास नसून आत्मसंयम, प्रार्थना आणि दानधर्माद्वारे आध्यात्मिक उन्नती साधणे हा आहे. नायरा मोहम्मद रफी शेख हिने पूर्ण केलेला हा पहिला रोजा तिच्या आयुष्यातील एक संस्मरणीय क्षण ठरला आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी