Tuesday, July 8, 2025

प्रबोधन प्रतिष्ठान दापोडी तर्फे इ.१० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

 


खोपोली / मानसी कांबळे :- प्रबोधन प्रतिष्ठान दापोडी तर्फे इ.१० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा अलिकडेच सी .के. गोयल कॉलेज हॉल दापोडी येथे घेण्यात आला .यावेळी अध्यक्षस्थान अरूण चाबुकस्वार संस्थापक अध्यक्ष न्यु सिटी प्राईड स्कूल पुणे यांनी स्विकारले. यावेळी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. तदनंतर कार्यक्रमास सुरुवात केली. यावेळी ॲड.महेश लोहारे संचालक आय .आय बी .पुणे, प्राचार्य सौ छाया खटावकर,डॉ सोमनाथ दडस, प्रा.सिध्दार्थ कांबळे , सुभाष रोकडे, अरविंद पवार, रायगड भूषण,संपादक डॉ.रविद्र विष्णू जाधव, सामाजिक कार्यकर्ते अशोक मोरे, रवि कांबळे,आदि मान्यवर उपस्थित होते.



यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.गोरख ब्राह्मणे सर यांनी अतिशय थोड्या शब्दात करुन व्याख्यानाला जास्त वेळ दिला.विद्यार्थ्यांना अधिकाधिक माहिती मिळून त्यांच्या कलागुणांचा विकास अभ्यास कसा करावा, अभ्यासाची भिती दुर कशी होईल.विषय कसा निवडावा आपण सर्वात टॉपर कसे होऊ या विषयी अगदी सोप्या भाषेत १० वी १२ वी नंतर भविष्यातील विद्यार्थ्यांचा यशस्वी वाटचाल या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर इंतभूत माहिती देण्याचा प्रयत्न व्याख्याते ॲड महेश लोहारे यांनी केला.कार्यक्रमास विद्यार्थी,पालक, अनेक मान्यवर उपस्थित होते.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home