लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट व श्री कृपा क्लिनिक यांचा संयुक्त उपक्रम
खालापूर/सुधीर देशमुख :- डॅा.सुनील देवडीकर व डॅा.सुषमा देवडीकर हे दोन्ही पती-पत्नी आज गेली कित्तेक वर्ष खेडोपाड्यात व दुर्गम भागात रुग्णांची सेवा करत आहेत.गाव डोणवत तालुका खालापुर येथे त्यांचा श्री कृपा क्लिनीक हे रुग्णांसाठी व गोरगरीबां साठी फार उपयुक्त रुग्णसेवा मीळते.आज डॅा.सुनील देवडीकर यांचे श्री कृपा क्लीनीक आणि डॅा.सुहास हळदीपुरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांचा डोळ्यांचा फिरता दवाखाना एका मोबाईल व्हॅन ज्या मधे आत्याधुनीक सुविधानी त्यांच्या नीवडक डॅाक्टर व नर्स घेऊन डोळ्यांचा शिबीर एका दिर्घ कालावधी नंतर पुन्हा जन सेवेसाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ-या गुरवार या प्रमाणे सुरु करण्यात आले व ह्याचा तमाम जनतेने स्वागत करून उस्फुर्त प्रतिसाद दिला.या मधे डोळ्यांची तपासणी करून अल्प दरात चष्मा वाटप आणि मोतीबींदु चे निदान करण्यात आले.
समाजसेवक म्हणुन डॅा.सुनील देवडीकर आणि त्यांची पत्नी डॅा.सुषमा देवडीकर यांनी खुप सहकार्य केले त्याबद्दल लक्ष्मी आय हॅास्पीटल चे प्रतिनीधी श्री.मारुती गाडगे हे आभार व्यक्त करताना त्यांना सहकार्य करणारे सहकारी सीमा बेलोस्कर,अभिनव सर,अनिकेत सर,सलिम खान,व श्री कृपा क्लीनीकचे सहकारी अमृता भगत या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.



0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home