Sunday, July 13, 2025

" शाळेच्या आठवणींना दिला सन्मान"

माजी विद्यार्थी सामाजिक संस्था,वावोशी विभाग यांचा प्रेरणादायी उपक्रम.


खालापूर/ सुधिर देशमुख : -आपण समाजाचा काहीतरी देणं लागतो या मानवीय दृष्टिकोनातून माजी विद्यार्थी सामाजिक संस्था, वावोशी विभाग यांच्या वतीने 12 जुलै 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा, नारंगी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.ज्यामध्ये दप्तर,वह्या, पेन, पेन्सिल, मुलांना हातरुमाल,आवश्यक शालेय वस्तूंचे वाटप करून शालेय जीवनाविषयी आनंद,प्रेरणा आणि सकारात्मक ऊर्जा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. 


या प्रसंगी जिल्हा परिषद माजी शीक्षण सभापती माननीय श्री नरेश पाटील साहेब यांनी संस्थेच्या कार्याचा कौतुक करत पुढिल कार्यासाठि शुभेच्छा देत पुढे भविष्यात संस्थेच्या कार्यासाठि हातभार लावण्याची ईच्छा व्यक्त केली, ग्रुप ग्रामपंचायत नारंगीच्या सरपंच सौ.भारती आरावकर,उपसरपंच श्री देवेंद्र देशमुख,सदस्य बाबू जाधव,सौ. वाघुले,यांच्यासह माजी सरपंच श्री उद्धव देशमुख,श्री सूर्यकांत देशमुख गुरुजी,श्री गणपत देशमुख,श्री नरेशजी गायकवाड,श्री पंकज देशमुख पोलीस पाटील,राहुल देशमुख,जितेंद्र देशमुख,राकेश देशमुख,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिल्पा पाटील, व सहकारी शिक्षक वर्ग व ग्रामस्थानी उपस्थिती दर्शविली.माजी विद्यार्थी सामाजिक संस्था वावोशी विभाग या संस्थेचे अध्यक्ष श्री प्रफुल्ल गजानन देशमुख यांनी संस्थेचे उद्दिष्ट, ध्येय धोरणे थोडक्यात सविस्तर विषद करून समाजातील गरीब,गरजू,विद्यार्थ्यांसाठी काम करण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहील.





संस्थेचे उद्देश्य , शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक वैद्यकीय,क्रीडा, व धर्मादाय बौद्धिक दृष्ट्या सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीकरणातून संस्था स्थापन करण्यात आली आहे.राष्ट्रीय एकात्मता व धर्म जागृतीची भावना निर्माण करण्यासाठी निरनिराळे राष्ट्रीय सण व उत्सव विद्यार्थ्यांबरोबर साजरे करणे शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणे मार्गदर्शन शिबिर,स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थांची तयारी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणे यासारखे कार्यक्रम संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रुक्षारोपण,सामाजिक बांधिलकी जपत मुलांच्यात योग्य ते सुसंस्कार घडून त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण करणे.संस्थेचे उपाध्यक्ष श्री नारायण मोरे यांनी मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री हरिश्चंद्र पाटील व त्यांची पत्नी,खजिनदार श्री शांताराम जाधव, सह चिटणीस श्री चंद्रकांत कार्लेकर,कार्याध्यक्ष सौ ज्योती माणकवले व श्रीयुत माणकवले,सदस्य श्री गुणाजी भोसले,श्री तानाजी पाटील सर,श्री नामदेव जाधव,श्री बबन शेलार,श्री संतोष हातनोलकर,श्री सुरेश ठाकूर,श्री अनंत पाटील,श्री नथुराम पाटील,श्री केशव पाटील,श्री रमेश मोरे व त्यांची पत्नी यावेळी उपस्थित होते.संस्थेच्या धैय-उद्दिष्ट व विविध उपक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील अनेक आजी माजी विद्यार्थी उद्योजक,हितचिंतक, यांनी सढळ हस्ते मदत केली.यामध्ये श्री संदीप देशमुख श्री समिर देशमुख श्री राहुल देशमुख श्री जितेंद्र देशमुख व श्री आनंद गजानन देशमुख या सर्वांनी संस्थेस देणगी स्वरूपात रोख रक्कम देऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हातभार लावला.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home