Friday, July 4, 2025

"बाल्याच्या मनांमदी" काव्यसंग्रहाचे प्रकाशन खोपोलीत संपन्न

 


कै. र. वा. दिघे यांच्या स्मृतिदिनानिमित्त साहित्यिक कार्यक्रम


खोपोली / प्रतिनिधी:- कोकण मराठी साहित्य परिषद शाखा, खोपोली आणि खोपोली नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कै. र. वा. दिघे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त एक साहित्यिक कार्यक्रम खोपोली नगरपालिकेच्या कै. र. वा. दिघे वाचनालयात ४ जुलै २०२५ रोजी, सकाळी ११ वाजता संपन्न झाला.


या प्रसंगी सुप्रसिद्ध लेखक व गझलकार डॉ. सुभाष कटकदौड यांच्या "बाल्याच्या मनांमदी" या विडंबन काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. हा समारंभ खोपोलीचे माजी नगराध्यक्ष व साहित्य संवेदना जपणारे दत्ताजी मसुरकर, उज्वलाताई दिघे, वामनराव दिघे, रेखा कोरे, अण्णाभाऊ कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.


कार्यक्रमास कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य, पत्रकार, आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नरेंद्र हर्डीकर यांनी सहज आणि प्रभावीपणे केले, तर जयश्री पोळ यांनी आभार प्रदर्शन केले.


साहित्याची हास्यरसाने सजलेली ही संमेलनघडी उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळणारी ठरली.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home