Sunday, July 13, 2025

मुंबई पुणे महामार्गावर ऍक्टिवा मोटरसायकल व कारवर पाईप कोसळल्याने भीषण अपघात....

 अपघातात दोन महिलांचा जागीच दुर्दैवी मृत्यु तर चार जण जखमी असल्याची माहिती...


खोपोली/प्रतिनिधी :- जुन्या मुंबई पुणे महामार्गावर शनिवार दि.१२ जुलै रोजी बोर घाटात पाईप वाहून नेणाऱ्या ट्रकचा अर्जंट ब्रेक लागल्याने ट्रक मधील पाईप धक्क्याने मागे सरकले व ट्रकच्या मागे असलेल्या एक्टिवा मोटरसायकल व कारवर पाईप कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे . या अपघातात दुर्दैवाने एक्टिवा मोटरसायकल वर मागे बसलेल्या महिलेचा आणि कार मध्ये ड्रायव्हर शेजारी बसलेल्या महिलेच्या अंगावर पाईप कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक्टिवा चालक, कार चालक आणि कार मधील मागे बसलेली महिला व एक लहान मुलगा असे चारजण जखमी झाले असून खोपोली शहरातील हॉस्पिटलमध्ये उपचारा साठी पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे.


गेल्या महिन्याभरात आधी रात्रीच्या सुमारास असेच पाईप वाहणाऱ्या ट्रक मध्ये गच्च भरलेले पाईप बोरघाटात जात असतांना चढनीवर ट्रक मधून अश्याच पद्धतीने पाईप सरकून रस्त्यावर कोसळले होते. मात्र त्या ट्रक मागे असणारी कार ट्रक पासून काही अंतरावर असल्याने सुदैवाने मोठे अपघात होता होता टळला होता. त्यावेळी जर पाईप कारवर कोसळला असता तर किती मोठी दुर्घटना घडली असती याचा विचार केल्यावर पाया खालून जमीन सरकून जाते. बोरघाटात बेशिस्तपणे वाहतूक करून पाईप नेणाऱ्या ट्रकचे वारंवार अपघात होत असतात...तीव्र उतार असल्याने आणि पाईपची व्यवस्थित बांधणी न केल्याने पाईप घसरण्याचे प्रकार सर्रास घडत असतात...पण यांच्या वर नियंत्रण का लावले जात नाही? इतकेच नव्हे तर रात्रीच्या सुमारास कोळसा वाहतूक करणारे डंपर देखील ओव्हरलोड वाहतूक करतांना दिसून येतात ? यांना नियम लागू नाहीत का? यांच्यावर डोळेझाक का करण्यात येते? नियम फक्त दुचाकी,तीन चाकी,कार साठीच आहेत का?असा प्रश्न नागरिकांन मधून होत आहे.

 या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, आय आर बी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, म सु बचे जवान, हेल्प फाउंडेशनचे मेंबर, मृत्युंजय देवदूत, घाटातील मेकॅनिक यांनी तात्काळ मदत कार्य केल्याने मोठी हानी टळली. पुढील तपास खोपोली पोलिस करीत आहेत.



0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home