खोपोली शिळफाटा डी सी नगर परिसरात घरफोडी

 


खोपोली/प्रतिनिधी:-    सोमवारी रात्रीच्या दरम्यान खोपोली शहरातील शिळफाटा डी सी नगर भागात अज्ञात चोरट्यांनी घरात कोणी नसल्याची जणु काही माहिती घेऊनच दरवाज्याचा लॉक तोडून घरातील तीन कुटुंबाचा कपाटात असणारे सोन्याचे व चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली असून या घटनेत जवळपास 18 ते 19 तोळे सोने व चांदी चोरट्यांनी घेऊन प्लॅन केले आहे. या घटनेमुळे सर्वत्र परिसरात घबराट पसरली असुन तात्काळ या घटनेची दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास जलदगतीने सुरू केला असून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे

       खोपोली शहरातील शिळफाटा डी सी नगर येथे सर्व व्यवसायिक वास्तव्य करीत आहेत. याची जणू काही माहिती घेऊनच अज्ञात चोरट्यांनी या सोसायटीमध्ये मध्यरात्री प्रवेश केला आणि येथील द्वारका अपार्टमेंट बी विंग मध्ये पहिला माळा रात्री 2.30 च्या दरम्यान जगदीश परमार, अंकित परमार या दोन्ही भावंडांचे बाजूबाजूलाच या ठिकाणी ब्लॉक आहे. घरात कार्यक्रम असल्याने रात्री उशिरा कार्यक्रम संपवून एकाच घरात सर्व मंडळी गाढ झोपी गेली आणि या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी रूम चा लॉक तोडून प्रवेश केला आणि घरातील असणाऱ्या कापाटातील सोन्याचे गठनी, हार, झुमके,चैन, आंगठया असे 18 ते 19 तोळे सोने आणि काही चांदीचे दागिने असे एकूण रक्कम 12 लाख 73 हजार रुपयेचा किंमतीचा माल घेऊन चोरट्यांनी पलायन केले सदरची घटना सकाळी समजल्यानंतर सर्वांची झोपच उडाली आणि तात्काळ खोपोली पोलिसांना माहिती देताच तात्काळ पोलीस दाखल होऊन पाहणी केली तर नवीन जबाबदारी स्वीकारलेले उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल पाटील व खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे व सहकारी अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेतील चोरटे लवकरात लवकर पकडण्यासाठी सूत्रे हलवीत श्वानपथकाला व फिंगर प्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण करून ठश्यांचे नमुने घेतले आहेत.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी