Sunday, July 6, 2025

खालापूर तालुक्यातील मुस्लिम बांधवानी केला मोहरम साजरा...

 


हाळ बुद्रुक हाळ खुर्द गावातून ताजीया सह पंजतनपाकची निशाणी हातात घेत काढण्यात आली मोहरमची मिरवणुक!


चौका-चौकात रस्त्यांवर शरबतचे स्टॉल लावून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना शरबत वाटप!


खोपोली /(खलील सुर्वे) :- मुस्लिमांमध्ये आशुरा दिवसाला विशेषत: खूप महत्त्व आहे.रविवार दि.०६जुलै २०२५ रोजी खालापूर तालुक्यातील हाळ - खुर्द, हाळ - बुद्रुक,खोपोली, शिळफाटा सह हाळ गावातील मुस्लिम बांधवानी मोहरम म्हणजे आशुरा दिवस साजरा केला.हाळ बुद्रुक व हाळ-खुर्द गावातून ताजीया व पंजतनपाकचा नक्षा हातात घेत या हुसेन मौला हुसेन एक नारा हायदरी या अली या अली ची घोषणा देत ढोल ताशांच्या गजरात,नात शरीफ पडत जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गांवर शेकडो मुस्लिम बांधवाच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली .या वेळी पोलिसांचा चौक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहीद-ए-आजम हजरत इमाम-ए-हुसेन (करबला )यांच्या आठवणीत शहरा सह गावातील घराघरांत दहा दिवस मजलिश, कुराण खोनी,फातिहा खोनी पठण आशुरादिनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून मुस्लीम बांधवांकडून घराघरांमध्ये विशेष खाद्यपदार्थ तयार करून फातिहापठण करण्यात आले . शरबत,खीर, खिचडा आणि जेवण ठेवण्यात आले होते. या दोन दिवशी लहान मोठ्या सह अनेकांनी पूर्ण दिवस भर रोजे (उपवास ) पकडले होते. गोर गरिबांना सदका (पैसे )कपडे, जेवण, फळांचे वाटप करण्यात आले. तेसच मस्जिद मध्ये नमाज आदा करून कुराणचे पठण करीत सर्वांच्या सुख समाधाना साठी दुवा (प्रार्थना) करीत मोहरम साजरा करण्यात आला.




"मोहरम' हे इस्लामिक कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याचे नाव आहे. मोहरम महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद गंबर (सल्लाहूंआलेहीस्लम ) यांचे नातू हासन - हुसैन आणि त्यांचे कुटुंब सह ७२ जण हे करबला येथे शहीद झाले होते. त्यांच्या आठवणीत मुस्लिम बांधव दहा दिवस घरा घरातील मजलिश आणि कुराणचे पाठण करून फातिहापठण करीत सर्वांसाठी प्रार्थना करून इमामे हुसैन करबला शहीद यांची माहिती आपल्या लहान मुलांपासून ते मोठ्याना सांगत नियाज वाटप करून साजरा करतात."


 हजरत मोहम्मद पैगंबर (सल्लाहूंआलेहीस्लम ) यांची मुलगी बीबी फातिमा यांची हासन आणि हुसैन ही दोन्ही मुले आहेत . पैगंबरांचे (सल्लाहूंआलेहीस्लम )चे ही दोन्ही नातू करबला येथे इस्लाम करीता शहीद झाले. इराकची राजधानी असलेल्या बगदादमधील करबला या गावात ''तारीख-ए-इस्लाम'' हे ऐतिहासिक युद्ध झाले होते. इस्लाममध्ये खलिफा निवडण्याचा रिवाज आहे मोहम्मद पैंगबरांनंतर (सल्लाहूंआलेहीस्लम ) चार खलिफा निवडले गेले; परंतु, काही वर्षांनी उमैया वंशांचे संस्थापक, इस्लाम धर्मातील पाचवे खलिफा असलेल्या अमीर मुआविया यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा यजिद पळीदने स्वत:ला खलिफा घोषित केले; परंतु इस्लाममध्ये ''बादशाही''ची संकल्पना नव्हती. शिवाय यजिद एक क्रूर शासकही अय्याशी, मक्कार, धोकेबाज, खोटा बोलणारा जुलुम करणारा जालीम होता. इस्लामी शर्यत मध्ये जे हाराम असणारे अनेक वाईट कामाना यजीद पळीदने जायज करार दिला होता. त्यामुळे यजिदला खलिफा मानण्यास हासन हुसैन सह मुसलमानानी नकार दिला होता.


हुसैनने आपल्याला खलिफा मानण्यास नकार दिल्यास त्याचे शीर कलम करण्याचे फर्मान यजीदने पळीद ने सोडले . हिजरीच्या महिन्यातील एका रात्री हुसैनला राजभवनात बोलावून यजिदचे हे फर्मान सुनावण्यात आले होते परंतु, हे फर्मान नाकारून हुसैन आपल्या कुटूंबासह ७२ लोकांसोबत मक्केच्या दिशेने जायला निघाले; रात्रभर प्रवास केल्यावर सकाळ होताच हुसैनने पाहिले की आपण आहोत तिथेच आहोत.दुसरी कडे खिलिफा होण्यासाठी यजिदने आपले सैनिक इमाम हुसैनना मारण्यासाठी पाठवले होते .इमाम हुसैन आपल्या परिवार व मित्रांसोबत करबला इथे पोहोचले असताना यजिदच्या सैन्याने त्यांना गाठले. इमाम हुसैन यांनी या सैन्याला इस्लाममधील शांतताप्रिय सिद्धांत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु सैन्यावर त्याचा परिणाम झाला नाही. हुसैनला पाणी देण्यास यजिदने सैनिकांना शकत मनाई केली होती. तीन दिवस रात्री हुसैनला पाणी देण्यात आले नाही.


शेवटी मोहरमच्या दहाव्या दिवशी या जालीमाने हुसैन सोबत युद्ध करण्यास सुरवात केली. तीन दिवसाचे उपाशी व तान्वलेले अब्बास गाजी,कासीम,यजीदच्या सैनिकांत सोबत युद्ध करतात करता शहीद झाले.आपल्या लहान पुत्रासाठी हुसैनने सैन्याकडे पाण्याची मागणी केली; पण या सैनिकांनी पाणी न देता अली अजगर हे लहान बाळाला त्यांनी गळ्यावर बाण मारले आणि अली अकबरला देखील शहीद केलं पण पाणीचा एक थेंब नाहीं दिला. त्यानंतर हुसैन सोबत या मक्कारांनी युद्ध करण्यास सुरवात केली हाजरो सैनिकांमध्ये हुसैन हे एकटे लडत असताना हाजरो सैनिकांना त्यांनी जहाँनम मध्ये पाठेवळे यजीदने हे पाहिली की हुसैन आपल्या पूर्ण सैनिकां सह मळा ही मारून टाकेल त्यांनी आपल्या सैनिकाला बोलून संगितले की आले रसूल म्हणजे हुसैनला मारणं इतकं सोपं नाही. हुसैन ज्या वेळी नमाज पडण्यासाठी उभे राहती त्यावेळी त्यांच्या वर हमला करून त्यांना शहिद करा नमाजची वेळ झाली आणि हुसैन नमाज साठी मैदानात उभे राहिले त्यावेळी धोकेबाज यजीदच्या एका हरामी सैनिकांने नमाज मध्ये सजध्यातील हुसैन वर धोक्याने हल्ला करून त्यांना शहीद केले. हुसैन शहीद झाले पण यजीद सोमोर झुकले नाही. 


त्यांच्या या आठवणी जगातील कानाकोपऱ्यातील मुस्लिम बांधव ताजीया बनून मिरवणुक काढुन शरबत बनवुन, गरिबांची मदत करीत मोहरम साजरा करतात.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home