छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार 2026 जाहीर ....

 


खोपोली /सुधीर माने :- ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था, नाशिक यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार 2026 साठी खोपोली येथील लोककलावंत, अभिनेते व लावणी सम्राट श्री. सुरेश शहाजी साठे यांची निवड करण्यात आली आहे.

सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतो. या क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने श्री. सुरेश शहाजी साठे यांना यंदाचा हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

हा पुरस्कार सोहळा दि. २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता, रोटरी क्लब सभागृह, गंजमाळ, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे.

अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठवले आणि सचिव मा. मिलिंद काळवणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी