Tuesday, July 19, 2022

विद्याधर महाले यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव

प्रतिनिधी नागेश सुरंगे

प्रशासकीय व मंत्रालयीन कामाचा दांडगा अनुभव असणारे विद्याधर दयासागर महाले यांची, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव म्हणून नव्या सरकारमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते चिखलीच्या भाजप आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांचे पतीही आहेत.

विद्याधर महाले हे उच्चशिक्षित असून, स्पर्धा परीक्षेतून आधी त्यांची जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्ग २ पदावर नियुक्ती झाली होती. नंतर ते विधान परिषदेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते ना. भाऊसाहेब फुंडकर यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्त झाले व तेव्हापासून त्यांनी मुंबई व मंत्रालयीन कामात चांगलाच जम बसवला.

विनोद तावडे यांच्याकडे आधी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेत्यांचे त्याचे खाजगी सचिव व नंतर शालेय शिक्षण मंत्राचे सचिव म्हणून त्यांनी काम केले. युती सरकारच्या काळात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडेही ते होते. सत्तापालट झाल्यावर पुन्हा ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे आले, व आता परत भाजपा सत्तेत येताच उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना खाजगी सचिव म्हणून नियुक्ती दिली आहे. त्यांच्या या नियुक्तीने विशेषतः चिखली मतदारसंघासह बुलडाणा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

Tags:

आपला महाराष्ट्र आपला जिल्हा

विशेष

Saturday, July 16, 2022

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

  

मलकापूर प्रतिनिधी 

    भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मलकापूर येथे दिनांक 12/ 7/ 2022 रोजी सकाळी 11:30 वाजता भारतीय जनता युवा मोर्चाचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ येशी यांच्या नेतृत्वात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते भाजप युवा मोर्चाच्या 13 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

     त्यावेळी प्रमुख उपस्थिती मलकापूर भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष अमोल भाऊ टप, भाजपा युवा नेते रविभाऊ वानखेडे, कामगार आघाडी शहराध्यक्ष अजय बघे, साहेबराव खराटे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष sc सेल आकाश भाऊ गोरे,  ओम टप,देविन टाक, किशन सोनवणे ,आनंद निधाने,  राम बैरागी, प्रशांत पाटील, रवी पाटील, गजानन निंबाळकर, विकास गोरे, गोलू वाकोडे, विशाल ठाकूर,सागर तायडे, विशाल पाटील,ई. युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Labels: , , , , ,

हिंदी - मराठी पत्रकार संघाच्या मोताळा तालुका अध्यक्ष पदी सॅंडीभाऊ मेढे तर उपाध्यक्षपदी गणेश वाघ

  




मोताळा प्रतिनिधी :- 

पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करणारे सॅंडीभाऊ मेढे यांची हिंदी मराठी पत्रकार संघाच्या मोताळा तालुकाध्यक्ष पदी तर उपाध्यक्षपदी गणेश वाघ यांची नियुक्ती करण्यात आली.सदर निवड तळागळातील शोषित,पिडित,वंचितांना न्याय मिळवून द्यावा हीच आशा बाळगत निवड करण्यात आली आहे तर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघटना धनश्रीताई काटीकर यांनी नियुक्तीपत्र देऊन केली. मोताळा येथील पत्रकार  क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे  संदेश मेढे  यांची तालुका अध्यक्ष तर गणेश वाघ यांची तालुका उपाध्यक्ष हिंदी-मराठी पत्रकार संघटने च्या  पदी निवड करण्यात आली आहे.सदर निवड महाराष्ट्रातील तळागाळातील सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहाल व सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा हीच आशा बाळगत सदर निवड करण्यात आली आहे.

तर   महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघटना धनश्रीताई काटीकर यांनी नियुक्तीपत्र देऊन केली त्यावेळी ,  उल्हास शेगोकार तालुकाध्यक्ष,   अजय टप विदर्भ प्रसिद्धी प्रमुख,सतीश दांडगे विदर्भ सचिव, श्रीकृष्ण तायडे विदर्भ समन्वयक,  गौरव खरे जिल्हाध्यक्ष , कृष्णा मेसरे जिल्हा प्रवक्ता, स्वप्निल आकोटकर जिल्हा सचिव , नागेश सुरंगे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख , अनिल गोठी तालुका उपाध्यक्ष, श्रीकृष्ण भगत तालुका सचिव , 
शेख निसार सह संघटक,करण झनके तालुका संघटक,  कैलास काळे प्रसिद्धीप्रमुख तालुका,
विनायक तळेकर शहर सहसचिव,
 योगेश कुमार सोनवणे शहर सह संघटक, धर्मेश सिंह राजपूत संघटक , अनिल धनके शहर संपर्कप्रमुख, प्रदीप इंगळे संपर्कप्रमुख, प्रा प्रकाश थाटे, प्रमोद हिवराळे  हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र देऊन  निवड करण्यात आली आहे.

सदर निवडीबद्दल संदेश मेढे व गणेश वाघ यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Labels: , , , ,