"खोपोलीत २५० शिक्षक-कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान सोहळा"
डॉ. इन्द्रजीत धर्मराज गोंड यांच्या संकल्पनेतून ‘नियोजन गुरु सन्मान’ उपक्रमाचे आयोजन
खालापुर/सुधीर देशमुख:- :–राष्ट्रीय सामाजिक न्याय एवं मानव अधिकार आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. इन्द्रजीत धर्मराज गोंड यांच्या संकल्पनेतून ‘नियोजन गुरु सन्मान’ या उपक्रमा अंतर्गत विविध शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात २५० पेक्षा अधिक शिक्षक आणि कर्मचारी सहभागी झाले होते. हा सन्मान “पढ़ाई-लिखाई प्रोजेक्ट” अंतर्गत आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमात आनंद शाळा, सह्याद्री विद्यालय, जेसीएमएम स्कूल, शाळा क्रमांक ८, शाळा क्रमांक ९, जनता विद्यालय लौजी, आर.वी.व्ही इंटरनॅशनल स्कूल (डीपी रोड) या शाळांचा सहभाग होता. सर्व शाळांचे प्राचार्य, शिक्षक, सहाय्यक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे शिक्षकांच्या कार्याचा समाजात गौरव करणे आणि त्यांच्या सन्मानास अधिक सामाजिक मान्यता देणे. उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. शिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "आजपर्यंत कोणीही आमच्या योगदानाला इतक्या मन:पूर्वक आदर दिला नव्हता. या सन्मानामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे."
या कार्यक्रमाला प्रा. शेखर देशमुख (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष), ॲड. प्रतीक मिश्रा (रायगड जिल्हाध्यक्ष), प्राचार्य सीमा त्रिपाठी (जिल्हा महिला प्रमुख), श्री संभु उपाध्याय (खालापूर उपाध्यक्ष), श्री ललित पाठक (सचिव), श्री अरुण गोंड (सल्लागार) यांच्यासह कार्यकारिणी सदस्य श्री उदयराज पाठक, धर्मेंद्र तिवारी, शिवसिंग राजपूत, श्रीकांत यादव, रचना यादव, संगीता अभिषेक सविता, अंजली शर्मा, संगीता शुक्ला आदी उपस्थित होते. या प्रेरणादायी कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून भविष्यातही असे उपक्रम सुरू राहावेत, अशी अपेक्षा शिक्षकांनी आणि उपस्थितांनी व्यक्त केली. समाजातील शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.



0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home