न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर गोविंद माने यांची ‘राजर्षी शाहू महाराज आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2026’साठी निवड

 

* लुंबिनी (नेपाळ) येथे होणाऱ्या 12 व्या राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय परिषदेत होणार सन्मान

खालापूर / मानसी कांबळे :- पत्रकारिता आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून सामाजिक समतेसाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल खालापूर तालुक्यातील वनवे गावचे सुपुत्र, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि साप्ताहिक खालापूर वार्ताचे मुख्य संपादक सुधीर गोविंद माने यांची ‘राजर्षी शाहू महाराज राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2026’साठी निवड करण्यात आली आहे. 'भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ (इंडिया)’तर्फे आयोजित 12 व्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

* सामाजिक समता व भारत-नेपाळ सौहार्दाचा विषय :- "भारत आणि नेपाळमधील सामाजिक समता व सामाजिक सलोखा” या विषयावर आधारित ही परिषद भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रकाशात आयोजित करण्यात आली आहे. प्रा. डॉं. गोरख जे. साठे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ (इंडिया) तसेच अन्य 12 संस्थांच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

* लुंबिनी (नेपाळ) येथे भव्य सोहळा :- ही प्रतिष्ठित परिषद 22 मार्च 2026 (रविवार) रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत नेपाळमधील लुंबिनी येथील ‘लुंबिनी वर्ल्ड पीस अँड हार्मनी व्हिजिटर सेंटर’ येथे पार पडणार आहे. देश-विदेशातील नामवंत प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

* पत्रकारिता आणि समाजकारणाचा संगम :- सुधीर गोविंद माने हे गरीब शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत पार्टटाईम काम करीत पदवी शिक्षण पूर्ण केले. 1992 साली अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर विविध कंपन्यांमध्ये काम करीत त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभारला. पत्रकारितेतून समाजजागृती करतांना त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. 'खालापूर वार्ता' या साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त गोरगरिबांना समाजोपयोगी वस्तूंचे वाटप करून सामाजिक कार्याला चालना दिली.

* पुरस्कारांचा मानाचा इतिहास :- त्यांच्या कार्याची दखल विविध स्तरांवर घेण्यात आली आहे. 2009 मध्ये रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाउंडेशनतर्फे ‘आदिवासी मित्र पुरस्कार’, आदर्श समाजसेवक पुरस्कार, आदर्श पत्रकार पुरस्कार (तहसील कार्यालय व नगरपंचायत), नाईक मराठा मंडळाकडून आदर्श पत्रकार सन्मान, इनरव्हील क्लब, महालक्ष्मी आधार फाउंडेशन, एबीजेएफ आदी संस्थांकडून गौरव...2024-25 साली महालक्ष्मी आधार फाउंडेशन सातारातर्फे ‘राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार’ मिळाला होता. खालापूर तालुक्यात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिन सातत्याने साजरा करणारे प्रमुख पदाधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

* सामाजिक समतेसाठी जागतिक व्यासपीठावर सन्मान :- सामाजिक समता, समाजजागृती आणि पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची ‘राजर्षी शाहू महाराज आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2026’साठी निवड करण्यात आली आहे. परिषद आयोजकांनी पाठविलेल्या निवड पत्रात त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढेल, असे नमूद करण्यात आले आहे. सुधीर माने यांच्या या यशाबद्दल न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन, साप्ताहीक खालापूर वार्ता, साप्ताहीक खालापूर वादळ, दैनिक कोकण प्रदेश न्यूज, माय कोकण न्यूज 24, KP NEWS परिवार, खालापूर तालुका, वनवे गाव तसेच रायगड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सामाजिक बांधिलकी, संघर्षमय वाटचाल आणि पत्रकारितेतील निष्ठा यांचा संगम असलेले सुधीर गोविंद माने यांचा हा सन्मान रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी