खोपोली नगर परिषदेत सभापतींचे खातेवाटप जाहीर

 


* नव्या सभापतींवर जबाबदाऱ्या सोपविल्या

* लोकाभिमुख व विकासाभिमुख कारभाराचा निर्धार

खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर नगर परिषदेमधील विविध सभापती विभागांचे खातेवाटप शुक्रवार, 23 जानेवारी 2026 रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. या खाते वाटपामुळे नगर परिषदेच्या कामकाजाला गती मिळणार असून शहराच्या विकासासाठी स्पष्ट जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.


खातेवाटपानुसार आरोग्य सभापती : मयुरी शेलार, बांधकाम सभापती : अनिल सानप, महिला व बालकल्याण सभापती : सुवर्णा संतोष मोरे, परिवहन सभापती : किशोर पाटील, नियोजन सभापती : प्रतिक्षा रेटरेकर, शिक्षण सभापती : अमित फाळे, पाणी पुरवठा सभापती : विक्रम साबळे यांची सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच स्थायी समिती सदस्यपदी विनायक तेलवणे, संदीप पाटील व हरीश काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


* जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार :- खाते वाटपानंतर सर्व सभापतींनी आपल्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांना पूर्णपणे न्याय देण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा, महिला व बालकल्याण तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे व पारदर्शक कारभार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


या प्रसंगी खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, मुख्याधिकारी पंकज पाटील, माजी नगराध्यक्ष तथा स्विकृत नगरसेवक डॉं. सुनील गोटीराम पाटील, नगरसेवक मंगेश दळवी, संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. खाते वाटपामुळे खोपोली नगर परिषदेच्या कारभाराला दिशा मिळाली असून शहराच्या विकासासाठी नव्या जोमाने काम सुरू होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.




Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी