Thursday, July 10, 2025

पत्रकार अभिजीत नारायण दरेकर यांना सुर्यभान रामटेके राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२५

 


सुधीर देशमुख/ खालापुर:- समाजहितासाठी झोकून देऊन पत्रकारिता करणाऱ्या दैनिक बेधडक महाराष्ट्रचे संपादक अभिजीत नारायण दरेकर यांना सुर्यभान रामटेके राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान एकता फाउंडेशन सामाजिक संघटना (नोंदणी क्र. F-336/2018) यांच्या वतीने प्रदान करण्यात आला.


पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध समस्यांवर आवाज उठवला, वंचितांचा न्यायासाठी पाठपुरावा केला आणि लोकशाही मूल्यांचे प्रबोधन केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत एकता फाउंडेशन, सोशल वर्कर असोसिएशन आणि ग्लोबल एकता मिडिया न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना हा राष्ट्रीय स्तरावरील गौरव प्रदान करण्यात आला.



पुरस्काराचे प्रमाणपत्र एकता फाउंडेशनच्या नागपूर येथील मुख्य कार्यालयात १ जून २०२५ रोजी देण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ. जय संजय रामटेके यांनी सांगितले की, "आम्ही तुमच्या हातात पक्षाचे झेंडे नव्हे तर संविधान, शिक्षण व अधिकार देण्याचा संकल्प केला आहे."


अभिजीत दरेकर यांनी दैनिक बेधडक महाराष्ट्र या वृत्तपत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कामगार, शेतकरी, वंचित घटक आणि भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने लेखन केले आहे. त्यांच्या निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेची महाराष्ट्रतून दखल घेतली जात आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home