अन्नप्राशन.... बाळा ची वरच्या आहाराची सुरुवात
सुधीर देशमुख/खालापुर:- निरामय हेल्थ फाउंडेशन संस्था आणि गोदरेज इंटरप्रायझेस ग्रुप यांच्या संयुक्त सहयोगाने राबविण्यात येणाऱ्या आरोग्यसमृद्धी प्रकल्प अंतर्गत दिनांक २७ जून २०२५ रोजी वडवळ ग्रामपंचायत अंतर्गत अन्नप्राशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. गावातील अंगणवाडी सेविका यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम अंतर्गत गावातील ६ महिनी पूर्ण झालेल्या बालकांना पहिला घास खाऊ घालून त्यांच्या पुढील आहाराची सुरुवात केली गेली. मातांना वरचा आहार संबंधित मार्गदर्शन करण्यात आले. आहार सोबतच स्तनपान चालू ठेवण्याचे महत्त्व देखील समजविण्यात आले. प्रत्येक लहान मुलांना भेटवस्तू देऊन अर्ध वार्षिक वाढदिवस साजरा करण्यात आला.
गावातील सरपंच श्री. ज्ञानेश्वर सुतार सर यांनी उपस्थिती दर्शवून गावातील लोकांना आरोग्य विषयक महत्त्व पटवून दिले. सदर कार्यक्रमात गावातील अंगणवाडी कर्मचारी, निरामय संस्थेचे कार्यकर्ते, गोदरेज इंटरप्रायझेस ग्रुप चे तानाजी चव्हाण सर, गावचे सरपंच उपस्थित होते.
चांगले आरोग्य सर्वांसाठी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या अश्या संस्था, गोदरेज इंटरप्रायझेस ग्रुप कंपनी आणि ग्रामपंचायती यांच्या मुळे गावातील लोकांचे आरोग्य नक्कीच सुरक्षित होईल.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home