खोपोली पोलीसांची धडाकेबाज कामगिरी
परराज्यातील ०६ आरोपी सह दुकानामध्ये चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात यश !
खोपोली/(प्रतिनिधी):- खोपोली पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रातील मोजे ताकई फाटा गावचे हद्यीत दिनांक ०३जुलै रोजी रात्रौ ०२.०० ते ०३.०० वाजण्याचे सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी रामचंद्र भिकु रासकर, रा. शिळगाव-खोपोली यांचे मालेकीचे दुकानाचे पाठीमागील बाजुने उघडया खिडकीवाटे प्रवेश करुन त्यामधुन पॉलीकॅब कंपनीच्या एकुण तीन लाख वीस हजार रुपये किमतीच्या केबल असा मुद्देमाल चोरी करुन नेला असल्याबाबत खोपोली पोलीस ठाण्याकडे गु.र.क्र. १६२/२०२५ भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ३०५ (अ), ३ (५) प्रमाणे दिनांक ०३ जुलै रोजी दाखल करण्यात आला.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. पोलीस अधीक्षक, आँचल दलाल यांचे तपास मार्गदर्शन व सुचनां प्राप्त करुन मा. वरीष्ठांनी गुन्हयाची उकल करुन १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करणेबाबत च्या प्राप्त सुचनांप्रमाणे विक्रम कदम, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, व प्रभारी अधिकारी, खोपोली पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली यांतील अज्ञात आरोपीत यांचा शोध घेण्याकामी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोसई अभिजीत व्हरांबळे व त्यांचे पथकाने तपास सुरु करुन घटनास्थळ व आजुबाजुचे परिसरातील असे एकुण २० ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक करुन त्या माध्यमातुन गुन्हयात वापरलेले वाहन निष्पन्न करुन त्यांचे मालक निष्पन्न केले. तसेच मोबाईल क्रमांकाच्या तांत्रीक विश्लेषणाद्वारे अज्ञात आरोपीत यांचा शोध घेत असताना दिनांक ०४.०७.२०२५ रोजी यांतील गुन्हयात वापरलेली रिक्षा क्र. एम.एच.०४/एल.एक्स. १८४६ हीचा शोध घेत असता आरोपीत नामे झुबेर एहसान शेख, वय ३४ वर्षे, रा.घौसी, जि. आजमगड, राज्य-उत्तरप्रदेश सध्या रा.लौजी, ता. खालापुर, जि. रायगड यास अटक करण्यात आले. त्यानंतर सदर आरोपीत याचेकडे तपास करुन त्याचे सहसाथीदार यांचा शोध घेत असताना पळुन गेलेले आरोपीत हे पिंपरी चिंचवड येथील एका दुकानावर वास्तव्यास असल्याबाबतची गोपनिय माहीती मिळाली होती परंतु सदरहु आरोपीत त्यठिकाणहुन पसार झाले होते. त्यनंतर त्यांचा पुणे, नाशिक व गुजरात याठिकाणी पाठलाग करुन अंकलेश्वर पोलीस ठाणे, गुजरात व स्था.गु.अ.शा. अंकलेष्वर, गुजरात यांच्या मदतीने यांतील एकुण ०३ पाहिजे आरोपीत यांना ताब्यात घेवुन अटक करण्यात आली असुन त्यांना मा. न्यायालयात हजर केल्यांनतर आरोपीत यांचे पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान गुन्हयात वापरलेली टाटा योध्दा पिकअप गाडी क्र. एम.एच.१४/जे.एल.०४८२ ही देखील जप्त करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचे तपासादरम्यान आणखी एक साथीदार मुंब्रा येथे असल्याची माहीती मिळाली त्यानुसार त्याचा शोध घेतला असता सदरहु आरोपीत यास कल्याण शिळफाटा येथुन ताब्यात घेतले आहे. त्यानंतर गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्येमाल हा कुठे विकला आहे याबाबत अटक आरोपीत यांचेकडे केलेल्या चोकशीमध्ये सदरचा मुद्येमाल हा सिराउजदीन इबारतुल्ला खान, रा. आक्सा इलेगन्स, रुम नं. १२०५, कुदळवाडी, चिखली पुणे यास ताब्यात घेवुन अटक करुन त्याचे ताब्यात गुन्हयातील चोरीस गेलेला सर्व मुद्येमाल जप्त करण्यात आलेला आहे. सध्या सदरहु आरोपीत हे दिनांक ११.०७.२०२५ रोजीपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहेत.
अटक आरोपीत यांची नावे :-
१) जुबेर एहसान शेख, वय-३४ वर्षे, रा. घौसी, जि. आजमगड, राज्य-उत्तरप्रदेश सध्या रा.लौजी, ता. खालापुर, जि. रायगड
२) आलम युसुफ मणियार, वय-३४ वर्षे, रा. पुनवले, गायकवाड नगर, रामविलास यांचे भंगार दुकान, पुणे मुळ रा. जमुनापुर, ईश्वर दासपुर, ता. रायबरेली, उत्तरप्रदेश
३) दिपक कपिलदेव तिवारी, वय-२२ वर्षे, रा. पुनवले, गायकवाड नगर, रामविलास यांचे भंगार दुकान, पुणे मुळ रा. माणकापुर, ता. तुळशीपुर देवीपाटण, जि. बलरामपुर, उत्तरप्रदेश
४) रामविलास चिकनु यादरव, वय-३२ वर्षे, रा.पुनवले, गायकवाड नगर, रामविलास यांचे भंगार दुकान, पुणे मुळ रा.जिलोकपुर, ता.इटावा, जि. सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश
५) जुबेर बहाब मेमन, वय-२९ वर्षे, रा. दोस्ती एमएस कंपाऊंड, हफिफा अपार्टमेंट, पहिला मजला, खडीगांव, शिळ डायघर, मुंब्रा, जि.ठाणे
६) सिराउजदीन इबारतुल्ला खान, रा. आक्सा इलेगन्स, रुम नं. १२०५, कुदळवाडी, चिखली पुणे
(नमुद अटक आरोपीत क्र. १ ते ६ हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांचेविरुध्द चोरी, घरफोडी, जबरी चोरी चे असे विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
हस्तगत करण्यात आलेली मालमत्ता :-
१) १,६५,०००/- रु. किं. ची पॉलीकॅब कंपनीची एफ. आर. पॅनल २.५ गज वायरचे ५५ बंडल
२) ६०,०००/- रु.किं.ची पॉलीकॅब प्लेक्झीबल २.५ गज वायरचे ६ बंडल
३) ३०,०००/- रु.किं. चे कॉपर लग्झचे ३० बॉक्स
४) ५,५००/- रु.किं.चे एफ. आर. पॅनल १.५ स्केअर एम.एम. केबलचे ५ बंडल
५) २४,०००/- रु.किं.चे एफ. आर. पॅनल ४ स्केअर एम.एम. केबल चे ६ बंडल
६) २२,०००/- रु.किं.चे एफ. आर. पॅनल ६ स्केअर एम.एम. केबल चे ४ बंडल
७) ८,०००/- रु.किं.चा पी.एल.सी. कंट्रोलर १ नग
८) ६०००/- रु.किं.ची पी.एल.सी. प्रोग्रामिंग केबल १० नग


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home