Posts

Showing posts from January, 2026

शिळफाटा येथे श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव उत्साहात साजरा

Image
  * मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; समाजबांधवांचा मोठा सहभाग खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली शहरातील शिळफाटा येथे श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव अत्यंत उत्साहात व पारंपरिक भक्तिभावाने साजरा करण्यात आला. समाजातील एकात्मता, शिक्षण व कौशल्य विकासाला चालना देणाऱ्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून खोपोली नगर परिषद गटनेते संदिप पाटील, स्थायी समिती सदस्य व नगरसेवक हरीश काळे, नगरसेविका रुपाली जाधव, नगरसेविका रुखसाना जलगांवकर तसेच उद्योजक राजेश नागपुरे उपस्थित होते. मान्यवरांनी समाजाच्या प्रगतीत शिक्षण, कौशल्य आणि उद्योग यांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षणांपैकी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा विशेष ठरला. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पालक व उपस्थितांनी अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्री विश्वकर्मा भगवानांच्या प्रतिमेचे पूजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजोपयोग...

सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Image
  * महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा मान ; लोकभवन येथे साधेपणात शपथविधी मुंबई / मानसी कांबळे : - महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक महत्त्वाचा अध्याय जोडला गेला असून सुनेत्रा अजित पवार यांनी आज शुक्रवार, 31 जानेवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील लोकभवन येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, मंत्री, आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. शपथविधी सोहळा दुःखाच्या छायेत अत्यंत साधेपणाने पार पडला. समर्थकांना फुले, पुष्पगुच्छ न आणण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अजितदादांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीने दिवंगत अजितदादा पवार यांच्या जनसमर्पित कार्याचा वारसा पु...

अद्भुत नेतृत्वाचा ठायीचा विश्रांतीचा काळ सुरू झाला...

Image
     खालापुर कर्जत/सुधीर देशमुख :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि प्रभावशाली नेते अजित पवार यांचा आज विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याचा दुःखद वृत्त समोर आले आहे. राजकारणातील त्यांच्या दूरदृष्टी, प्रगल्भता आणि निर्भीड नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या लोकशाहीत त्यांनी स्वतःची वेगळी आणि ठळक ओळख निर्माण केली होती. कठीण निर्णय घेताना कधीच मागे हटणार नाही अशी त्यांची जिद्द लोकांना नेहमीच प्रेरणा देत आली. आज त्यांचा शून्य जेवढा भरुन निघणार नाही, तेवढाच हा समाजासाठी मोठा धक्का आहे. लोकहितासाठी त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांची निष्ठा आणि प्रामाणिक सेवा आणी सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी कायम तत्पर असणारा नेता हरपला आहे. प्रत्येक वेळी मुख्यमंत्री पद थोडक्यात नीसटुन ते उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत रहायचे,पण काम मुख्यमंत्री असल्यासारखेच करायचे,कारण ते नेहमी म्हणायचे मी कामाचाच माणुस आहे.करोना कालावधी मधे मंत्रालयात दिसणारा नेता,नेहमी कार्यकर्त्या साठी झटला.शेवटच्या क्षणी पण फाईली व अर्जाची पेपर सर्व ठिकाणी जमीनीवर पसरले होते . कर्तव्यनिष्ठा, निर्णयक्षमता आणि विकासाची दूरदृष्टी यांचा आदर...

धनुष्यबाण निशाणीसमोरील बटण दाबून विजयी करा!

Image
  ज्ञानेश्वर गायकवाड यांचे मतदारांना आवाहन..... ▪️ रायगड जिल्हा परिषद गट क्र. 17 मधून महायुतीचे अधिकृत उमेदवार ▪️ शेतकरी, महिला सक्षमीकरण व आरोग्य प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार खालापूर / मानसी कांबळे :- रायगड जिल्हा परिषद गट क्र. 17 मधून शिवसेना (शिंदे गट) महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून ज्ञानेश्वर गायकवाड यांनी निवडणूक प्रचाराला वेग दिला असून मतदारांना धनुष्यबाण या निशाणीसमोरील बटण दाबून विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ज्ञानेश्वर गायकवाड हे कुंभिवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कामांची छाप पाडली आहे.  विशेषतः बचत गटातील महिलांना गृहउद्योग, स्वयंरोजगार आणि विविध कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, ग्रामीण रोजगारनिर्मिती आणि स्वावलंबन यावर त्यांनी सातत्याने भर दिला आहे.

बारामतीवर आभाळ फाटलं!

Image
  भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन * राजकारणातील 'दादा' पर्वाचा करुण अंत ; महाराष्ट्राला मोठा धक्का बारामती, खोपोली, मुंबई, पुणे / मानसी कांबळे :- महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एका मोठ्या अध्यायाचा आज अकाली शेवट झाला. बारामती विमानतळावर सकाळी झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीकडे येत असताना हे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवर कोसळले. विमानाचे दोन तुकडे झाले आणि लगेचच आग लागली. या करुण घटनेने संपूर्ण महाराष्ट्र दुःखाच्या सागरात बुडाला आहे. * लँडिंगवेळी तांत्रिक बिघाड ; विमान धावपट्टीवरून घसरले :- मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार यांच्या विमानाने मुंबईहून बारामतीकडे प्रस्थान केले होते. सकाळी बारामती विमानतळावर लँडिंग करतांना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते धावपट्टीवरून बाजूला घसरले. विमानाच्या दोन भागांत विभागणी झाली आणि लगेचच आग लागली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला,...

अन्यायाविरुद्ध लेखणीचा वार करणारा निर्भीड युवा पत्रकार - नरेश शिवाजी जाधव

Image
  आज पत्रकार नरेश शिवाजी जाधव यांचा वाढदिवस. डशिंग व्यक्तिमत्त्व, स्पष्ट भूमिका, प्रामाणिक पत्रकारिता आणि अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे लेखणी उचलणारा आवाज अशी ओळख नरेश जाधव यांनी निर्माण केली आहे. कर्जत - खालापूर तालुका तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्यात एक अनुभवी, स्वाभिमानी आणि जनतेचा पत्रकार म्हणून त्यांचा लौकिक आहे. * सर्वसामान्यांचा आवाज बनलेली लेखणी :- गेल्या 8 ते 10 वर्षांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत नरेश जाधव यांनी शेतकरी, कामगार, आदिवासी, महिला, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक ज्वलंत समस्या सातत्याने मांडल्या. प्रशासनातील दिरंगाई, भ्रष्टाचार, अन्याय, दुर्लक्ष आणि लोकशाही मूल्यांवरील आघात याविरोधात त्यांनी भीडभाड न ठेवता लेखणी चालवली. त्यांच्या बातम्यांमुळे अनेक प्रकरणे चर्चेत आली, अनेकांना न्याय मिळाला, तर काही वेळा प्रशासनालाही कारवाई करावी लागली. * डशिंग पण संयमी, आक्रमक पण जबाबदार :- नरेश जाधव यांची पत्रकारिता केवळ बातमीपुरती मर्यादित नसून ती सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारी आहे. डशिंग शैली असली तरी तथ्यांशी तडजोड नाही, आक्रमक प्रश्न असले तरी जबाबदारीची जाणीव कायम,...

प्रजासत्ताक दिनाच्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे जुना महामार्ग 'हाऊसफुल्ल'

Image
  * खोपोलीत वाहतुकीचा प्रचंड खोळंबा * खंडाळा घाट चढणीत किलोमीटरचे जाम खोपोली / मानसी कांबळे :- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर (26 जानेवारी) सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांचा (24 ते 26 जानेवारी) वीकेंड आल्याने मुंबईकरांनी पर्यटनासाठी लोणावळा - खंडाळा - माथेरान या ठिकाणांकडे मोठ्या प्रमाणात धाव घेतली आहे. परिणामी, मुंबई-पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग (NH-4) आज शनिवारपासूनच 'हाऊसफुल्ल' झाला असून, खोपोली शहरात वाहतुकीचा पूर्ण चक्काजाम झाला आहे. खंडाळा घाटाच्या चढणीत आणि खोपोलीतील मुख्य रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, प्रवासाचा वेळ दुप्पट ते तिप्पट होत आहे. * खोपोलीत 'चक्काजाम'; शहराबाहेर पडणेही जिकिरीचे :- खंडाळा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या खोपोली शहरात परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. पुण्याकडे जाणाऱ्या पर्यटक वाहनांची संख्या इतकी प्रचंड आहे की, शहरातील मुख्य चौक, सिग्नल पॉइंट्स आणि महामार्गांवरील प्रवेशद्वारांवर वाहने थांबून राहिली आहेत. अनेक वाहनचालकांना खोपोली शहरातून बाहेर पडण्यासाठीच तासभरापेक्षा जास्त वेळ लागत आहे. घाटातील चढणीतही वाहनांच्या रांगा किल...

खोपोली नगर परिषदेत सभापतींचे खातेवाटप जाहीर

Image
  * नव्या सभापतींवर जबाबदाऱ्या सोपविल्या * लोकाभिमुख व विकासाभिमुख कारभाराचा निर्धार खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर नगर परिषदेमधील विविध सभापती विभागांचे खातेवाटप शुक्रवार, 23 जानेवारी 2026 रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. या खाते वाटपामुळे नगर परिषदेच्या कामकाजाला गती मिळणार असून शहराच्या विकासासाठी स्पष्ट जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. खातेवाटपानुसार आरोग्य सभापती : मयुरी शेलार, बांधकाम सभापती : अनिल सानप, महिला व बालकल्याण सभापती : सुवर्णा संतोष मोरे, परिवहन सभापती : किशोर पाटील, नियोजन सभापती : प्रतिक्षा रेटरेकर, शिक्षण सभापती : अमित फाळे, पाणी पुरवठा सभापती : विक्रम साबळे यांची सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच स्थायी समिती सदस्यपदी विनायक तेलवणे, संदीप पाटील व हरीश काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. * जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार :- खाते वाटपानंतर सर्व सभापतींनी आपल्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांना पूर्णपणे न्याय देण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा, महिला व बालकल्याण तसेच श...

नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या तत्परतेने प्रकाशनगरचा रस्ता प्रश्न मार्गी

Image
  * प्रशासकीय रिक्ततेतही नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पुढाकार ; सहा महिन्यांत डीपी रोड पूर्ण करण्याचे आश्वासन खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी पदभार स्विकारताच जनहिताच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेत आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवून दिली आहे. पंचायत समिती निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असल्याने आणि अनेक अधिकारी निवडणूक ड्युटीवर असल्यामुळे प्रशासनात रिक्ततेची स्थिती असतानाही, प्रभाग क्रमांक 3 मधील प्रकाशनगर येथील रस्त्याचा दीर्घकालीन प्रश्न लोकप्रतिनिधींच्या पुढाकारामुळे मार्गी लागला आहे. * नेमका वाद काय होता ? :- प्रभाग क्रमांक 3 मधील प्रकाशनगरकडे जाणारा सध्याचा रस्ता नगर परिषदेच्या अधिकृत विकास आराखड्यात (डीपी) समाविष्ट नसला, तरी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक याच मार्गाचा वापर करीत आहेत. संबंधित खाजगी जागा मालक शिवराज वरगणे यांनी त्यांच्या मालकीतील काही जागा आधीच मंजूर डीपी रोडसाठी नगर परिषदेला दिली आहे. मात्र उर्वरित जागेत बांधकाम सुरू केल्यामुळे नागरिक वापरत असलेला पर्यायी रस्ता बंद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे परिसरात ती...

आमदार महेंद्रशेठ थोरवे फाउंडेशन स्वामिनी महिला प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्षा सौ. कांचनताई जाधव यांच्या संकल्पनेतुन महिलांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न.....

Image
  खोपोली /मानसी कांबळे :- आमदार महेंद्रशेठ थोरवे फाउंडेशन स्वामिनी महिला प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्षा सौ. कांचनताई जाधव यांच्या संकल्पनेतुन स्वराज्य जननी थोर राजमाता जिजाऊ तसेच भारतीय समाजसुधारक पहिल्या शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने महिलांचा सन्मान सोहळा सायन्स क्लब खोपोली, जुना मुंबई-पुणे हायवे खोपोली येथे पार पडला. यावेळी खोपोली शहरात महिलांसाठी नेहमी कार्यरत असणाऱ्या नगरसेविका सुवर्णा मोरे यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच शिक्षिका सावित्री जाधव यांना सावित्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मा. श्री. कुलदीपकभाई शेंडे (नगराध्यक्ष खो.न.प.), नगरसेवक अनिल सानप, दिनेश थोरवे, नगरसेविका सुवर्णा मोरे, श्रुती पालांडे ,वंदनाताई मोरे ताराराणी ब्रिगेड महिला प्रदेश अध्यक्ष, नगरसेविका सानिया शेख, केविना ताई गायकवाड तसेच खोपोली शहरातील अनेक नवनिर्वाचित नगरसेविका उपस्थित होत्या. यावेळी महिलांची असंख्य उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. तसेच हळदी कुंकू समारंभ पार पडला. आमदार महेंद्रशेठ थोरवे फाउंड...

के.एम.सी. कॉलेज खोपोली येथे वैद्यकीय एचआयव्ही तपासणी शिबिराचे आयोजन....

Image
  खोपोली /खलील सुर्वे :-  शिबिर इनर व्हील क्लब ऑफ खोपोली तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन के .एम.सी. कॉलेज खोपोली येथे करण्यात आले. एनसीसी युनिटअंतर्गत वैद्यकीय एचआयव्ही तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. एचआयव्हीबाबत जनजागृती करणे व वेळेवर तपासणीचे महत्त्व पटवून देणे हा शिबिराचा मुख्य उद्देश होता. के.एम.सी. कॉलेजच्या प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली केटीएसपी मंडळाचे सदस्य संतोष जंगम सर, दिलीप पोरवाल सर तसेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने शिबिर आयोजित करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान लाभले. हा कार्यक्रम एएनओ कॅप्टन शीतल कृष्णा गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. त्यांनी एनसीसी कॅडेट्सना एचआयव्ही संदर्भात आवश्यक माहिती देत मार्गदर्शन केले. शासकीय रुग्णालयातील प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी पूर्ण काळजी व गोपनीयता राखून तपासणी केली. के.एम.सी. कॉलेजचे उपाध्यक्ष पोरवाल सर यांनी कार्यक्रमाच्या सुरळीत आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वी संचालनात ...

डाक विभागाकडून जीवन विमा योजनेअंतर्गत विमा सल्लागारच्या भरतीसाठी मुलाखती.....

Image
  नांदेड/प्रतिनिधी :- नांदेड डाक विभागाकडून डाकजीवनविमा (पीएलआय) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) योजनेअंतर्गत "डायरेक्ट एजंट" (विमा सल्लागार) च्या भरतीकरिता मुलाखती घेण्यात येत आहेत. सदरील अर्ज अधिक्षक डाकघर कार्यालय नांदेड विभाग नांदेड येथे उपलब्ध आहेत. सर्व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून शुक्रवार 23 जानेवारी 2026 रोजी कार्यालयीन वेळत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अधिक्षक डाकघर कार्यालय नांदेड विभाग नांदेड 431601 येथे थेट मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे व सोबत बियोडाटा मूळ कागदपत्र, प्रमाणपत्र / अनुभव प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे, असे आवाहन अधिक्षक डाकघर नांदेड विभाग नांदेड यांनी केले आहे. पात्रता व मापदंड :- वयोमर्यादा: उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी कमीत कमी १८ वर्ष असावे. शैक्षणिक पात्रता: अर्जदार हा केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे मान्यताप्राप्त बोर्डाची १० वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.  श्रेणी : - बेरोजगार/स्वयंबेरोजगार, माजी विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचा माजी विमा एजंट, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, म...

हाळ खुर्द गावातील मुस्लिम व आदिवासी समाजाला कबरस्तान कधी ?

Image
  शंभर वर्षांपासून वंचित समाजांचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल * जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयाकडून कागदपत्रांवर टाळाटाळीचा आरोप खालापूर / के. डी. सुर्वे :- रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या हाळ खुर्द ग्रामपंचायतीतील मुस्लिम व आदिवासी (कातकरी) समाज गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळापासून दफनभूमी (कब्रस्थान) व स्मशानभूमीपासून वंचित असल्याची धक्कादायक बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. या दोन्ही समाजांना मूलभूत मानवी हक्क असलेली अंत्यविधीसाठीची जागा मिळावी, याबाबत प्रशासनाकडून होत असलेली दिरंगाई व टाळाटाळ पाहता ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. * शासकीय जमिनीबाबत प्रस्ताव असूनही प्रक्रिया रखडली :- या प्रकरणात 30 जून 2025 रोजी निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड (अलिबाग) यांच्याकडून पत्र देण्यात आले होते. त्यामध्ये मौजे हाळ खुर्द, ता. खालापूर, जि. रायगड येथील स. नं. 38 (1), क्षेत्र 5.77.00 हेक्टर आर या गायरान (गुरचरण) शासकीय जमिनीपैकी 0.40 हेक्टर क्षेत्र स्मशानभूमीसाठी (ग्रामपंचायतीस) 0.80 हेक्टर क्षेत्र मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी देण्याची विनंती करण्यात आली होती. या मागणीच्...

खालापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल..

Image
  सह निवडणूक निर्णय अधिकारी अभय चव्हाण यांच्याकडून निवडणूक कार्यक्रम, आरक्षण व तारखांची सविस्तर माहिती खालापूर / सुधीर माने :- राज्यातील 12 जिल्हा परिषदांअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 चा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, खालापूर तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी सहनिवडणूक निर्णय अधिकारी व खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या दालनात गुरुवार, 15 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद संपन्न झाली. ही पत्रकार परिषद निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार यांच्या आदेशानुसार घेण्यात आली. यावेळी तहसीलदार अभय चव्हाण यांनी खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभागांची रचना, आरक्षण, तसेच संपूर्ण निवडणूक वेळापत्रक याबाबत पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. * खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व आरक्षण :- खालापूर तालुक्यात ४ जिल्हा परिषद गट असून गट क्र. 15 - चौक : अनुसूचित जमात (स्त्री) गट क्र. 16 - वासांबे : सर्वसाधारण गट क्र. 17 - सावरोली : सर्वसाधारण गट क्र. 18 - आतकर गाव : सर्वसाधारण (स्त्री). * पंचायत समिती गण व आर...

अखेर खोपोलीत ‘साबळे पॅटर्न’

Image
    विक्रम साबळे उपनगराध्यक्ष ; दिनेश थोरवे, डॉं. सुनील गोटीराम पाटील व अश्विनीताई अत्रे स्वीकृत नगरसेवक खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी विक्रम यशवंत साबळे यांची निवड झाल्याने शहराच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात पुन्हा एकदा अनेक वर्षानंतर ‘साबळे पॅटर्न’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सुप्रसिद्ध युवा उद्योजक, विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात प्रभावी ठसा उमटविणारे विक्रम साबळे यांच्या निवडीमुळे विशेषतः युवक वर्गांत नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. दूरदृष्टी, कार्यक्षमता आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून, नगर परिषदेच्या कारभारात सकारात्मक ऊर्जा संचारेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. याचवेळी खोपोली नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी शहरातील सुप्रसिद्ध व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते दिनेश थोरवे (सुरभी ज्वेलर्सचे संचालक), सामाजिक जाणिवा जपणारे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील तसेच लोकोपयोगी कार्यात सातत्याने अग्रभागी असणाऱ्या अश्विनीताई अत्रे यांची निवड झाल्...

शिवसेनेचे दिनेश थोरवे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉं. सुनील गोटीराम पाटील व भाजपच्या अश्विनीताई अत्रे यांचा समावेश

Image
  खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी शहरातील सुप्रसिद्ध व्यवसायिक व सामाजिक कार्यकर्ते, सुरभी ज्वेलर्सचे संचालक दिनेश थोरवे यांची निवड करण्यात आली आहे. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉं. सुनील गोटीराम पाटील आणि भारतीय जनता पक्षाकडून अश्विनीताई अत्रे यांचीही स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याने नगर परिषदेच्या कामकाजात अनुभवी व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सहभाग वाढला आहे. दिनेश थोरवे हे गेल्या अनेक वर्षांपासून खोपोली शहरात सामाजिक, धार्मिक व विकासात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. गरजू नागरिकांना मदतीचा हात, विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन तसेच शहराच्या विकासाशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे नेतृत्वशील व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेतच त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याचे बोलले जात आहे. * नागरिक व संघटनांकडून अभिनंदन :- या निवडीबद्दल नागरिक, व्यापारी वर्ग, युवक कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांकडून दिनेश थोरवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच डॉं. सुनील गोटीराम प...

इनरव्हील क्लब खोपोली व ब्राम्हणसभा खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने ओवीरंग कार्यक्रम उत्साहात संपन्न....

Image
    खालापुर कर्जत / सुधीर देशमुख :- भारतीय संस्कृती व परंपरा जपण्यासाठी ओवी रंग या माध्यमातून समाजातील नवीन पिढीला 50 वर्षा पूर्वी भारतातील खेड्या पाड्यातील घरामधील ज्या महिला वर्ग होत्या त्या आपल्या घरातील दळण जात्यावर दळत असताना ओव्या म्हणत आपली कामे करत असत ,पाट्यावर वाटण वाटणे, उखळीतून भात सडून त्यापासून तांदूळ बनवणे या प्रकाराची कामे महिला करत आपली संस्कृतीचे जतन करत होत्या. आता ती संस्कृती लोप पावत चालली आहे ती आजच्या ए आय च्या युगातील नवीन पिढीला 50 वर्षा पूर्वी महिला वर्ग कशी कामे करायची याची माहिती ओवी रंग या माध्यमातून लेखक व दिग्दर्शन ज्योती शिंदे, निर्मिती व सूत्रधार सुहासिनी घोरपडे, संगीत दिग्दर्शक सुखदा भावे -दाबके या तिघींनी मिळून सादर केला अतिशय सुंदर असा कार्यक्रम खोपोलीत नाट्य रसिकाना ब्राम्हण सभा हॉल मधे पहायला मिळाला हा कार्यक्रम आता शाळा व कॉलेज मध्ये होणे गरजेचे आहे असे संजय पाटील यांनी आपल्या अभिप्राय मधे दिला. या कार्यक्रम प्रसंगी इनरव्हील क्लब खोपोली च्या अध्यक्ष दिना शहा,सेक्रेटरी मधुमिता पाटील व सर्व सदस्य तसेच ब्राम्हण सभा खोपोली चे अध्यक्ष ...

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अश्वपरीस फाऊंडेशनतर्फे आनंद शाळेतील विद्यार्थ्यांना मदत....

Image
  विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरण्यात आली....   खालापुर कर्जत/सुधीर देशमुख :-  राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त समाजातील गरजू घटकांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या अश्वपरीस फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रथमच आनंद शाळा, खोपोली – शीळ फाटा येथे एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने आनंद शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरण्यात आली. आपण समाजाचे देणे लागतो ही भावना मनात ठेवून, ही शैक्षणिक फी पूर्णतः आपल्याच समाजातील मदतीच्या हातांनी भरण्याचा प्रयत्न करण्यात आला. समाजातील विविध घटकांनी दिलेल्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. मदत ही केवळ जबाबदारी नसून, समाजाप्रती असलेली जाणीव व कर्तव्य आहे, या विचारातून हा उपक्रम राबविण्यात आला. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस बळ मिळावे आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांना शुभेच्छा व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तसेच भविष्यातही अशाच गरजवंत विद्यार्थ्यांसाठी आ...

साप्ताहिक खालापुर वार्ता व न्युज जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांचा सन्मान सोहळा

Image
    खालापुर कर्जत /सुधीर देशमुख:-    साप्ताहिक खालापुर वार्ता दिनदर्शिका प्रकाशन सोहळा ५ वर्ष पुर्ण व न्युज जर्नालिस्ट असोसिएशन ह्या पत्रकारांच्या संघटनेचे प्रथम वर्धापन आणि दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा खोपोली येथे पार पडला. यावेळी खोपोली चे नगराध्यक्ष श्री कुलदिपक शेंडे व माजी नगराध्यक्ष श्री सुनील पाटील, तसेच कार्यक्रम अध्यक्ष मा.डाॅ.शरीफ बागवान, मा.श्री संतोष दादा चौधरी ,मा.श्री फिरोज पिंजारी,‍ रविंद्र घोडके, कु.सागरिका शेखर जांभळे,सौ.सुप्रिया साळुंखे,सौ.दिना शहा,श्री संदीप पाटील,श्री संतोष गुरव,सौ.ईशिका शेलार, नगरसेवक श्री राहुल गायकवाड, नगरसेविका सौ सुवर्णा मोरे ह्या सर्व मान्यवरांनी पत्रकारांचा सन्मान करुन त्यांना पुढील काळात पत्रकार भवनासाठी आम्ही एकत्रित पणे प्रयत्न करु असे आश्वासन देऊन त्यांचा गौरव केला. ह्या कार्यक्रमाचे आयोजक श्री सुधीर माने(संपादक, प्रदेश अध्यक्ष) श्री खलील सुर्वे (राष्ट्रीय अध्यक्ष) कु.मानसी कांबळे (राष्ट्रीय महासचिव) श्री संजय पाटील (कार्यकारी संपादक) यांच्या अथक परिश्रमाने हा स...

खोपोलीमध्ये पत्रकार भवन उभारा!

Image
  * पत्रकारांची नवनियुक्त नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्याकडे मागणी  * सा. खालापूर वार्ता व न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे पत्रकारांचा गौरव  * दर्पण दिन, मराठी पत्रकार दिन व संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम खोपोली / मानसी कांबळे :- खोपोलीसह खालापूर तालुक्यातील पत्रकारांसाठी एक सुसज्ज पत्रकार भवन उभारण्यात यावे तसेच पत्रकारांच्या आरोग्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून उपक्रम राबविला जावा, अशी मागणी आज सा. खालापूर वार्ता व न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात करण्यात आली. दरम्यान, नूतन नगराध्यक्ष कुलदिपक शेंडे व माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील पाटील या दोघांनी 'पत्रकार भवन' उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.  दर्पण दिन, मराठी पत्रकार दिन तसेच न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त साप्ताहिक खालापूर वार्ता आणि न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, 10 जानेवारी 2026 रोजी ज्येष्ठ नागरिक सभागृह, खोपोली (ता. खालापूर, जि. रायगड) येथे पत्रकार गौरव व दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट, कर्जत येथे कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा....

Image
  विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन * विविध कोर्स पूर्ण करणाऱ्यांचा यशोचित सन्मान कर्जत / प्रतिनिधी :- 8 जानेवारी 2026 रोजी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट, कर्जत सेंटर येथे कौशल्य प्रशिक्षण कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. विविध व्यावसायिक कोर्स पूर्ण करून रोजगारक्षम बनलेल्या विद्यार्थ्यांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे जनसंपर्क अधिकारी विद्यानंद ओव्हाळ, इलेक्ट्रीशियन कोर्सचे प्रशिक्षक सुनील जाधव, टेलरिंग कोर्सच्या प्रशिक्षिका वर्षा खोब्रागडे, ECCE कोर्सच्या शिक्षिका वृषाली घारे, प्लेसमेंट को-ऑर्डिनेटर सागर खंडागळे, कम्युनिटी मोबिलायझर राजू ढोले तसेच विशेष पाहुणे शैलेश खोब्रागडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सूत्रसंचालन वृषाली घारे मॅडम यांनी केले, तर प्रास्ताविक सागर खंडागळे सर यांनी मांडले. त्यांनी लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास उपक्रमांची माहिती देत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर ...

खालापुर नायब तहसीलदारांना रायगड स्वाभिमान दिनदर्शिका २०२६ सादर करण्यात आले

Image
  खालापुर/सुधीर देशमुख :- दैनिक रायगड स्वाभिमान ३ रे वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित झालेल्या दिनदर्शिका २०२६ यांचे वितरण खालापुर तालुक्याचे नायाब तहसीलदार मा.श्री सुधाकर राठोड साहेब यांना श्री सुधीर देशमुख (प्रतिनिधी रायगड स्वाभिमान) यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.यावेळी तहसील कार्यालयातील वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी मान्यवर मंडळी उपस्थित होती.  या प्रसंगी नायब तहसीलदार यांनी प्रशासन व जनता यांच्यात चांगले संबंध व विकास कामांचे समन्वय साधण्यासाठी दैनिक व साप्ताहिक अशी माध्यम असते फार गरजेचे आहे.त्यामुळे जनता व प्रशासन यांच्यात दुवा साधण्याचा काम पत्रकार हे करत असतात.विचारांची देवाणघेवाण हि विकास कामातुन जाणिव करुन देण्याचा काम हे दैनिकाच्या माध्यमातून जनते पुढे मांडण्यासाठी पत्रकारांनी चांगले काम करावे हि अपेक्षा व शुभेच्छा नायाब तहसीलदार यांनी व्यक्त केली.

इनरव्हील क्लब खोपोलीतर्फे पत्रकार दिन सन्मानाने साजरा

Image
* ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव ; लोकशाहीच्या चौथ्यास्तंभाला मानाचा मुजरा खोपोली / प्रतिनिधी :- लोकशाहीच्या चौथ्यास्तंभाचा गौरव करणारा पत्रकार दिन इनरव्हील क्लब खोपोलीच्या वतीने अत्यंत सुसंस्कृत, सन्माननीय आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. बुधवार, 7 जानेवारी 2026 रोजी सहकार नगर येथील रोटरी क्लब हॉल, खोपोली येथे आयोजित या कार्यक्रमाने समाज आणि माध्यमांमधील नातेसंबंध अधिक दृढ केले. या विशेष प्रसंगी अल्टा कंपनीचे मॅनेजर बाळासाहेब म्हात्रे यांच्या शुभहस्ते खोपोलीतील ज्येष्ठ व अनुभवी पत्रकार जयवंत माडपे, नितीन भावे, सुधीर माने, प्रशांत गोपाळे, संजय पाटील आणि एस. टी. पाटील यांचा त्यांच्या दीर्घकालीन, निष्ठावान व समाजोपयोगी पत्रकारितेची दखल घेत प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात बोलतांना इनरव्हील क्लब खोपोलीच्या अध्यक्षा दिना शाह यांनी सांगितले की, पत्रकार हे समाजाच्या विचारप्रवाहाचे मार्गदर्शक असतात. सत्यनिष्ठा, पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकी जपत केलेली पत्रकारिता समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्लबच्या सेक्रेटरी मधुमिता पाटील, खजिनदा...

साप्ताहिक खालापूर वार्ता व न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे पत्रकार गौरव व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा

Image
  * दर्पण दिन व मराठी पत्रकार दिनानिमित्त 10 जानेवारीला खोपोलीत भव्य कार्यक्रम खोपोली / प्रतिनिधी :- आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त व मराठी पत्रकार दिन तसेच न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त साप्ताहिक ‘खालापूर वार्ता’ आणि न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पत्रकार गौरव व दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, 10 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता, ज्येष्ठ नागरिक सभागृह, हस्तीमल मॉलसमोर, खोपोली (ता. खालापूर, जि. रायगड) येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन कर्जत - खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थान न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान भूषविणार आहेत. कार्यक्रमास पोलिस मित्र संघटना, नवी दिल्लीचे संस्थापक अध्यक्ष संतोषदादा चौधरी, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, खोपोली नगर परिषदेचे नवनियुक्त नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, खालापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे, खोपोली नग...

कुलदीपक शेंडे यांनी स्विकारला खोपोली नगराध्यक्षपदाचा पदभार

Image
मंगेश काळोखे हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर साधेपणात पदग्रहण ; विकासाभिमुख कामांचा निर्धार खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार कुलदीपक शेंडे यांनी आज औपचारिकरीत्या स्विकारला. सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या नुकत्याच झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर हा पदग्रहण सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला. यावेळी मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या हस्ते कुलदीपक शेंडे यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, भाजप नेते दीपक बेहरे, शिवसेना नेते विजय पाटील व प्रसाद थोरवे यांचा समावेश होता. माजी उपनगराध्यक्ष मोहन औसरमल हेही व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत नव्या नेतृत्वाला शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे व मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  नगराध्यक्ष शेडें यांनी आपल्या भाषणात मंगेश काळोखे यांच्या दुर्दैवी हत्येमुळे हा सोहळा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले...

चिंचवली शेकीन येथे श्री मांढरदेवी काळूबाई छबीना उत्सव धुमधडाक्यात संपन्न.....

Image
  खालापूर प्रतिनिधी: - खालापूर तालुक्यातील चिंचवली शेकीन येथे श्री मांढरदेवी काळूबाई छबीना उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. देवीच्या कृपेने आणि गुरुवर्य मधुकर मांडे यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम पार पडला. शुकवार, 3 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत ज्ञानेश्वर हरिपाठ भजनी मंडळ, वरची खोपोली यांचे भजन झाले. त्यानंतर 6 ते 7 वाजेपर्यंत जोगेश्वरी महिला हरिपाठ मंडळ, हलीवली यांचा हरिपाठ झाला. सायंकाळी 7 वाजता देवीचा अभिषेक, होम हवन श्री भालचंद्र पटवर्धन गुरुजी आत्करगाव यांनी केले. सायंकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत चिंचवली येथील माऊली भजनी मंडळ, गायक ज्ञानेश्वरी कूडपाने यांचे भजन झाले. रविवार, 4 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत काळुबाई देवीचा छबिना सोहळा व ग्राम प्रदक्षिणा फटाक्यांच्या आतिष बाजीत व ढोल ताशाच्या गजरात संपन्न झाला. दुपारी 2 वाजता देवीच्या आरतीचा मान सौ. सुवर्णा सुधीर माने व श्री. सुधीर गोविंद माने, राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, न्युज जर्नलिस्ट असोसिएशन यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम झाल...

खोपोलीत पत्रकार क्रिकेट संघाच्या खुल्या स्पर्धेत शिक्षकांची बाजी

Image
  * जिल्हा परिषद शिक्षक संघाने शानदार कामगिरी करीत प्रथम क्रमांक पटकाविला  खालापूर / प्रतिनिधी :- खोपोली पत्रकार क्रिकेट संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेली खुली क्रिकेट स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. पंत पाटणकर मैदान, खोपोली येथे झालेल्या या स्पर्धेत जिल्हा परिषद शिक्षक संघाने दमदार आणि शिस्तबद्ध खेळाचे प्रदर्शन करीत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले, त्यामुळे शिक्षक क्रिकेट रसिकांसाठी हा दिवस खास ठरला. * विविध विभागांचा सहभाग ; आयोजन यशस्वी :- या स्पर्धेत खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, खालापूर पोलिस ठाणे, खालापूर वकील असोसिएशन, खोपोली - खालापूर डॉंक्टर असोसिएशन, खोपोली पोलिस ठाणे, खोपोली नगर परिषद, हेल्प फाऊंडेशन, खोपोली - खालापूर पत्रकार संघ, खालापूर शिक्षक संघ आदी विविध संघांनी सहभाग नोंदविला. ही स्पर्धा पत्रकार तय्यब खान व पत्रकार आकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. * शिस्त, उत्साह आणि दर्जेदार खेळाचे दर्शन :- स्पर्धेदरम्यान शिक्षक संघाने दाखविलेला शिस्तबद्ध, उत्साही व दर्जेदार क्रिकेट हा विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेर...

दैनिक पुढारीचा आदर्श पत्रकार पुरस्कार नेरळचे पत्रकार आनंद सकपाळ यांना प्रदान....

Image
  कर्जत/नरेश जाधव :- अलिबाग येथे आयोजित विशेष समारंभात नेरळ येथील पत्रकार आनंद सकपाळ यांना दैनिक पुढारीचा ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते गौरवपूर्वक प्रदान करण्यात आला.   यावेळी दैनिक पुढारीचे निवासी संपादक शशिकांत सावंत तसेच अलिबाग आवृत्तीचे संपादक जयंत धुळप प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पत्रकारितेतील मूल्यनिष्ठा, सामाजिक बांधिलकी व वस्तुनिष्ठ वार्तांकनासाठी आनंद सकपाळ यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला.               नेरळ परिसरातील विविध सामाजिक, ग्रामीण व जनहिताच्या प्रश्नांना सातत्याने व निर्भीडपणे वाचा फोडणाऱ्या आनंद सकपाळ यांच्या पत्रकारितेची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.   पुरस्कार स्वीकारताना आनंद सकपाळ यांनी दैनिक पुढारी व्यवस्थापन, संपादकीय टीम तसेच वाचकांचे आभार मानले. हा सन्मान अधिक जबाबदारीने व प्रामाणिक पत्रकारिता करण्याची प्रेरणा देणारा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या प्रसंगी पत्रकार, मान्यवर तसेच ...

घरपट्टी व पाणीपट्टीवर 50 टक्के सवलत 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ

Image
  मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानाचा कालावधी वाढविण्याचा शासन निर्णय ; ग्रामस्थांना दिलासा खालापूर / सुधीर देशमुख :- ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन 2025-26 साठी राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानाचा कालावधी वाढविला आहे. या संदर्भातील नवीन शासन निर्णय 31 डिसेंबर 2025 रोजी जारी करण्यात आला असून, त्यानुसार घरपट्टी व पाणीपट्टीवरील 50 टक्के सवलत आता 31 मार्च 2026 पर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. * सवलतीचा कालावधी वाढल्याने ग्रामस्थांना लाभ :- मूळ शासन निर्णयानुसार या अभियानाचा कालावधी 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 असा निश्चित करण्यात आला होता. मात्र, राज्यातील विविध परिस्थिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमांमुळे अभियानाची अंमलबजावणी अपेक्षित गतीने होऊ शकली नव्हती. या पार्श्वभूमीवर, अधिकाधिक ग्रामपंचायतींना सहभागाची संधी मिळावी आणि नागरिकांना कर सवलतीचा लाभ घेता यावा, यासाठी शासनाने कालावधी वाढविण्याचा निर्णय...