Wednesday, October 1, 2025

कर्जत शहरासाठी दिलासादायक पाऊल – रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते संपन्न

 


खालापुर /सुधीर देशमुख:- कर्जत शहरातील प्रति पंढरपूर आळंदी ते कर्जत फायर ब्रिगेड पर्यंतचा रस्ता दीर्घकाळापासून खड्डेमय झाल्याने वाहन चालक व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. या समस्येची दखल आमदार श्री महेंद्र थोरवे यांनी घेतली असून त्यांच्या प्रयत्नातून MMRDA फंडातून निधी उपलब्ध करून घेण्यात आला आहे. या निधीतून संबंधित रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून आज भूमिपूजन सोहळा आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते पार पडला.

या प्रसंगी बोलताना "कर्जत शहराच्या वाहतुकीचा कणा असलेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीची तातडीची गरज होती. नागरिकांच्या मागणीनुसार मी MMRDA कडून निधी उपलब्ध करून घेतला आहे. आता तातडीने काँक्रिटीकरणाचे काम सुरू होणार असून, लवकरच श्रीराम पुलाचे ब्रिज काम देखील सुरू केले जाईल. ही दोन्ही कामे पूर्ण झाल्यानंतर कर्जत शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल आणि निसर्गसौंदर्यासोबत शहराच्या सौंदर्यात देखील भर पडेल."

या कार्यक्रमाला कर्जतचे माजी नगरसेवक ॲड.संकेत भासे, कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, शहर प्रमुख संजय मोहिते,पत्रकार रमाकांत जाधव, उपशहरप्रमुख दिनेश कडू ,नाना करनुक ,स्वप्निल जाधव,मयुर शितोळे,यांच्यासह मान्यवर व कर्जतकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे कर्जतकरांच्या दीर्घकाळापासूनच्या त्रासाचा निश्चितच अंत होणार असून, नागरिकांकडून आमदार श्री महेंद्र थोरवे यांचे मनःपूर्वक आभार मानले जात आहेत.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home