Saturday, July 5, 2025

रायगड जिल्हा प्राथमिक शाळा खालापुर यांचा आषाढी एकादशीचा कार्यक्रम उत्साहात साजरा...

 


विद्यार्थ्यांचा विठ्ठल - रखुमाई च्या वेशात महत्वपुर्ण सहभाग..


खालापुर/ मानसी कांबळे :- महाराष्ट्रभर आषाढी एकादशी निमित्त पायी पालखी सोहळा आयोजित होत असताना रायगड जिल्हा प्राथमिक शाळा खालापुर येथे 5 जुलै रोजी पायी दिंडी सोहळा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाईच्या वेश परिधान करून महत्वपुर्ण सहभाग घेतला. विठ्ठल नामाचा गजर करत दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी दिंडीतुन एकात्मतेचा संस्कृतीचा संदेश देण्यात आला. हातात टाळ, मृदूंग आणि तुळशीचे रोप घेऊन फुगडी घालत अंत्यत उत्साहात हा पायी दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री सचिन कडू सर, शिक्षिका. सौ सारिका गोळे, शिक्षिका.सौ मिनल धोत्रे विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home