स्ट्राँग रूम सिलबंद प्रक्रिया जाहीर
डिसेंबरला स्ट्राँग रूम सील, 3 डिसेंबरला मतमोजणीसाठी उघडणार - पारदर्शकतेला प्राधान्य
खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 च्या मतदान प्रक्रियेला वेग येत असताना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातर्फे स्ट्राँग रूम संदर्भातील महत्त्वाची अधिकृत सूचना जाहीर करण्यात आली आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा (EVM) सुरक्षितपणे साठवणे, त्यांची सीलबंद प्रक्रिया आणि मतमोजणीपूर्व उघडणी हे सर्व टप्पे पूर्ण पारदर्शकतेने आणि उमेदवार / प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात येणार आहेत.
* स्ट्राँग रूम सिलबंद प्रक्रियेचे वेळापत्रक :- स्ट्राँग रूम सिलबंद प्रक्रिया 2 डिसेंबर 2025 (मंगळवार) रात्री साधारण 10 वाजता (मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर) सेंट मेरी स्कूल, डी.पी. रोड, शेडवली, खोपोली, स्ट्राँग रूम उघडणे...या प्रक्रियेस सर्व उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील. EVM स्ट्राँग रूममध्ये ठेवताना सील कशा प्रकारे लावली जाते हे संबंधितांना प्रत्यक्ष पाहता येईल.
मतमोजणीकरीता 3 डिसेंबर 2025 (बुधवार) सकाळी 9.30 वाजता सेंट मेरी स्कूल, डी.पी. रोड, शेडवली, खोपोली उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांनी नियोजित वेळी अनिवार्य उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मतमोजणी सुरू करण्यापूर्वी स्ट्राँग रूम उमेदवारांच्या उपस्थितीत उघडण्यात येईल. हा टप्पा निवडणूक प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा असून पूर्ण पारदर्शकतेने राबविला जाणार आहे.
* उमेदवार व प्रतिनिधींसाठी महत्त्वाच्या सूचना :- उपस्थित राहणाऱ्यांकडे वैध ओळखपत्र असणे अनिवार्य, सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन, निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन बंधनकारक, स्ट्राँग रूम परिसरात अनावश्यक गर्दी, गोंधळ किंवा नियमभंग टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही प्रक्रिया निवडणुकीतील शुचिता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता जपण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
* लोकशाही बळकट करण्याचा निर्णायक टप्पा :- या अधिसूचनेमुळे खोपोली नगर परिषद निवडणुकीतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व अधिक दृढ होणार असून, नागरिकांचा निवडणूक व्यवस्थेवरचा विश्वास आणखी वृद्धिंगत होईल. निवडणूक प्रक्रिया कोणत्याही शंकेस तोंड न देता निष्पक्षपणे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा संकल्प या सूचनेतून स्पष्ट होत आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home