Friday, July 4, 2025

खोपोलीत ग्रामीण साहित्यिक स्मरण व काव्यप्रकाशन




खोपोली/प्रतिनिधी :- कोकण मराठी साहित्य परिषद शाखा, खोपोली आणि खोपोली नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण साहित्यिक कै. र. वा. दिघे यांच्या ४५ व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार, ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कै. र. वा. दिघे वाचनालय, पाटणकर चौक येथे साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी सुप्रसिद्ध लेखक डॉ. सुभाष कटकदौंड यांच्या "बाल्याच्या मनांमदी" या विडंबन काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. डॉ. कटकदौंड यांनी कविता, गजल, कथा, कादंबरी, नाटक व लावणीसह साहित्याच्या विविध प्रकारांत लेखन केले आहे.


सर्व साहित्यप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home