Tuesday, July 1, 2025

गोदरेज ॲन्ड बॉईस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने आदिवासी शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा रस्ता रोखल्याने आदिवासी शेतकरी व भीम आर्मी संघटनाचा धरणा आंदोलन.

 


कलेक्टर साहेब जागे व्हा तहसीलदार साहेब जागे व्हा!आदिवासी शेतकरी बांधव व भीम आर्मी संघटनाची न्यायासाठी जोरदार घोषणाबाजी!


कलेक्टर साहेब व तहसिलदार साहेब कंपनीच्या ईशाऱ्यावर? शेतकऱ्यांचा आरोप 


 खालापूर/प्रतिनिधी :- गोदरेज ॲन्ड बॉईस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने ५० ते ६० आदिवासी शेतकरी बांधवांच्या वडिलोपार्जित शेत जमीनीत जाणारा वहिवाटीचा रस्ता बंध केल्याने कष्टकरी शेतकरी बांधव शेती पासून वंचित राहिले असून शेतकरी बांधवांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचा संताप आदीवासी शेतकरी बांधवानी व्यक्त करीत संविधानिक पद्धतीने मंगळवार दि. १ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजे पासून खालापूर तहसील कार्यालयाच्या आवरात कलेक्टर साहेब जागे व्हा तहसीलदार साहेब जागे व्हा या घोषणा बाजी करत न्याय मांगण्या साठी भर पावसात धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. कलम ५ नुसार आम्ही आमच्या शेताकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता मिळण्यासाठी आमची मागणी आहे जो कंपनीने रोखला आहे. गोदरेज कंपनीच्या इशाऱ्या वरती कलेक्टर साहेब व तहसीलदार साहेब नासत्ता आहेत त्यामुळे आमचा निकाल देण्यासाठी ही लोकं उशीर करतात आहेत असा घाणाघात आरोप आंदोलन करते शेतकऱ्यांनी केला आहे. आम्ही याठिकाणी आंदोलनाची भूमिका घेतली आहे जर एक दोन  तासा मध्ये तहसीलदार साहेबांनी आम्हाला कोणता संदेश दिला नाही तर हे धरणे आंदोलन थांबून आमरण उपोषणाची घोषणा करीत या ठिकाणी संध्याकाळ पासून अमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येईल असा इशारा देखील आंदोलन करते शेतकरी बांधव व भीम आर्मी संघटने कडून देण्यात आला आहे.

दि.२१मे २०२५ रोजी मंडळ अधिकारी वावोशी व ग्राम महसूल अधिकारी डोणवत यांनी शेतकऱ्यांच्या समक्ष शेतकऱ्यांच्या शेताची स्थळ पाहणी करून पंचनामा केला व पंचनामेत नमूद केला की स. नं. २०/२ व ३०/२ ही जमीन मिळकत सदय स्थितीमध्ये पडिक स्वरूपात असल्याची दिसून आली आहे . स्थळ पाहणी वेळी प्रस्तुत जमीन या मिळकतीस सल्लगन पायवाट अथवा बैलगाडी रस्ता असल्याचे दिसून आले नाही.या ठिकाणी पोचण्यासाठी मोजे वडवल गावातून आलेल्या रस्त्याचे कंपनीचे गेट पासून अंतर सुमारे 3.500 कि.मि. आहे. असे दिसून आलेचा पंचनामा लिहिण्यात आला.तसेच दिनांक 08 एप्रिल 2025 रोजी तहसीलदार खालापूर यांना बिनशेती (NA order)साठी दिलेला आदेश रद्द करण्याबाबत मंडळ कार्यालय वावोशी यांच्या कडून जावक क्र:मं. अ. वावोशी/तक्रार/26/14/13/2024 पत्र देण्यात आले व ह्या पत्रात देखील याबाबत अर्जदार यांनी नमूद केलेले मौजे वडवळ येथील स.नं.20/2 व स.नं.30/2 बाबत या कार्यालयाकडून अनुक्रमे दि. 03/02/2023 व दि. 18/06/2024 रोजी अहवाल सादर करण्यात आलेले आहेत. तसेच प्रस्तुत प्रकरणी मा. दिवाणी न्यायाधिश खालापूर यांचेस्तरावर रे.मु.क्र.10/2023 व रे.मु.क्र. 21/2024 हे दावे प्रलंबित आहेत. सोबत मुळ अर्ज, अर्जदार यांचे दि. 20/03/2025 रोजी दिलेले लेखी म्हणणे, गोदरेज ॲन्ड बॉईस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि यांचे दि.04/04/2025 रोजी दिलेले लेखी म्हणणे, या कार्यालयाकडून दि.03/02/2023 व दि. 18/06/2024 रोजी सादर करण्यात आलेल्या अहवालांच्या प्रति जोडल्या आहेत असे पत्रात नमूद करण्यात आल्याचे पत्र देखील पत्रकारांना माहितीसाठी शेतकरी व संघटने करून देण्यात आले. तर दुसरीकडे आदीवासी शेतकरी बांधव व भीम आर्मी संघटनाने कडून संताप व्यक्त करीत माहिती देत आम्ही कलम 5 प्रमाणे तहसीलदार यांच्या कडून आम्ही शेतात जाण्यासाठी जुना रस्त्याची वहिवाट खुली करून मागत आहोत आम्ही नवीन रस्ता मांगत नाहीं स.नं.20/2 व स.नं.30/2
 टेटस कोप दिलेला आहे आम्हाला तिथे हुकूम मनाई केलेली आहे इथे कुठे मनाई केलेली नाहीं आणि कलेक्टर साहेबांना असे कुठे सांगितले नाहीं आहे जवळ मी निकाल देईन तो पर्येंत तुम्ही निकाल देऊ नये असा कुठेही लिहिलेले नाही कुठल्याच कागदावर लिहिलेले नाही आहे... असेल तर कलेक्टर साहेबांनी दाखवावा आम्हाला...कोर्टाचा पाठ वेगळा आहे हा पाठ वेगळा आहे...दिशा भूल करतात ती सर्वांची असा संताप व्यक्त करीत आंदोलन करते राजेश चव्हाण व प्रितेश पवार यांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले .

या वर्षी मे महिण्यापासूनच पावसाला सुरुवात झाली मात्र जून महिन्यात समाधान कारक पाऊस झाला असतांना खालापूर तालुक्यातील एका नामधारी कंपनीने आदिवासी कष्टकरी शेतकरी बांधवांच्या शेतीत जाणारा वहिवाटीचा रस्ता रोखल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ निर्माण करण्यात आली आहे असे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे .आपल्या कुटुंबा सोबत न्याय मांगण्यासाठी त्यांना भर पावसात धरणा आंदोलन करावे लागले आहे ही मोठी निंदनीय बाब आहे. धनदांडग्याना न्याय आणि शेतकऱ्यांवर अन्याय का? असा सवाल शेतकरी बांधवांनी उपस्थित केला आहे.आधीच आसमानी संकटामुळे शेतकऱ्याची कंबर मोडली असून बळीराजा प्रचंड अडचणीचा सामना करीत आहे. तर दुसरीकडे धनदांडग्याच्या मनमानी मुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे. आपल्या शेत जमिनीत जाण्यासाठी वहिवाटीचा रस्ता मिळवण्यासाठी तीन वर्षा पासून विनंती अर्ज, निवेदन देऊन शेतीची कामे सोडून शेतकऱ्यांना आंदोलन उपोषण करावे लागत आहे देशभरात शेतकऱ्यांनी शेती पीक काढणे बंध केल्यावर प्रदेशातून आणून हे लोकसेवक देणार का? रेशन दुकानदाराच्या रेशनिंग वर मिळणारे धान्य हे देखील शेतकऱ्याच्याच शेतात पिकून येत आहे कोणत्या कंपनीत पिकत नाहीं ह्याचा ही विचार लोकसेवकांनी करावा? खालापूर तालुक्यात दोन ते तीन वर्षा पासून शेतकऱ्यांचा धनदांडग्यान कडून छळ सुरु असतांना महसूल विभाग कार्यवाही करण्याची हिंमत का दाखवत नाहीं? तारीख पे तारीख देत शेतकऱ्यांसोबत कागदान वरच का खेळला जात आहे?हेच जर श्रीमंताची वहिवाटीचा रस्ता शेतकऱ्यांनी बंद केला असता तर दुसऱ्या दिवशी सुर्य निघण्या आधी सर्व महसूल कायदे समोर ठेऊन कार्यवाही करण्यात आली असती कायदा फक्त श्रीमंतासाठीच का? महसूल अधिकाऱ्यांना जाग येणार तरी कधी? गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळणार तरी कधी? असा संताप सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home