वावोशीत धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
भारतीय बौद्धमहासभेचे राजेंद्र क्षीरसागर यांचे सम्राट अशोकाचे धम्मकार्यावर ओजस्वी प्रबोधन
उपासक उपासिकांचा उत्स्फूर्त सहभाग..
खालापुर/सुधीर देशमुख :- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व भारतीय बौद्ध महासभा छत्तीशी विभाग क्र. १ अंतर्गत वावोशी भिमनगर ग्राम शाखेत २ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे रायगड जिल्हा महासचिव व प्रवचनकार राजेंद्र क्षीरसागर यांनी “सम्राट अशोकाचे धम्म कार्य” या विषयावर प्रबोधन घडवले. त्यांनी सम्राट अशोक बौद्ध धम्माकडे कसे वळले, त्यांनी भारतात धम्माचा प्रचार–प्रसार कसा केला आणि विसाव्या शतकात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची घेतलेली दीक्षा तसेच बौद्ध लेण्यांचे ऐतिहासिक महत्व, बौद्धांची आचारसंहिता याबाबत देखील सविस्तर माहिती दिली. त्यांच्या प्रवचनाने उपस्थित धम्म उपासक, उपासिका मंत्रमुग्ध झालेले पहायला मिळाले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ बौद्धाचार्य व धम्मप्रचारक सदाशिव कवडे यांनी कालकथित बौद्धाचार्य चिंधू परशू मोरे, भाऊ मोरे यांच्या धम्मवारशाचा उल्लेख करून त्यांना आदरांजली वाहिली. “बौद्ध विहार हे संस्कार केंद्र व ऊर्जेचे ठिकाण असून येथे दर आठवड्याला बुद्ध वंदना होणे गरजेचे आहे” असेही ते म्हणाले. तर धम्मप्रचारक अरुण गायकवाड यांनी दिवाळी सुट्टीत वावोशी येथे बालसंस्कार व महिला उपासिका शिबिर घेण्याबाबत सूचित केले. या प्रसंगी यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष सदाशिव कवडे, रायगड जिल्हाध्यक्ष संजय जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते श्रावण गायकवाड, ज्येष्ठ बौद्धचार्य दत्ता ओव्हाळ, केंद्रीय शिक्षक तथा बौद्धाचार्य अरुण गायकवाड, सचिन केदारे, खालापूर तालुका अध्यक्ष विनायक गायकवाड, खालापूर तालुका महासचिव राजेश क्षीरसागर, खालापूर तालुका कोषाध्यक्ष रमेश मोरे, छत्तीशी विभागीय अध्यक्ष संदीप गायकवाड, उपाध्यक्ष पांडुरंग मोरे, रविंद्र भालेराव, गणेश मोरे, प्रकाश मोरे, हिरामण मोरे, अजित मोरे, संतोष मोरे, चंद्रकांत जाधव, भावेश भालेराव, शोभा मोरे, अरुणा मोरे, माधुरी शिंदे, कल्पना गायकवाड, पल्लवी मोरे आदी गावातील सर्व उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home