Posts

Showing posts from November, 2025

पूरग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे वाटप

Image
             देगलूर/जावेद अहमद :- आज दिनांक 28 /11 /2025 रोजी नाम फाउंडेशन व बीएसएफ संस्थेअंतर्गत पूरग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला मानवी हक्क अभियान मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र गवाले यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले त्यामध्ये पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शेतकरी महिलांना बियाणे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला.       त्यासोबतच क्रिसील फाउंडेशनच्या रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत चालणारा प्रकल्पाद्वारे देगलूर तालुका समन्वयक संगीता वाघमारे यांनी गावातील महिलांना आर्थिक साक्षरता याविषयी माहिती दिले विमा पेन्शन सुकन्या योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा, प्रधासनमंत्री जीवन ज्योती विमा, अटल पेन्शन, डिजिटल व्यवहार,नामांकन व रिकेवायसी तसेच बचत गुंतवणूक, आर डी एफ डी,आणि पीपीएफ योजना याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी असंख्य महिला असंख्य महिला, शेतकरी उपस्थित होते.

खोपोलीकरांच्या मनातील कोहिनूर कोण ?

Image
  * नगराध्यक्षपदावर कुणाची मोहोर बसेल ?   सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीवर संताप, समस्यांचे डोंगर आणि मतदारांचा थेट सवाल - अजून किती वर्षे संधी द्यायची आणि खोपोलीचा सत्यानाश करून घ्यायचा ? खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक केवळ काही दिवसांवर येऊन ठेपली असून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. जुन्या - नव्या उमेदवारांचा उत्साह, मोठ्या नेत्यांच्या सभा, आरोप - प्रतिआरोपांनी रंगणारा प्रचार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदारांच्या मनात निर्माण झालेले असंतोषाचे वादळ, या सर्वांमुळे खोपोलीची निवडणूक अधिकच रोचक झाली आहे. या पार्श्वभूमीवर खोपोलीकरांचा थेट सवाल असा आहे की, “इतकी वर्षे सत्ता देऊन काय झाले ? आता पुन्हा त्यांनाच संधी द्यायची आणि खोपोलीचा सत्यानाश करून घ्यायचा का ?  * खोपोलीकरांच्या डोळ्यांतला राग - उमेदवारांच्या दाव्यांना मूक विरोध ? :- प्रत्येक उमेदवार आपापली ताकद दाखवत आहे. एक संधी द्या, आम्ही विकास करतो...शहराचा विकास आमच्यामुळेच झाला, असे दावे करीत आहेत. तर दुसरीकडे मोठमोठ्या सभांमध्ये नेते एकमेकांवर टीका करीत राजकीय वातावरण तापवत आहेत. परंतु ...

रविवारी खोपोलीत महायुतीची शक्तीमेळावा सभा

Image
  नगराध्यक्षपदाच्या रणधुमाळीत कुलदीपक शेंडे यांच्या प्रचाराला वेग प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन ; शिवसेना, भाजप व आरपीआयचे दिग्गज नेते एकत्र - ‘धनुष्यबाण’ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर महायुतीतर्फे भव्य शक्तिप्रदर्शन जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून सभेसाठी शहरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. महायुतीचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक रामदास शेंडे यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केली आहे. या सभेचे प्रमुख मार्गदर्शक भाजप प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री रवींद्र चव्हाण असून खोपोली शहरातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. * महायुतीची निवडणूक मोहीम निर्णायक टप्प्यात :- या सभेत महायुतीचे दिग्गज नेते एकत्र येणार आहेत. यामध्ये प्रमुख उपस्थिती मा.आ. रवींद्र चव्हाण (प्रदेशाध्यक्ष, भाजप), आमदार प्रसाद लाड, आमदार अप्पासाहेब गोगावले, आमदार श्रीधर पाटील, आमदार महेंद्र थोरवे, आमदार प्रशांत ठाकूर तसेच शिवसेना, भाजप आणि आरपीआय (आठवले गट) यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी या सर...

“आरोग्यसमृद्धी प्रकल्पांतर्गत पौष्टिक रेसिपी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद"

Image
  खालापुर/प्रतिनिधी :- निरामय हेल्थ फाऊंडेशन व गोदरेज इंटरप्राइजेस ग्रुप यांच्या संयुक्त सहयोगाने आरोग्यसमृद्धी प्रकल्प अंतर्गत महिलांसाठी पोषणयुक्त पाककृती स्पर्धा / पौष्टिक रेसिपी स्पर्धा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात एकूण 37 महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान महिलांनी आपल्या पोषणयुक्त पाककृतीची माहिती दिली.  या कार्यक्रमास परीक्षक म्हणून डायजेशन म्हणून सौ अनामिका शर्मा व डॉ. जिज्ञासा पाटील उपस्थित होत्या. मार्गदर्शक म्हणून ग्रुप ग्रामपंचायत वडवळ चे सरपंच Dnyaneshwar सुतार, गोदरेज इंटरप्राइसेस ग्रुपचे सी. एस.आर. प्रमुख तानाजी चव्हाण, ग्रुप ग्राम पंचायतचे सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होते. तसेच निरामय हेल्थ फाउंडेशन चे प्रकल्प समन्वयक मंगेश भंडारे, स्वप्नील कदम हेल्थ वर्कर दर्शना मरागजे, साक्षी खामकर, पौर्णिमा गायकवाड, नेहा राजपुरकर, जागृती पवार, वैशाली बलकवडे तसेच ग्रुप ग्राम पंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

खोपोलीच्या विकासासाठी आघाडीची एकजूट !

Image
  उपमुख्यमंत्री अजित पवार : कार्यकर्त्यांनी मतभेद न ठेवता सुनील पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा ! खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचाराला मोठी गती मिळाली असून, आज डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भव्य जाहीर सभा पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे), शेतकरी कामगार पक्ष आणि सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टी यांच्या संयुक्त परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉं. सुनील गोटीराम पाटील यांच्यासह सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती.   सभेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह आघाडीतील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. * खोपोलीच्या विकासासाठी ही निवडणूक निर्णायक :- सभेला संबोधित करताना अजित पवार म्हणाले की, खोपोली शहराचा सातत्याने आणि नियोजनबद्ध विकास करणे हेच परिवर्तन विकास आघाडीचे एकमेव उद्दिष्ट...

खोपोलीत आज अजित पवारांची जाहीर सभा

Image
  * परिवर्तन विकास आघाडीसाठी उमेदवारांना बळ * डॉ. सुनील पाटील नगराध्यक्षपदासाठी सक्षम * खोपोलीच्या विकासाला नव्या वाटा - संतोष चौधरी खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचाराने वेग घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे), शेतकरी कामगार पक्ष व सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टी यांच्या संयुक्त परिवर्तन विकास आघाडीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉं. सुनील गोटीराम पाटील यांच्यासह सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आज भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर, रात्री 8 वाजता होणार आहे. * खोपोलीला उभारी देण्यासाठी घड्याळाच्या बटणावर एकत्र या - संतोष चौधरी :- पोलिस मित्र संघटना, नवी दिल्लीचे संस्थापक अध्यक्ष संतोष चौधरी यांनी परिवर्तन आघाडीच्या प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. त्यांनी खोपोलीकरांना आवाहन ...

खोपोली नगराध्यक्षपदावर ‘बदलाची चाहूल’

Image
  अपक्ष उमेदवार किशोर साळुंके यांचा घराणेशाहीवर जोरदार प्रहार  ‘ कार्यक्षमता शून्य, घराणेशाही पूर्ण’ - सुज्ञ मतदारांचा जळजळीत सवाल   क्रिकेट मैदानानंतर राजकारणातही विजयी षटकार ठोकण्याचा निर्धार खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्याच घराण्यातून नगराध्यक्ष पद भूषविणाऱ्या उमेदवारांवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “गेली अनेक वर्ष सत्ता दिली, तरी शहराचा विकास काहीच दिसला नाही… मग आता काय घंटा विकास करणार ?” असा रोखठोक प्रश्न मतदारांनी उपस्थित केला आहे. अशा पार्श्वभूमीवर बहुजन यूथ पँथर पुरस्कृत अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किशोर साळुंके यांनी जोरदार प्रवेश करीत घराणेशाही विरुद्ध जनतेचा मुद्दा अधिक ठळकपणे मांडला आहे. क्रिकेटपटू, पत्रकार आणि युवा नेतृत्वाची ओळख असलेले साळुंके यांना ‘बॅट’ हे निवडणूक चिन्ह मिळाले असून, शहरात “राजकारणाच्या मैदानातही विजयी षटकार ठोकणार” अशी चर्चा रंगली आहे. * गेल्या अनेक वर्षांचा शून्य विकास :- शहरातील मूलभूत सुविधांपासून रस्ते, पाणी, सांडपाणी...

आरटीआय माहिती रोखल्याचा आरोप!

Image
  अधिकारी व कर्मचार्‍यांवर विभागीय चौकशीची मागणी एनएचएममधील कथित आर्थिक अनियमिततेच्या तपासातील कागदपत्रे जाणीवपूर्वक न पुरविल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार अधिनियमाच्या उल्लंघनाबाबत दंडात्मक कार्यवाहीची देखील मागणी अधिकारी व कर्मचार्‍यांवर विभागीय चौकशीची मागणी   एनएचएममधील कथित आर्थिक अनियमिततेच्या तपासातील कागदपत्रे जाणीवपूर्वक न पुरविल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार अधिनियमाच्या उल्लंघनाबाबत दंडात्मक कार्यवाहीची देखील मागणी कर्जत / खलील सुर्वे :- एनएचएममध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या फिरती बिलांमध्ये झालेल्या कथित निधी अपहारासंदर्भातील माहिती मागितली असूनही, संबंधित अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर माहिती न देता कायद्याचा भंग केल्याचा गंभीर आरोप एका अर्जदाराने केला आहे. या प्रकरणी विभागीय चौकशीसह दंडात्मक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. * आरटीआय अर्ज, अपील…तरीही माहिती गायब :- 13 ऑगस्ट 2025 रोजी अर्जदाराने माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 6 (1) अन्वये एनएचएममधील खर्च नोंदी व संबंधित कागदपत्रांच्या प्रती मागितल्या होत्या. कायद्यानुसार 30 दिवसांत माहिती देणे बंधनकारक असतानाह...

खोपोली प्रभाग क्रमांक 10 महायुती प्रचार जोमात...

Image
  * 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना वाहिली आदरांजली..... खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 ची राजकीय रणधुमाळी तीव्र झाली असून प्रभाग क्रमांक 10 मधून उज्ज्वला प्रमोद महाडिक यांच्या प्रचाराला नागरीक सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे उमेदवारांनी सांगितले. स्थानिक महिला मंडळ, मित्र परिवार, तरुणाई आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे या प्रभागात प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. * तीनही उमेदवारांना नागरिकांचा पाठिंबा :- खोपोली नगरपालिकेची निवडणूक भाजप, शिवसेना शिंदे गट आणि आरपीआय या महायुतीच्या माध्यमातून लढवली जात आहे. प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार उज्ज्वला प्रमोद महाडिक, हरिश काळे, ॲंड. अनिता पवार हे आहेत. यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे महायुतीचे उमेदवार कुलदिपक शेंडे यांच्या प्रचाराचा ज्वर ही चढला आहे. 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या प्रचार रॅलीत शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी नागरिक, महिला आणि युवक, युवती मोठया संख्येने उपस्थित होते. 

सगरोळी व सगरोळी परिसरातील विज ग्राहकाना जास्तीचे आलेले बिले आठ दिवसात कमी करुन देण्याच्या अश्वासन नंतर आदोलन माघार

Image
  बिलोली /प्रतिनिधी :-  बिलोली तालुक्यातील सगरोळी व सगरोळी परिसरात जबरदस्तीने विद्युत विभाग स्मार्ट मिटर बसवले आहे सदरील स्मार्ट मिटर सुरुवातीच्या दोन महीने कमी रिडिंग पळत आहे दोन महीन्याच नंतर तेच मिटरचे रिडींग डबल होत आहे या मुळे विद्युत ग्राहकांच्या मनात स्मार्ट मिटर संबधात संशय आहे अनेक ग्राहकांना पच्चावन हजार,एकत्तीस हजार,आठ्ठावीस हजार बिले देण्यात आले. दोन फॅन दोन ब्लफ असलेल्या ग्राहकाला एवढे मोठी रक्कम असलेले बिले येत आहेत या मुळे आनेक विज ग्राहाक विद्युत विभागाच्या अधिकारी समोर रोष व्यक्त केले आहे. विज ग्राहकांचे मिटर तापसणी करुन जास्तीचे येत असलेले विज बिल आठ दिवसात कमी करुन देण्याच्या अश्वासना नंतर सगरोळी परिवर्तन समितीच्या वतीने चालु असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.  या वेळी विश्वनाथ समन,शंकर महाजन,शिवकुमार बाबणे,प्रभु मुत्तेपोड,बाबु उस्केलवार,सुनिल खिरप्पावार,राजु बामने, शेख मुर्तृज,सचिन कल्लोड,आदिनाथ बाबणे,बाबु पिंजारी,बसस्वेश्वर मुगळे,पांडुरग इबीतवार,विजय शिंदे,वैभव भोसले, संजय पद्दमवार,कोडलांडे नागोराव सह शेकडो नागरीक उपस्थीत होते.यानंतर विज ग्राहकास व...

नांदेडमध्ये महिला नायब तहसीलदाराला रंगेहात अटक

Image
रेशन दुकानदाराकडून 5,700 रुपयांची मागणी - लाचलुचपत विभागाचा सापळा नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर अडचणीत नांदेड / प्रतिनिधी :- सरकारी अधिकाऱ्यांचा लाखो रुपयांचा पगार असूनही लाच घेण्याचा मोह सुटत नाही, याची चित्तथरारक उदाहरण म्हणून नांदेडमधील एक प्रकरण समोर आले आहे. हदगाव तालुक्यातील महिला नायब तहसीलदार सुमन संभाजी कऱ्हाळे यांना अवघ्या 5,700 रुपयांच्या लाचेच्या व्यवहारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या घटनामुळे हदगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. * रेशन योजनेतील ‘कमिशन’ म्हणून 20 टक्के रक्कम :- तक्रारदार हा हदगाव तालुक्यात रेशन दुकान चालवणारा दुकानदार आहे. त्याला चार महिन्यांचा धान्य पुरवठा झाला असून त्यातून 5,700 रुपयांचे कमिशन प्राप्त झाले होते. याशिवाय नोव्हेंबर महिन्याचे धान्य ई-पॉज मशीनवर अपलोड झाले नव्हते तसेच 27 नवीन लाभार्थ्यांची नावे अपलोड करणे आवश्यक होते. यासाठी तक्रारदार 18 नोव्हेंबर रोजी नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे यांच्या भेटीस गेले. तेव्हा त्यांनी चार महिन्यांच्या 57 हजार रुपयांवर 20% रक्कम म्हणजेच 11,400 रुपये लाच म्हणून मागणी केली. शेवटी ...

गुरुकुल ऑलिंपिक 2025 ची शानदार सुरुवात

Image
रायगड जिल्ह्यातील 32 शाळांचा सहभाग चौक / प्रतिनिधी :- श्री स्वामीनारायण गुरुकुल आंतरराष्ट्रीय शाळेत आयोजित ‘गुरुकुल ऑलिम्पिक २०२५’ या भव्य क्रीडा स्पर्धेला आज बुधवार दि. २६ नोव्हेंबर २०२५ ला सकाळी १०. ०० वा.शाळेचे संचालक परमपूज्य आदरणीय विश्वमंगलदास स्वामीजी आणि परमपूज्य ब्रम्हस्वरूपदास स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली व शाळेचे प्राचार्य डॉ. हरिबाबू रेड्डी सर यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात सुरुवात झाली. उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून विशाल पवार सर (API), सुनील गायकवाड (माजी उपसरपंच), सुधीर माने (अध्यक्ष, न्यू जर्नलिस्ट असोसिएशन महाराष्ट्र) व आबासाहेब मोरे सर, शिवाजी भासे, शाळेचे सर्व शिक्षकवर्ग आणि असंख्य विद्यार्थी वर्ग मोठ्या उपस्थित होते.        या स्पर्धेमध्ये सुमारे ३२ शाळांनी सहभाग नोंदवला असून चार तालुक्यांतील शेकडो विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारांत आपली प्रतिभा सादर करणार आहेत. स्पर्धा २६, २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी तीन दिवस सुरू राहणार असून विजेत्या खेळाडूंची पुढील नामांकन प्रक्रियेसाठी निवड केली जाणार आहे.       उद्घाटन सोहळ्यात मान्यव...

प्रभाग क्रमांक 1 मध्ये सुजाता जारे यांचा प्रचार - नव्या नेतृत्वाची चाहूल

Image
  खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगूल वाजताच प्रभाग क्रमांक 1 मधील राजकारणाला नवा मोड मिळाला आहे. यंदा ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने अनेक अनुभवी नेत्यांसह नव्या उमेदवारांमध्येही चुरस निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रभागामध्ये ठळकपणे उदयास आलेला नवा चेहरा म्हणजे सुजाता कैलास जारे. राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुजाता जारे यांच्या प्रचाराला सुरुवात होताच प्रभाग क्रमांक 1 मध्ये बदलाची नवी हवा जाणवू लागली आहे. * नवीन स्वप्न, नव्या विचारांची उमेदवार :- सुजाता जारे या शिक्षित, सामाजिक जाण असलेल्या नव्या पिढीतील उमेदवार आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळताच त्यांच्या प्रचाराला मोठी गती मिळाली आहे. जनसंपर्काच्या मोहिमेत लोकांकडून नव्या नेतृत्वाची अपेक्षा, तरुण विचारांना संधी, स्वच्छ व पारदर्शक कारभाराची मागणी...अशा भावना मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहेत. सुजाता जारे यांच्या प्रचारसभांमध्ये, पायदळ दौऱ्यांमध्ये आणि घरोघरी संपर्क मोहिमेत मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. * प्रभा...

खोपोली प्रभाग क्रमांक 10 मध्ये महायुती चा प्रचार जोमात

Image
  * शिवशक्ती - भीमशक्ती एकत्र, महायुती उमेदवारांना प्रतिसाद * विकासाच्या वचननाम्यासह प्रचार रॅलींना मोठी गर्दी खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 ची राजकीय रणधुमाळी तीव्र झाली असून प्रभाग क्रमांक 10 मधून उज्ज्वला प्रमोद महाडिक,हरिश काळे, ॲंड. अनिता पवार यांच्या प्रचाराला नागरीक सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे उमेदवारांनी सांगितले. स्थानिक महिला मंडळ, मित्र परिवार, तरुणाई आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे या प्रभागात प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. * विकासाचा ठोस वचननामा जाहीर - शिळफाटा नगरीत बदलाची हाक :- शिळफाटा आणि प्रभाग क्रमांक 10 चा विकास कसा असावा, कोणत्या सुविधा उभ्या रहाव्यात याचा सविस्तर वचननामा शिवसेना - आरपीआय महायुतीच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे. शिळफाटा नगरीत खऱ्या अर्थाने बदल घडवून आणण्यासाठी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे, असे आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी प्रचार रॅलीत बोलताना सांगितले. * तीनही उमेदवारांना नागरिकांचा पाठिंबा :- खोपोली नगरपालिकेची निवडणूक भाजप, शिवसेना शिंदे गट आणि आरपीआय या महायुतीच्या माध्यमातून लढव...

खालापूर नगरपंचायतीचा घरपट्टी वाढीचा ठराव रद्द

Image
  नागरिकांच्या बैठकीत प्रशासनाचा निर्णय स्पष्ट   नवीन कारवाईची प्रक्रिया लवकरच सुरू   दोन दिवसांत अधिकृत जाहीर सूचना - तरीही पाच गावांतून सामाईक अर्ज सादर करण्याची नागरिकांची तयारी खालापूर / प्रतिनिधी :- 24 नोव्हेंबर 2025 रोजी नगर पंचायत खालापूर कार्यालयात आयोजित नागरिकांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत घरपट्टी कर वाढीबाबत मोठा निर्णय जाहीर करण्यात आला. या बैठकीस नगराध्यक्षा रोशना मोडवे, उपनगराध्यक्ष संतोष जंगम, तसेच स्विकृत नगरसेविका शिवानी जंगम व सुप्रिया साळुंखे आदी उपस्थित होते.   घरपट्टी वाढीचा ठराव रद्द :- बैठकीत झालेल्या चर्चेनंतर खालापूर नगरपंचायतीने घरपट्टी कर वाढीचा ठराव अधिकृतपणे रद्द केल्याची माहिती प्रशासनाने दिली. यामुळे या वाढीव कराच्या विरोधात करावयाच्या हरकती / आक्षेप सादर करण्याची आवश्यकता आता उरलेली नाही, हेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.   नवीन प्रक्रिया नव्याने :- घरपट्टीसंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने बैठकीत स्पष्ट केले. यासाठी आवश्यक तयारी सुरू असून, विषयाची सर्वसमावेशक व पारदर्शक हाताळणी करण्याचा प्रयत्न अ...

नेरळ पोलिस ठाणे हदीत बोरले गावच्या रोड लगत असलेल्या गोल्ब फँटासिया बांधकाम साईडवर चोरी

Image
    आरोपीना नेरळ पोलिसांनी केले जेरबंद कर्जत/नरेश जाधव  :-  नेरळ पोलीस ठाणे हद्दीत बोरले रोड लगत ग्लोब फँटासिया साईड मधे लोखंडी रॉड व सिमेंट गोणी चोरी झाल्या असल्या बाबत नेरळ पोलिस ठाणे येथे गु र. नंबर 207/2025 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.           सदर गुन्ह्याचा नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो हवालदार वाघमारे, पोलिस शिपाई केकाण, बेंद्रे, वांगणेकर यांनी ग्लोब फँटाशिया साईड मधील सीसीटीव्ह फुटेज तपासले असता ते बंद स्थितीत होते.        त्यानंतर सदर गुन्ह्याचा तांत्रिक तपास व गोपनीय माहिती द्वारे तपास करून आरोपी, राकेश लक्ष्मण पारधी वय-30 वर्षे,तबारक हुसैन अब्दुल्ला खान वय-34 वर्षे, रवींद्र दत्ता कांबळे वय-28 वर्षे,अतिश रामचंद्र चहाड, वय-33 वर्षे यांना पोलीस ठाणे येथे आणून त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे कडे चौकशी केली असता त्यांनी सदरची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीत यांना न्यायालयात हजर केले असता 04 दिवस पोलीस कोठडी मिळाली असून. तपासामध्ये ...

खोपोली नगरपरिषद निवडणुकीसाठी पोलिसांची कडक तयारी

Image
  दंगा काबू योजना व रूट मार्चच्या माध्यमातून निवडणुकीत कसून सज्जता * खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉं. विशाल नेहुल यांचा पाहणी व सुरक्षा आढावा दौरा खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 शांततामय, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त पार पाडण्यासाठी रायगड जिल्हा पोलिस प्रशासन या निवडणुकीत अधिक कठोर आणि सक्रिय भूमिकेत उतरले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉं. विशाल नेहुल व खोपोली पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांनी शहरातील सर्व प्रभागांना भेट देत निवडणूक यंत्रणेची सखोल पाहणी केली. आजच्या पाहणीदरम्यान डॉं. विशाल नेहुल यांनी कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. “निष्पक्ष, निर्भय आणि दबावमुक्त निवडणूक हा पोलिस प्रशासनाचा स्पष्ट हेतू असून, कोणत्याही प्रकारची अनुचित हालचाल सहन केली जाणार नाही,” असा ठाम इशारा त्यांनी दिला. विशेष दक्षता, वाढीव गस्त आणि संशयितांवर बारकाईने नजर ठेवण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. 2 डिसेंबर 202...

निवडणूक तयारीला वेग - दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाचा शुभारंभ

Image
  खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 : निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण  खोपोली / फिरोज पिंजारी :- खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, कार्यक्षमता आणि शिस्तबद्धता राखण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाला आज अधिकृत सुरुवात झाली. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खोपोली नगर परिषद निवडणूक कामकाजाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. खालापूर येथील लायन्स क्लब सभागृह, गुडलक चौक, जुन्या मुंबई-पुणे महामार्ग, खोपोली येथे आयोजित या प्रशिक्षण सत्राला निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी (कर्जत) प्रकाश संकपाळ, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार खालापूर अभय चव्हाण तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा खोपोली नगर परिषद मुख्याधिकारी पंकज पाटील हे उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या माध्यमातून मतदान केंद्रांची जबाबदारी, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची हाताळणी, मतदान प्रक्रियेतील...

खोपोली नगरपरिषदेच्या थेट उमेदवार कुलदीपक शेंडेसह महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या - उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आवाहन....

Image
    खालापूर/ प्रतिनिधी :- खोपोली, कर्जत माथेरान यांच्या होऊ घातलेल्या नगरपरिषदांच्या निवडणूक आठ दिवसावर येऊन ठेपल्याने खोपोली लायन्स क्लब येथे शिवसेना भाजप व आर पी आय महायुतीचे महाप्रचार सभा 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पार पडली.   या सभेत प्रस्ताविक करताना भाजपा जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन करून ही निवडणूक महत्त्वाचे असून आपण त्याकडे चाणाक्ष वृत्तीने पाहिले पाहिजे. कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील या नगर परिषदेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कुलदीपक शेंडे असून त्याला नगराध्यक्ष बनवण्यासाठी तुम्ही आम्ही मेहनत घेऊन नियोजनबद्ध काम करून आपण केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोचवून त्याचे महत्त्व पटवून द्यायला पाहिजे. त्यानंतर मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले व रेल्वे सारख्या समस्या याबाबतीत केंद्रापर्यंत पाठपुरावा करीन असे सांगेतले यानंतर महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आमदार खासदार यांच्या कार्याबद्दल व त्यांनी केलेल्या विकास कामांचे माहिती देऊन खोपोली नगर परिषदेत थेठ नगराध्यक्ष ...

महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदिपक शेंडे यांना निवडून आणणारच !

Image
  आमदार महेंद्र थोरवे यांना विजयाचा विश्वास  * स्वत: उमेवाराच्या प्रचार रॅलीमध्ये शामिल   * शिवसेना, भाजपा, आरपीआय महायुतीचे उमेदवार एकत्र मैदानात * मागील पाच वर्षातील विकासकामांवर मतदारांचा विश्वास खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली नगरपालिकेच्या 2 डिसेंबर 2025 ला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचार मोहीमेला वेग आला आहे. शिवसेना, भाजपा आणि आरपीआय महायुतीचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीप शेंडे यांच्या समर्थनार्थ मोठा प्रचारदौरा राबविण्यात येत असून आमदार महेंद्र थोरवे स्वतः प्रचार रॅलीमध्ये सहभागी होऊन आपल्या उमेदवारांना पाठिंबा देत आहेत. रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक, शिवसैनिक आणि महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.  याप्रसंगी आमदार थोरवे म्हणाले की, मागील पाच वर्षांत राज्य सरकारच्या माध्यमातून खोपोलीत महत्त्वाची विकासकामे झाली आहेत. विधानसभा निवडणुकीत खोपोलीकरांनी मला भरघोस पाठिंबा दिला होता. त्याच विश्वासावर 2 डिसेंबरला महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीप शेंडे आणि सर्व 1 ते 15 प्रभागातील उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी ...

जागावाटपात फसवणूक झाली !

Image
  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा  आरोप * उमेदवारांसमोर राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याने तणाव * खोपोलीत परिवर्तन विकास आघाडीत बिघाडी * अजित पवार गटाबाबत शिवसेना ठाकरे गटात नाराजी खोपोली / केपी न्यूज ब्युरो :-  खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 चे बिगुल वाजताच सर्व पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. अनेक ठिकाणी युती, आघाड्या आणि काही ठिकाणी स्वतंत्र लढती अशी विविध राजकीय समीकरणे तयार होत आहेत. याच पार्श्वभूमीवर परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची भूमिका असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यात आज मोठी दरी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले. * जागावाटपात आमची फसवणूक :-  आज खोपोलीत शिवसेना (उद्धव) गटाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत गंभीर आरोप करण्यात आले. उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत व तालुकाध्यक्ष एकनाथ पिंगळे यांनी खुलासा केला की, आम्ही 10 ते 12 जागा मागितल्या होत्या. राष्ट्रवादीने 10 ऐवजी 8, त्यानंतर 5 जागा देण्याची तयारी दाखवली. तरी सुद्धा ज्या 3 जागांवर तडजोड केली होती, त्या प्रभागातही त्यांनी स्वतःचे उमेदवार उभे केल...

माघारीनंतरचे चित्र बदलले !

Image
  खोपोली नगराध्यक्ष निवडणूक : सुधाकर घारे यांचे गणित चुकले का ? सुनील पाटील - रा. काँ. समोर नव्या अडचणी * उध्दवसेनेची स्वबळावरची लढत, काँग्रेसचा पंजा, आपचा प्रभाव आणि पत्रकार साळुंके - मतांचे ‘गणित’ पूर्णपणे ढवळून निघाले! खोपोली / फिरोज पिंजारी :- खोपोली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत माघारीनंतर आज निर्माण झालेले राजकीय वातावरण महायुतीच्या कुलदिपक शेंडे यांच्या बाजूने झुकतांना दिसत आहे. तर दुसरीकडे परिवर्तन विकास आघाडीचे डॉं. सुनील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासमोर नवे प्रश्न उभे राहत आहेत. * उध्दवसेनेचे 8 ते 8.5 हजार “फ्लोटिंग” मते अनिश्चित :- शिवसेना (उध्दव ठाकरे) स्वबळावर मैदानात उतरली असून, त्यांची 8 ते साडे आठ हजार मते कुणाकडे वळणार, हे दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. या मतांचे काय होणार ? हे सर्वात मोठे कोडेच आहे. * काँग्रेसचे तौफीक करजीकर ठाम :- काँग्रेसचे उमेदवार तौफीक करजीकर यांच्या पाठीमागे त्यांचि नातेवाईक वर्ग, अल्पसंख्याक समाजातील विश्वासू मतदार, त्यांचा मित्र परिवार आणि काँग्रेसच्या पारंपारिक ‘पंजा’ वारकऱ्यांची मते अंदाजे 5 ते 6 हजार आहेत. ही मते म...

माझी लढाई खोपोलीच्या विकासासाठी

Image
  * मी निवडून आलो तर माझा संकल्प, माझा वचननामा खोपोलीकरांसाठीच! * अपक्ष उमेदवार किशोर साळुंके यांचे मतदारांना थेट आवाहन * नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार किशोर साळुंके यांची लोकाभिमुख घोषणा * क्रीडा, पायाभूत सुविधा, आरोग्य, सामाजिक सेवा आणि पारदर्शक प्रशासनाचे आश्वासन * खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 - अपक्ष उमेदवाराचा दमदार वचननामा जाहीर खोपोली / मानसी कांबळे :- नगर परिषद निवडणूक 2025 ची राजकीय रणधुमाळी रंगात आली असून, अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किशोर साळुंके यांनी खोपोलीकरांसाठी आपला व्यापक संकल्प व वचननामा जाहीर केला आहे. माझी लढाई कुणाविरुद्ध नाही, माझी लढाई खोपोलीच्या विकासासाठी आहे, अशा शब्दांत त्यांनी मतदारांना थेट आवाहन केले. पत्रकार साळुंके यांनी मांडलेला वचननामा खोपोलीतील क्रीडा, आरोग्य, पायाभूत सुविधा, हातगाडीधारकांचे प्रश्न, अपंगांसाठी सुविधा, स्मारक उभारणी, कर सवलत आणि नागरिकाभिमुख प्रशासन अशा विविध विकासघटकांवर आधारित आहे. * खोपोलीच्या विकासासाठी किशोर साळुंके यांचा जाहीर संकल्प :- - खोपोलीकरांसाठी भव्य क्रीडांगण :- खोपोली शहरात विविध खेळाडूंना एकाच ठिकाणी सुविधा उ...

माघारीचा अंतिम दिवस संपला - अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली!

Image
  खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 : एकूण 159 पैकी 34 अर्ज मागे - नगराध्यक्ष पदासाठी आता 7, तर नगरसेवक पदासाठी 118 उमेदवार रिंगणात ; अनेक प्रभागांत मोठे राजकीय बदल खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषद निवडणुकीसाठी आज माघारीचा अंतिम दिवस संपल्यानंतर उमेदवारीचे अंतिम स्वरूप जाहीर झाले आहे. एकूण 159 वैध अर्जांपैकी 8 अर्ज नगराध्यक्ष पदासाठी व 151 अर्ज नगरसेवक पदासाठी दाखल झाले होते. यापैकी नगराध्यक्ष पदासाठी 1 अर्ज मागे घेण्यात आला तर नगरसेवक पदासाठी 33 अर्ज मागे घेण्यात आले. यामुळे आता रिंगणात 7 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी व  15  प्रभागामध्ये 118 उमेदवार नगरसेवक पदासाठी उरले आहेत. माघारीनंतरचे हे बदल आगामी लढतीचे राजकीय गणित बदलणारे ठरत असून अनेक प्रभागात त्रिकोनी, चतु:कोनी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. * नगराध्यक्ष पदासाठी माघार :- नासिर महेमुद मियां पटेल यांनी नगराध्यक्ष पदाचा अर्ज मागे घेतला. यामुळे नगराध्यक्षपदासाठीची स्पर्धा आता आणखी तीव्र झाली आहे. * प्रभागनिहाय नगरसेवक पदासाठी माघार घेतलेले अर्ज :- विविध प्रभागांतून 33 उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती निवडणूक वि...

मरखेल येथे वित्तीय साक्षरता कार्यक्रम

Image
    देगलूर / जावेद अहमद :- भारतीय रिझर्व बॅंके अंतर्गत जनजागृती मोहीम कार्यक्रमांतर्गत मरखेल येथे आज वित्तीय साक्षरता कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये MSRLM चे लोंढे सर यानी व CRISIL फॉउंडेशच्या संगीता वाघमारे यांनी वित्तीय साकक्षरता व डिजिटल व्यवहार या बद्दल सविस्तर माहिती दिली.  या वेळी कार्यक्रमांमध्ये एकूण सहभागी 45 जण बचत गटातील महिला उपस्थित होते. त्यामध्ये प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, अटल पेन्शन, राष्ट्रीय पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना, फोन पे व गुगल पे बँकिंग सेवा, ओटीपी बाबतची सजाकता इत्यादी सर्व आर्थिक व्यवहाराशी संबंधित बाबींवर उपस्थित लाभार्थ्यांना माहिती देण्यात आली.

मला एक संधी द्या, खोपोलीचा चेहरामोहरा बदलून दाखवेन!

Image
  महायुतीचे उमेदवार कुलदिपक शेंडे यांचे खोपोलीतील मतदारांना आवाहन : खोपोली नगर परिषद निवडणूक 2025  खोपोली / फिरोज पिंजारी :- नगर परिषद निवडणूक 2025 ची रणधुमाळी सुरू होताच महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदिपक शेंडे यांनी मतदारांशी थेट संवाद साधत शहराच्या सर्वांगीण विकासाची हमी दिली आहे. 19 नोव्हेंबर रोजी धाकटी पंढरी येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊनच त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला.  मी नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो, तर खोपोलीचा भविष्यकाळ बदलून टाकेन :- मतदारांना थेट आवाहन करताना कुलदिपक शेंडे यांनी आपली रणनिती, भुमिका स्पष्ट केली. - पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सोडवेन :- बारमाही वाहणारी पाताळगंगा नदी आहे, पण पाण्याचा साठा करण्यासाठी सुविधा नाहीत. मी निवडून आलो तर सर्वात पहिले पाणी साठवण प्रकल्प, जलशुद्धीकरण आणि वितरण व्यवस्था उभारण्यावर काम करणार आहे. - पाताळगंगा नदी परिसराला पर्यटनाचा चेहरा देईन :- नदीच्या दोन्ही काठांवर मी चौपाटीसारखे सौंदर्यीकरण, लाइटिंग, वॉकवे, मनोरंजन क्षेत्र उभारून खोपोलीला पर्यटन नकाशावर आणणार आहे. - शहरातील वाहतूक कोंडी दूर करेन :- विशेषतः शिळफ...

विठ्ठल दर्शनानंतर महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ

Image
  खोपोली नगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडेंचा विश्वास  खोपोली / फिरोज पिंजारी :- खोपोली - खालापूर परिसरातील लाखों भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या धाकटी पंढरी येथील विठ्ठलाच्या दर्शनाने खोपोली नगर परिषद निवडणुकीतील महायुतीच्या प्रचाराला औपचारिक सुरुवात आज 19 नोव्हेंबरपासून झाली. विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन, नारळ फोडून उत्साहपूर्ण वातावरणात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महायुतीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले की, विठुरायाच्या कृपेने व मतदारांच्या पाठींब्याने या निवडणुकीत खोपोली नगर पालिकेवर महायुतीचा भगवा नक्कीच फडकेल.  * भाजप - शिंदे गट - आरपीआय आणि मित्रपक्ष एकत्र मैदानात :- महायुतीच्या पॅनेलतर्फे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे, प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवार राजू दूमने व रजिया खान तसेच महायुतीचे विविध प्रभागातील उमेदवार व पदाधिकारी, शिवसेना खोपोली शहर प्रमुख तथा उमेदवार संदीप पाटील, हरिश काळे, अर्चना पाटील, रूपाली जाधव, प्रमोद महाडीक, दिलीप जाधव, अनिता पवार, वंदना सावं...

उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी दोन्ही पॅनेलची ताकद दाखवण्याची चुरस

Image
  शहरात उत्साह, रॅली आणि घोषणांचा जल्लोष खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शहरात अक्षरशः उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. महायुती आणि आघाडी या दोन्ही पॅनेलने शक्तीप्रदर्शन करीत भव्य रॅली, मोटारींचे काफिले आणि घोषणा यामुळे संपूर्ण शहर दणाणून गेले. दोन्ही बाजूंकडून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिल्याने निवडणूक रणधुमाळीला उधाण आले होते. सकाळपासूनच महायुतीच्या भाजप - शिवसेना शिंदे गट - आरपीआय पॅनेलने उमेदवारांसह महत्त्वाच्या पदाधिकारी, स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले. दुसरीकडे राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, शेकाप आदी आघाडीतील पक्षांनी देखील तितक्याच ताकदीने अर्ज प्रक्रिया पार पाडत आपली एकजूट दाखवली. रॅलीतील बॅनर, ढोल-ताशे आणि कार्यकर्त्यांच्या गगनभेदी घोषणा यामुळे खोपोलीची निवडणूक रंगतदार बनली. * दोन्ही पॅनेल आमनेसामने - जोरदार उत्साह, शेवटच्या दिवशी गर्दीचे उत्स्फूर्त दर्शन :- उमेदवारीसाठी शेवटचा दिवस असल्याने दोन्ही मोर्चे आपापल्या ताकदीने मैदानात उतरले. प्रमुख नेते, पदाधिकारी ...

खोपोली प्रभाग क्रमांक 6 मधून मदिना अशफाक पटेल अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात

Image
    खालापूर/ प्रतिनिधी :- खोपोली नगरपरिषदेच्या वॉर्ड क्रमांक 6 मधून आगामी निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून मदिना अशफाक पटेल या निवडणुकीच्या रिंगणात निवडून येण्याच्या जय्यत तयारीने प्रचाराच्या तयारीला सुरुवात केली. खोपोली वॉर्ड क्रमांक 6 मधून स्थानिक महिला मंडळ, मित्र परिवार, युवा मंच, नवतरुण मंडळ, व नागरिकांच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे सध्या संपूर्ण वॉर्ड चे लक्ष लागले आहे. खोपोली मध्ये जन्मलेल्या व लहानाच्या मोठया झालेल्या रफिक सय्यद परिवाराची मुलगी पुढे लग्न अशफाक पटेल यांच्याशी होऊन गेली अनेक वर्ष खोपोलीत राहत असून खोपोली करांच्या अनेक समस्या जाणत असून त्या सोडविण्यासाठी गेली अनेक वर्ष पती अशफाक पटेल यांच्या बरोबर सामाजिक कामामध्ये सक्रिय राहत अशफाक भाई पटेल युवा मंच व खिदमते खल्क सामाजिक संस्था मार्फत अनेक शैक्षणिक, संस्कृतीक, समाजाच्या उपयोगी असणारे कार्य, उद्योजक अशफाक भाई पटेल यांच्या मार्फत कार्यक्रम करत आले. स्थानिक नागरिकांमध्ये मदिना अशफाक पटेल यांचे व्यक्तिमहत्व साधे, सर्वसामावेशक, आणि सेवा भावी म्हणून ओळखले जाते. निवडून आल्यास वॉर्ड 6 मधील मूलभूत सुवि...

खोपोलीत ‘स्वच्छ पर्याय’ मैदानात

Image
  * आम आदमी पार्टीचे नगराध्यक्ष व 11 नगरसेवकांचे अर्ज दाखल * भ्रष्टाचारमुक्त खोपोली, पारदर्शक प्रशासन आणि मूलभूत सुविधांच्या हक्कासाठी 'आप'ची लढाई * खोपोलीचा चेहरा बदलवू, एक संधी द्या - डॉं. रियाज पठाण खोपोली / केपी न्यूज ब्युरो :- खोपोली नगर परिषदेचा रणसंग्राम आता आपल्या लढाई क्षेत्रात प्रवेश करीत आहे. आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बलाढ्य शिवसेना - भाजप - आरपीआय महायुती व राष्ट्रवादी अजित पवार गट‌‌‌ - शिवसेना उध्दव ठाकरे - शेतकरी कामगार पक्ष यांच्या परिवर्तन विकास आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल केले. उद्या छाननी आणि मग माघारीपर्यंत 'वेट अँड वॉच' अशी काहींची भुमिका असेल पण आम्ही कसे खोपोलीकरांचे लाडके आहोत...आम्हाला कसा मतदारांचा पाठींबा आहे...आम्ही कसे जिंकणार, आमच्यासोबतच कसे पदाधिकारी, कायकर्ते व नागरीक आहेत, हा दाखविण्याचा प्रयत्न करीत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. दरम्यान, आम आदमी पार्टीने कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता खोपोलीच्या विकासाचा ध्यास घेत नगराध्यक्ष पदासाठी तसेच 11 नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. “प्रामाणिकता, पार...

कर्जतमध्ये महायुतीचे शक्तीशाली प्रदर्शन!

Image
  शिवसेना शिंदे - भाजप - आरपीआयचा दणदणीत शक्तिसागर    नगराध्यक्षपदासाठी डॉं. स्वाती लाड मैदानात * युतीचे दिग्गज नेते, विशाल रॅली आणि गगनभेदी घोषणा - कर्जतचा रणसंग्राम तापला! कर्जत / नरेश जाधव :- कर्जत नगर परिषद निवडणुकीत आज महायुतीने ‘शक्ती प्रदर्शन म्हणजे नक्की कसे असते’ याचा थरारक प्रत्यय शहराला दिला. शिवसेना शिंदे गट, भाजप आणि आरपीआय या तिन्ही पक्षांनी एकत्रित दमदार ताकद दाखवत नगराध्यक्ष तसेच 21 प्रभागांसाठी संभाव्य उमेदवारांची विजयी मिरवणूक काढत कर्जतचे राजकीय वातावरण अक्षरशः दणाणून सोडले. * धापया महाराजांच्या दर्शनाने प्रारंभ :- रॅलीची सुरुवात शहराचे ग्रामदैवत श्री धापया महाराजांच्या मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉं. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांना महायुतीच्या नेत्यांनी पुष्पहार अर्पण करीत विजय संकल्प व्यक्त केला. ढोल-ताशांचा कडकडाट, बॅनर - पोस्टरची रेलचेल, मोटारसायकली - जीप - कारांच्या लांबलचक फौजा आणि उत्साहात नाचणारे कार्यकर्ते असा अभूतपूर्व जल्लोष करीत रॅली अर्ज दाखल केंद्रावर दाखल झाली. या शक्ती प्रदर्शनाने कर्जतच्या राज...