कर्जत-खालापूर मतदारसंघाच्या समृद्धीसाठी देवीकडे साकडे – आमदार महेंद्र थोरवे
खालापुर/सुधीर देशमुख :- नवरात्र उत्सवाची धामधूम सर्वत्र रंगलेली असताना दिनांक १ लक्ष ऑक्टोबर २०२५ रोजी आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत शहरासह मतदारसंघातील विविध देवस्थानांना भेट देत देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मतदारसंघाच्या समृद्धीसाठी तसेच नारी सशक्तीकरणासाठी देवीसमोर साकडे घातले.
आज कर्जत शहरातील भिसेगाव येथील अंबेमाता मंदिर, गुंडगे येथील सोमजाई माता मंदिर, कर्जतमधील वेदमाता मंदिर आणि वेणगाव येथील महालक्ष्मी मंदिर येथे आमदारांनी दर्शन घेतले. मंदिर समित्यांशी संवाद साधत त्यांनी देवस्थानांच्या विकास कामांचा आढावा घेतला. परिसर सुशोभीकरण, हॉल बांधकाम किंवा डागडुजीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या प्रसंगी बोलताना “मतदारसंघातील नारीशक्तीची बळकटी हीच खरी ताकद आहे. नवरात्र उत्सव हे देवीच्या उपासनेबरोबरच समाजातील स्त्रीशक्तीच्या गौरवाचे प्रतीक आहे. या शक्तीच्या बळकटीसाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.”
देवदर्शनाच्या या दौऱ्यात स्थानिक नागरिक, शिवसैनिक आणि विविध सामाजिक संस्था पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते संस्था पदाधिकाऱ्यांनी विशेष स्वागत करून सन्मान देखील केला. देवदर्शनाच्या निमित्ताने झालेल्या चर्चांमध्ये स्थानिक विकास, भविष्यातील योजना आणि नागरिकांच्या अपेक्षांवरही यावर देखील चर्चा झाली.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील जनतेला नवरात्र आणि दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. “देवीचा आशीर्वाद आणि जनतेचा विश्वास हेच माझ्या कार्याचा खरा आधार आहे. देवीची कृपा लाभली तर येणाऱ्या काळात मतदारसंघातील विकास अधिक गती घेईल असे मत व्यक्त केले.
नवरात्र देवी दर्शनाच्या या विशेष उपक्रमात धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचे सुंदर मिश्रण दिसून आले. त्यामुळे सणासुदीच्या या वातावरणात राजकीय आणि सामाजिक कार्यालाही नवा उभारी मिळाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home