200 कामगार बारा वर्षापासून मोबदल्यापासून वंचित!
आमदार साहेब, केडीएल कंपनीच्या कामगारांना न्याय देण्यासाठी पुढाकार घ्या...कामगारांची आर्त हाक!
पगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा!हिशोब आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा!
कामगारांची कंपनीच्या गेटवर जोरदार घोषणाबाजी"
खालापूर / प्रतिनिधी :- खालापूर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात नामांकित असलेल्या के. डी. एल (कोप्रान) कंपनीत 1991 साली अनेक कामगार पर्मनंट झाले. हा कारखाना 29 एप्रिल 2013 सालापासून पूर्णत: बंद करण्यात आल्याने 200 कामगार व ठेकेदारीवर जवळपास 700 कामगार कार्यरत होते. या कामगारांच्या जीवावरच त्यांचे कुटुंब अवलंबून होते. कारखाना बंद पडल्यानंतर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या कामगारांचा हिशोब मिळावा, यासाठी व्यवस्थापनाबरोबर चर्चा सुरू असताना आश्वासनाखेरीज गेल्या 12 वर्षात एक कवडी सुद्धा कामगारांना मिळालेली नाही. हा कारखाना बारा वर्षापासून बंद असल्याने या बारा वर्षाच्या या कालावधीमध्ये कामगार वर्ग हा मोठ्या संकटात सापडला असून पैशांअभावी कामगारांच्या मुलींचे लग्न झाले नाही...कामगारांच्या मुलांना शिक्षण घेता आले नाही आणि प्रत्येक वेळेला 'तारीख पे तारीख' देण्यात आल्याने 200 कामगारांपैकी एकूण 19 कामगार हे ह्दयविकाराच्या झटक्याने तसच लखवा (पॅरालिसिस) सारख्या भयंकर आजाराने मृत्यू पावले आहेत.
हा कारखाना हा आ. महेंद्र थोरवे यांचे भाचे संकेत जनार्धन भासे व त्यांचे बिजनेस पार्टनर परेश नंदलाल शेट, रोशन प्रदीप शहा यांनी खरेदी केला. त्यांनतर कामगारांनी आमचा हिशोब द्यावा, आपण या मतदार संघाचे नेते आहात...त्यावेळी आम्ही तुमचा हिशोब महिन्या दोन महिन्यात देण्यासाठी प्रयत्न करतो तुम्ही याबाबत काळजी करू नका, असे आश्वासन निवडणूक काळात आ. थोरवे यांचे भाचे संकेत भासे यांनी दिले होते. मात्र, कामगारांना आश्वसनावरच ठेवून सदरची कंपनी एलएनटी लार्सन अँड टूब्रो कंपनीला विक्री केली आणि रग्गड नफा कमविला. मात्र, कामगार अद्याप आश्वासनावरच आहेत. या कामगारांना अद्याप हिशोब मिळालेला नाही, त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा अशी कामगारांनी मागणी कामगारांनी पत्रकार परिषद घेवून केली आहे.
आमदार व त्यांच्या पार्टनरांनी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि येत्या आठ दिवसांत या कामगारांना न्याय द्यावा अशी विनंती करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, कामगार मंत्री यांची आम्ही भेट घेणार आहोत आणि त्यांना ही आम्ही विनंती करणार आहोत की, आपल्या सत्तेतले आमदार त्यांनी ही जमीन खरेदी केली आहे. त्यांनी आम्हाला या मतदार संघाचा भाऊ समजून न्याय द्यावा अन्यथा आम्ही आंदोलनाचा मोठा पवित्रा घेणार आहोत, असा इशारा कामगारांचे नेते प्रशांत गोपाळे यांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले.
यावेळी कामगार संतोष केदारी, गजानन बैलमारे, किशोर घोसाळकर, प्रशांत गोपाळे, अनिल मोरसिंग, दिलीप बारड, शैलेश बैलमारे, चंद्रकांत बैलमारे, अशोक पाटील, सचिन पाटील, चणाराम मुआल, गुरुदत्त घोसाळकर, बाळासाहेब कदम, मनोहर कदम, सखाराम भेसरे, चंद्रकांत उजगावकर यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home