धनुष्यबाण निशाणीसमोरील बटण दाबून विजयी करा!

 


ज्ञानेश्वर गायकवाड यांचे मतदारांना आवाहन.....

▪️ रायगड जिल्हा परिषद गट क्र. 17 मधून महायुतीचे अधिकृत उमेदवार

▪️ शेतकरी, महिला सक्षमीकरण व आरोग्य प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार


खालापूर / मानसी कांबळे :- रायगड जिल्हा परिषद गट क्र. 17 मधून शिवसेना (शिंदे गट) महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून ज्ञानेश्वर गायकवाड यांनी निवडणूक प्रचाराला वेग दिला असून मतदारांना धनुष्यबाण या निशाणीसमोरील बटण दाबून विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


ज्ञानेश्वर गायकवाड हे कुंभिवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कामांची छाप पाडली आहे.


 विशेषतः बचत गटातील महिलांना गृहउद्योग, स्वयंरोजगार आणि विविध कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, ग्रामीण रोजगारनिर्मिती आणि स्वावलंबन यावर त्यांनी सातत्याने भर दिला आहे.




Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी