Friday, July 4, 2025

ईच्छापूर्ती करणाऱ्या श्री वरदविनायकाच्या कृपेने – महडमध्ये विद्यार्थ्यांना छत्री व रेनकोट वाटप

 


समाजोपयोगी उपक्रमात श्री गणपती संस्थान महडचा स्तुत्य सहभाग


खालापूर/प्रतिनिधी:-श्री अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री वरदविनायक देवस्थान, महड येथील श्री गणपती संस्थान महडच्या वतीने शुक्रवार, ४ जुलै २०२५ रोजी विद्यार्थ्यांसाठी समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महड गावातील विद्यार्थ्यांना छत्र्या व रेनकोट वाटप करण्यात आले.


या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात साहित्य प्रदान करण्यात आले. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी येत्या सात दिवसांत संस्थेच्या कार्यालयातून कार्यालयीन वेळेत छत्री व रेनकोट दिले जाणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा सौ. मोहिनी वैद्य यांनी दिली.


उपक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून खालापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. रोशना मोडवे उपस्थित होत्या. त्यांच्या समवेत उपनगराध्यक्ष श्री. संतोष जंगम, नगरसेविका सौ. श्वेता गुरव, सौ. सुनीता पाटील, सौ. मिनल कबले यांचीही उपस्थिती लाभली.


कार्यक्रम सायंकाळी ७:३० ते ९:०० या वेळेत श्री वरदविनायक मंदिराच्या सभामंडपात पार पडला. श्री गणपती संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्यावतीने सर्व ग्रामस्थ व पाहुण्यांचे मन:पूर्वक स्वागत करण्यात आले.


"ईच्छापूर्ती करणाऱ्या श्री वरदविनायकाच्या चरणी हा उपक्रम भक्तिभावाने अर्पण करत, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक छोटीशी मदत केली," असे सौ. वैद्य यांनी सांगितले.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home