Friday, October 3, 2025

रायगड मी मराठी प्रतिष्ठान तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

 


 खालापुर/सुधीर देशमुख :- रजि. जी. बी. बी. एस. डी. /१४२५/२०२१/एफ ७९४११ निस्वार्थीपणे समाजसेवेचे व्रत घेऊन समाजात चांगले बदल घडविण्यासाठी त्यातून समाज प्रबोधन होऊन समाजाला त्याचा चांगला फायदा होऊन समाजाचा विकास करण्यासोबत ,पर्यावरण पूरक अभियान सुरू करून निसर्गाला चांगला फायदा करून मनुष्य जीवन सर्वांगाने समृद्ध होण्यासाठी, महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यास नेहमीच, नेहमीच प्रयत्नशील असते. मनुष्य जीवनात रक्ताचे महत्व खूप अनमोल आहे.अनेकांचे प्राण वाचविण्याचे सामर्थ्य रक्तामध्ये आहे. "रक्तदान हेच खरे जीवनदान "त्याची सामाजिक भावना लक्षात घेऊन रायगड मी मराठी प्रतिष्ठान (रजि) च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक:05-10-25 (सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत) आय बी पटेल शाळा, स्टेशन रोड,गुरवार बाजार, गोरेगाव स्टेशनच्या बाजूला, गोरेगाव(प) येथे करण्यात आले आहे. ह्यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील विविध ठिकाणाहून अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहून मार्गदर्शन करून मोठ्या संख्येने रक्तदान करणार आहेत.

 तरी सर्वांनी उपस्थित राहावे व ज्यांना शक्य आहे त्यांनी ह्या सामाजिक कार्यात रक्तदाता म्हणून सहभाग घ्यावा.असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home