Monday, July 7, 2025

खासदार श्री सुनिलजी तटकरे यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण आणि वृक्षारोपण कार्यक्रम....

 


खालापुर/सुधीर देशमुख :- आज सोमवार, दि ०७/०७/२०२५ रोजी एम बी मोरे फाऊंडेशनच्या धाटाव-रोहा येथील शैक्षणिक संकुलात संपूर्ण रोहा तालुक्यातील एस.एस.सी. (मार्च २०२५) परीक्षेत शाळांमधील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांमध्ये मा सौ वरदाताई सुनिल तटकरे (ज्येष्ठ समाजसेविका), मा श्री अनिकेतभाई सुनिल तटकरे (मा सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषद), मा श्री विवेक गर्ग (साईट हेड, सुदर्शन केमिकल्स) यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न झाला. 


या प्रसंगी श्री विजयराव मोरे (अध्यक्ष, एम बी मोरे फाऊंडेशन), श्री विनोदभाऊ पाशिलकर (उपाध्यक्ष, एम बी मोरे फाऊंडेशन), श्री समीर शेडगे (कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, रोहा तालुका), श्री अशोकराव मोरे (संचालक, एम बी मोरे फाऊंडेशन), श्री वैशालीताई गावंड (संचालिका, एम बी मोरे फाऊंडेशन), श्री जयवंत मुंडे (युवक तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), श्री अनिल भगत (माजी उपसभापती, पंचायत समिती रोहा) आणि धाटाव विभाग रा. कॉ. पार्टीचे समस्त सभासद आणि पदाधिकारी उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते शिक्षण संकुलात वृक्षारोपण देखील करण्यात आले. 


या कार्यक्रमाचे नियोजन एम बी मोरे फाऊंडेशनच्या स्कूल आणि महाविद्यालय तसेच धाटाव औद्योगिक विद्यालयाचे सर्व कर्मचारी यांनी मुख्याध्यापिका सौ तेजल सावंत, प्राचार्य श्री प्रसन्न म्हसळकर, मुख्याध्यापक श्री वसंत थोरात आणि वरिष्ठ शिक्षक श्री हणमंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पूर्ण केले.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home