चौक ग्राम पंचायतच्या उपसरपंचपदी सौ पुजा जगदीश हातमोडे यांची बिनविरोध निवड
खालापुर/ सुधीर देशमुख :- ग्रुप ग्रामपंचायत चौक च्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाच्या सौ.पुजा जगदीश हातमोडे यांची एकहाती बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ह्या प्रसंगी खालापूर तालुक्यातील अनेक मान्यवर वेगवेगळ्या स्तरातील शैक्षणिक,सामाजिक,राजकीय क्षेत्रातील आपली उपस्थिती ह्या प्रसंगी पुष्प गुच्छ देऊन सौ पुजा जगदीश हातमोडे यांचा सत्कार करण्यात आला.
ह्या प्रसंगी पत्रकार सुधिर देशमुख व सामाजिक कार्यकर्त्या सौ सुजाता सुधिर देशमुख यांनी पुष्प गुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुधिर ठोंबरे, प्रविण मोरे,मोतीराम ठोंबरे,सुहास कदम, सुनिल गायकवाड,सचिन मते, नंदु हातमोडे,रामदास कारणकर, पिंट्या राणे,सचिन साखरे,प्रकाश जाधव,सदस्य ॲड. रीना सोनटक्के, नयना झिंगे,स्वाती देशमुख, सौ डबके,लक्ष्मी वाघ,निखिल मालुसरे,सुभाष पवार,राजन गावडे,कल्पना शिंगवे,सुवर्णा राणे,प्राची डबके,महादेव पिरकड,अश्विनी म्हात्रे,श्री सुभाष अण्णा अजिंक्य देशमुख,गिरीश जोशी,धनंजय राणे, तनवीर शेख,ह्यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी नवनियुक्त उपसरपंच सौ पुजा जगदीश हातमोडे यांच्या बिनविरोध निवड झाल्याने खालापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत चौकचे विकास कामा मध्ये एका नविन पर्व सुरू होईल असा निर्धार श्री जगदीश हातमोडे व त्यांचे कार्यकर्ते ग्राम पंचायत मधील सर्व सदस्य,सरपंच,ग्रामविकास अधिकारी, व कर्मचारी यांना बरोबर घेऊन भविष्यात ग्राम पंचायत च्या विकास कामात सहकार्य करण्याचे आवाहन केले.



0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home