Wednesday, October 1, 2025

खालापुरात भोंडलाची धमाल!

 


महिलांचा गरबा आणि दांडियात उत्साह रंगला

लिगल स्टेप कार्यालयात भोंडला उत्सव संपन्न 

नवरात्र उत्सवात महिलांचा सक्रिय सहभाग

खालापुर / मानसी कांबळे :- महाराष्ट्रातील नवरात्र व दसऱ्याच्या काळात मुली व महिलांनी एकत्र येऊन साजरा केला जाणारा पारंपरिक लोकउत्सव म्हणजे भोंडला. याचा आनंद व उत्सव आज लिगल स्टेप खालापुर कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात हत्तीच्या पूजनाने झाली. यानंतर सहभागी महिलांनी भोंडल्याची गाणी गायली, पारंपरिक खेळ खेळले, तसेच गरबा व दांडिया खेळून सणाच्या रंगात वातावरण न्हाऊन निघाले. कार्यक्रमाचा प्रत्येक क्षण आनंदमयी आणि उत्साही वातावरणात पार पडला.

हा भोंडला कार्यक्रम ॲंड. मानसी देशपांडे सोगे, महेश सोगे व वैभव भोईर यांच्या प्रयत्नांनी यशस्वीपणे पार पडला. त्यांनी सर्व तयारी आणि आयोजन अतिशय नीटनेटकेपणे केली.

कार्यक्रमात ॲंड. मानसी देशपांडे सोगे, ॲंड. सुप्रिया जाधव, मानसी कांबळे, आस्था मणेर, श्रुती पिंगळे, मानसी यादव, गिरीजा चाळके, सानिका चाळके यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. सर्व सहभागी उत्साहाने कार्यक्रमाचा आनंद घेत होते आणि पारंपरिक उत्सवाची सजीव छटा अनुभवली.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home