Posts

Showing posts from September, 2025

पनवेल -उरणचे बाहुबली रुपेशदादा पाटील आणि तेजसभाई डाकी सन्मानाने राष्ट्रवादीत...

Image
  राष्ट्रवादी काँग्रेसला पनवेल उरण मतदारसंघात आता अच्छे दिन येणार पनवेल/खलील सुर्वे :- पनवेल,उरण विधानसभा मतदारसंघात सामाजिक क्षेत्रासह राजकीय क्षेत्रात बाहुबली ठरलेले रुपेशदादा पाटील आणि तेजसभाई डाकी यांनी सन्मानाने मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते आणि हजारो समर्थक उपस्थित होते.         या सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री नवाब मलिक, माजी आमदार मुश्ताक अंतुले, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी सन्मानाने स्वागत केले. हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत नरिमन पॉईंट येथे संपन्न झाला.        पनवेल उरणसह रायगड जिल्ह्याचा विकास हा संकल्प नजरेसमोर ठेवून रुपेशदादा पाटील आणि तेजसभाई डाकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली . जनतेची कामे करण्यासाठी रुपेशदादा आणि तेजसभाई यांनी योग्य निर्णय घेतल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. रुपेश दादा पाटील आणि तेजस भाई डाकी हे पनवेल ,उरण मधील बाहुबली आहेत राजकीय...

फुड माॅल मधे काम करणाऱ्या महिलांसाठी महिला सक्षमीकरण विषय सत्र आयोजित केले

Image
  खालापुर/सुधीर देशमुख - रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सौ. आंचल दलाल यांच्या आदेशानुसार व खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे सर यांच्या निर्देशनानुसार खोपोली–खालापूर फूड मॉल येथे कार्यरत असलेल्या महिला वर्गासाठी महिला सक्षमीकरण विषयक सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रामध्ये महिलांना महत्वाचे काही मुद्दे सांगण्यात आले हनी ट्रॅप, फेसबुक स्कॅम, शिक्षण, सायबर क्राईम, ऑनलाईन होणारी फसवणूक, सोशल मीडिया चा वापर कमीत कमी करणे. डायल ११२ वुमन हेल्प लाईन, सायबर सुरक्षा हेल्प लाइन १०९ या सर्व विविध उपाययोजना कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. खोपोलीतील तळागाळातील महिलांना अशा मार्गदर्शनामुळे जागरूकता व आत्मनिर्भरतेचा नवा दृष्टिकोन मिळाला. कार्यक्रमाला खोपोली पोलीस ठाण्याचे अमलदार महिला पोलिस हवलदार संजना चव्हाण व पोलीस कॉस्टेबल सुषमा खाडे तसेच खोपोली पोलीस ठाणे महिला दक्षता समितीच्या सदस्या इशिका शेलार व वर्षा मोरे उपस्थित होत्या.या उपक्रमासाठी सर्व महिला वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फुड मॉलचे मुख्य कार्यकारी मोहम्मद रमीझ रजा व अभिजीत लक्ष्मण राऊत ...

खोपोली नगर परिषदेच्या इमारतीमध्ये लागलेले सर्व एसी अनाधिकृत

Image
  नागरिकांच्या कराच्या पैशातून एसीचे बिल भरू नका सर्व एसी काढा अथवा आंदोलन करणार : आम आदमी पार्टी खोपोली /खलील सुर्वे :- खोपोली नगर परिषदेच्या इमारतीमध्ये लावण्यात आलेले सर्व एसी हे अनाधिकृत आहेत. तसेच एसी लावण्याकरिता नगर परिषदेने प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही. तसेच सदर एसी लावण्याकरिता नगर परिषदेमार्फत करण्यात आलेल्या खर्चाचा अहवाल माहितीच्या अधिकाराखाली मागितले असता आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही असे अजब उत्तर नगर परिषदेने माहितीच्या अधिकाराखाली आम आदमी पार्टीला दिलेले आहे. खोपोली शहरात प्रचंड समस्या असताना नागरिकांच्या कराचे पैसे एसीचे बिल भरण्याकरिता वापरण्यात येत असून शहरात नागरिकांना कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. शहरात विविध ठिकाणी विजेचे खांबांची आवश्यकता आहे, रस्त्यांची दाणादाण उडालेली आहे, गटारे नाहीत साफसफाई चे तीन तेरा वाजलेले आहेत. या सर्व सुविधा पुरवण्याकरिता आमच्याकडे निधी उपलब्ध नाही असे नगरपरिषदेमार्फत नेहमी उत्तर दिले जात आहे. नगर परिषदेमार्फत निधीचा अपव्यय केला जात असून नागरिकांच्या मूलभूत गरजा पुरवण्याचे सोडून नगर अधिकारी नागरिकांच्या कराच्या पैशाने आरामात एसी...

कर्जत मध्ये सुसज्ज BPHU युनिटचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न....

Image
  कर्जत/नरेश जाधव :- आज दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी कर्जत तालुक्यातील आरोग्य सेवेच्या बळकटीसाठी एक महत्वाचे पाऊल उचलत उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट (BPHU) उभारण्यात आले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून साकारलेल्या या युनिटचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य सेवा पुरवणे, सार्वजनिक आरोग्यासाठी उपाययोजना करणे, प्रयोगशाळा बळकट करणे आणि तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून उत्तम उपचार उपलब्ध करून देणे हे या युनिटचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, “कर्जत तालुक्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी हे युनिट महत्वाची भूमिका बजावणार आहे. अनुभवी डॉक्टरांच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर दर्जेदार सेवा दिली जाणार असून, डॉक्टरांनी आपल्या अडचणी वेळेत प्रशासनासमोर मांडल्यास त्या दूर करून अधिक प्रभावी सेवा देता येईल.” त्यांनी ‘स्वस्थ नारी–सशक्त परिवार’ सारख्या उपक्रमांचे कौतुक करत महिलांच्या सशक्तीकरणासाठी आरोग्यसेवा हा महत्त्वाचा आधार असल्याचेही सांगितले...

शिवसेनेत नवी ताकद, नवा जोश!

Image
  कर्जत /नरेश जाधव :- राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस बॉबी शेठ वाघमारे व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कर्जत शहर उपाध्यक्ष नीरज गायकवाड यांनी आमदार श्री. महेंद्र थोरवे साहेब यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेश प्रसंगी आमदार श्री. महेंद्र थोरवे साहेबांनी सर्वांचे शिवसेना परिवारात सहर्ष स्वागत केले आणि "निश्चितच येणाऱ्या भविष्यकाळात आपण एकत्र काम करून शिवसेना आणखी बळकट करू," असा शब्द दिला.  या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक ॲड संकेत भासे, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रसादजी थोरवे ,कर्जत शहर प्रमुख श्री अभिषेक सुर्वे, कर्जत उपशहर प्रमुख श्री दिनेश कडू आदी मान्यवर उपस्थित होते

खोपोली पोलिसांची काटरंग भागातील बंगल्यावर धाड

Image
  विविध राजकीय पक्षांतील १७ जणांना ताब्यात, ४.३० लाखांची रोकड जप्त   पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांच्या पथकाची पहाटे कारवाई खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली पोलिसांनी काटरंग भागात एका बंगल्यावर गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास छापा टाकत जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत विविध राजकीय पक्षांशी संबंधित १७ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, जुगारासाठी वापरलेली तब्बल ४ लाख ३० हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.   गुप्त माहितीवरून धाड :- पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तुषार अहिर यांच्या मालकीच्या बंगल्यावर छापा टाकला. बंगल्यात मोठ्या प्रमाणावर जुगार खेळ सुरू असल्याचे उघड झाले.   अटक केलेले आरोपी :- या कारवाईत अजय सोनवणे, संतोष सूर्यवंशी, भालचंद्र कदम, दत्ता बावधने, उमेश ओव्हाळ, रुपेश वाघमारे, महेश कर्णूक, प्रशांत साळुंखे, स्वप्नील चौधरी, प्रदीप कर्णूक, सुजात डेबनाथ, अमोल जाधव, अविनाश कदम, नबी शेख, राजेश पारठे आणि अल्पेश थुरपुडे या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, आरोपींचा...

सर्कल सेक्रेटरी, जयराम जाधव तीन दिवसाच्या नागपूर क्षेत्रीय दौर्‍यावर..

Image
  नागपुर / जावेद अहमद : - ऑल इंडिया पोस्टल एससी/एसटी एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र परिमंडळ सचिव मा.जयराम जाधव हे बुधवार 1 ऑक्टोबर पासून नागपूर क्षेत्राच्या दौर्‍यावर आहेत. सदर दौऱ्यात सकाळी 11 वा.यवतमाळ हेड पोस्ट ऑफिस मध्ये नामफलक अनावरण करणार आहेत तसेच विभागीय अधिकाऱ्यां सोबत मीटिंग आयोजित करण्यात आली आहे, त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करतील.  दुपारी 1.30 वा.वर्धा टपाल विभागीय कार्यालयाला सदिच्छा भेट असून विभागीय अधिकारी, सभासद आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील. संध्याकाळी ६.३० वा.नागपूर दीक्षा भूमिवर होणार्‍या ६९ धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सेवाभावी उपक्रमाचे उद्घाटन करून या निमित्ताने अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या सत्कार सोहोळ्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.तसेच दुसऱ्या दिवशी होणाऱ्या मेडिकल कॅम्प च्या उद्घाटनप्रसंगी उपस्थिती दाखवतील अशी माहिती नागपूर क्षेत्राचे परिमंडळ सचिव मा.गौतम मेश्राम यांनी दिली आहे.

नवरात्रीच्या मुहूर्तावर सहज महिला फाउंडेशनचा उपक्रम..

Image
  खालापूर नगर पंचायतच्या मा. नगराध्यक्षा शिवानी जंगम यांच्या हस्ते शुभारंभ खालापुर/सुधीर देशमुख :- सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या सहज सेवा फाउंडेशन तर्फे खोपोली येथे शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी महिलांसाठी आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. दर महिन्याला वाढदिवस असणाऱ्या महिलांचा पाताळगंगा नदीकिनारी नदी पूजन व आरतीनंतर सामूहिक वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला.सुरुवातीस सामूहिक नदी पूजन व आरती नंतर सप्टेंबर महिन्यात वाढदिवस असणाऱ्या महिलांचे औक्षण करून तसेच सामूहिक केक कापून आनंद साजरा करण्यात आला.यावेळी लकी ड्रॉ द्वारे काढलेल्या ड्रॉ मध्ये प्रिती सावंत या विजेत्या ठरल्या.विजेत्या महिलेस सहज सेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष मोहन केदार व खोपोली नगरपालिकेच्या मा.नगरसेविका निर्मला शेलार यांच्या हस्ते पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आली. महिलांच्या सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाची आखणी करण्यात आली असून सहज सेवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व सहभागी सर्वांनी या नवीन प्रयोगाबाबत उत्साह व्यक्त केला आहे.नवरात्रीच्या मुहूर्तावर सहज महिला फाउंडेशन य...

विश्व आयुर्वेदिक दिनानिमित्त श्रीक्षेत्र उद्धर रामेश्वर येथे आयुर्वेद दिन साजरा!

Image
  भारतीय किसान संघ रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्धर ग्रामपंचायतीमध्ये ५००० आयुर्वेदिक वृक्षांचे वाटप,रोपण पाली/प्रतिनिधी :- राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष भारत मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत, पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह सुविधा केंद्र, वनस्पतीशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि श्री रामेश्वर महादेव देवस्थान उद्धर व भारतीय किसान संघ रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्धर ग्रामपंचायतीमध्ये ५००० आयुर्वेदिक वृक्षांचे वाटप व रोपण करण्यात आले.  दहाव्या विश्व आयुर्वेद दिनानिमित्त दि. 23 सप्टेंबर 2025 रोजी देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सदरचा कार्यक्रम 25 सप्टेंबर 2025 रोजी उद्धर रामेश्वर येथे घेण्यात आला. या कार्यक्रमात आयुर्वेद शास्त्रात वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींचे वाटप व रोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मुख्यतः चार हजार बेल व एक हजार अर्जुनाच्या औषधी वनस्पतींचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रमुख संशोधक डॉ. दिगंबर मोकाट सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. दिगंबर मोकाट यांच्या...

रायगडच्या पवित्र भूमीवर लेडीज बार व अवैध धंद्यांचा धुमाकूळ

Image
  खालापूर तालुक्यात रात्री उशिरापर्यंत लेडीज बार सुरू अवैध धंदे बंद झाले नाही तर आमरण उपोषण - पॅंथर आर्मीचा इशारा   खालापुर/सुधीर देशमुख :- छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींनी नटलेल्या रायगड जिल्ह्याच्या भूमीत आज अवैध धंदे, अंमली पदार्थांची विक्री आणि लेडीज बारसारखे प्रकार सुरू असल्याने तरुणाई नशेच्या आहारी जाऊन बरबाद होत आहे, अशी गंभीर परिस्थिती समोर आली आहे.      खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे आणि लेडीज बार चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः खालापूर तालुक्याच्या हद्दीत असलेला ‘समुद्र लेडीज बार’ हा थेट महामार्गालगत सुरू असून, रात्री उशिरापर्यंत सुरु राहतो. या ठिकाणी अपघात घडण्याची शक्यता कायम असते. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे या बारमध्ये महिलांशी संबंधित चुकीचे व अनैतिक प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.      या सर्व बाबींचा निषेध व्यक्त करत स्वराज्य संविधान रक्षक सेना (पॅंथर आर्मी) यांनी अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा या पवित्र रायगड जिल्ह्य...

मालमत्ता करावरील शास्ती माफी योजनेला कर्जत नगरपालिकेकडून सुरुवात

Image
  आमदार महेंद्र थोरवे आणि संकेत भासे यांच्या पाठपुराव्याला यश कर्जत/सुधीर देशमुख :- नागरिकांना दिलासा देणारा निर्णय अखेर अमलात येत असून कर्जत नगरपरिषदेत मालमत्ता करावरील शास्ती माफी (अभय योजना) लागू करण्यात आली आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारातून आणि माजी नगरसेवक संकेत भासे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही योजना कर्जत नगरपालिकेत प्रत्यक्षात राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगरपरिषदेकडून घरपट्टी (मालमत्ता कर) आकारणी नियमित केली जाते. मात्र एखाद्या वर्षी किंवा अनेक वर्षे कर न भरल्यास थकबाकीवर दरमहा २ टक्के दंड आकारला जातो. कोरोनाच्या काळातील आर्थिक संकट, बंद पडलेले व्यवसाय आणि बिकट परिस्थितीमुळे अनेक नागरिक कर भरू शकले नाहीत, परिणामी थकबाकी आणि त्यावरील शास्ती मोठ्या प्रमाणात वाढली. राज्य शासनाने १९ मे २०२५ रोजी परिपत्रक काढून मालमत्ता करावरील दंड माफ करण्याच्या सूचनांसह अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कर्जत नगरपरिषदेत या योजनेची अंमलबजावणी अनेक महिन्यांपासून प्रलंबित होती. या विलंबाबाबत संकेत भासे यांनी वारंवार मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन देत पाठपुराव...

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर खालापूर येथे प्रवेशद्वार भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

Image
  स्थानिक मान्यवर, पदाधिकारी, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती खालापूर / सुधीर माने:- खालापूर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेच्या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन सोहळा गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह शाळेचे माजी विद्यार्थी, पालकवर्ग आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांची उपस्थिती :- या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गलांडे (यू. एस. विभाग प्रमुख, रायगड ठाणे मुंबई पालघर संपर्क प्रमुख) उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून युवा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष शेखर हरीभाऊ पिंगळे हे उपस्थित राहिले. सोहळ्यास मुख्याध्यापक एस. आर. पाटील, शाळा व्यवस्थापन समिती व सल्लागार समिती पदाधिकारी, नगरपंचायत समिती सदस्या मंदा लोते, राष्ट्रवादी कार्यकर्त्या संजीवनी अनिल पिंगळे, कार्यकर्ते दशरथ लोते, पुंडलिक लोते, शरद लोते, सुरेखा जगताप, निशा पिंगळे, महेश पिंगळे, प्रमिला पिंगळे आदी मान्यवरांनी सहभाग नोंदविला. तसेच द्रेवेंद्र पिंगळे, मंगेश पिंगळे, हरिश्चंद्र सासे, सुरे...

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा - जावेद अहेमद

Image
    शासनाने तात्काळ मदत करण्याची ईमेल द्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन देगलूर/ प्रतिनिधी:- मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला असून नागरिकांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक अनेक भागात शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली आहे. यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली मुखेड तालुक्यात जोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक शेतकर्‍याचे पिकाचे नुकसान झाले आहेत. मराठवाड्यात अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्यामुळे गावचे हजारो हेक्टर जमीन पुरातच बुडुन गेली आहे. या आसमानी संकटामुळे अनेक शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. गुरे ढोरे व माणसाचा देखील यामध्ये जीव गेले आहेत.जमिनी नापीक झाल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असल्याने त्यांना तातडीने नुकसानभरपाईची आवश्यकता आहे.         शासनाने केलेली आर्थिक मदत ही तुटपुंजी स्वरूपाची आहे. नैसर्गिक आपत्त्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आणि तणाव वाढला आहे. शेतकरी बांधवावर आस्मांनी संकट आले आहे. त्यामुळे शेतकर्‍याना ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत द्यावी.अशी मागणी साम...

आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांची वावोशी गावाला भेट

Image
  नामवंत उद्योजक रवींद्र टिळक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट    खालापुर/सुधीर देशमुख :- खालापूर तालुक्यातील वावोशी गावाचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ, ४० वर्षे मुंबई शेअरबाजार (BSE), सेबी, NSDL सारख्या अग्रगण्य संस्थांमध्ये जबाबदारी सांभाळणारे आणि ३५ पुस्तके, ८७ आवृत्त्या, तब्बल ४९०० व्याख्यानांचा विक्रम करणारे श्री. चंद्रशेखर टिळक यांनी काल (दि. २३ सप्टेंबर २०२५) वावोशीतील नामवंत उद्योजक रवींद्र टिळक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.   नरसिंह राव, अटलजी व डॉ. मनमोहनसिंग यांसारख्या तीन माजी पंतप्रधानांच्या विशेष निमंत्रणावरून धोरणात्मक चर्चेत सहभागी झालेले, तसेच हर्षद मेहता व केतन पारेख यांसारख्या गाजलेल्या आर्थिक घोटाळ्यांच्या तपासात महत्वाची भूमिका बजावलेले टिळक यांचे व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञान, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रसेवेचे प्रतीक आहे.  “आमचे टिळक घराण्याचा आज सार्थ अभिमान वाटतो, मी भरून पावलो!” अशा शब्दांत नामवंत उद्योजक रवींद्र टिळक यांनी आपला भावनिक आनंद व्यक्त केला. वावोशीसारख्या छोट...

निरामय हेल्थ फाऊंडेशन व गोदरेज इंटरप्राइजेस ग्रुप यांचा वडवळ येथे किशोरवयीन मुलींसाठी MHM किटचे वाटप व जागरूकता सत्राचे आयोजन

Image
खालापुर/सुधीर देशमुख :- निरामय हेल्थ फाऊंडेशन व गोदरेज इंटरप्राइजेस ग्रुप यांच्या संयुक्त संयोगाने आरोग्यसमृद्धी प्रकल्प अंतर्गत राष्ट्रीय पोषण माह निमित्त किशोरवयीन मुलींसाठी MHM ( Menstrual Hygiene Management ) किट वितरण व जागरूकता सत्र आयोजित करण्यात आले. या उपक्रमात एकूण ६४ मुलींनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान मुलींना मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी, वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व तसेच दैनंदिन आहारातील पोषणमूल्य याबाबत सखोल मार्गदर्शन देण्यात आले. मार्गदर्शक म्हणून निरामय हेल्थ फाऊंडेशनच्या प्रोग्राम ऑफिसर सौ. दीप्ती मथुरे उपस्थित होत्या. त्यांनी अतिशय सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत MHM विषयाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मुलींमध्ये जागरूकता वाढली व आत्मविश्वास निर्माण झाला.  या वेळी शाळेच्या शिक्षिका सौ. वृशाली देशमुख, सौ. करुणा बोम्बे व सौ. हर्षाली काळे यांच्या हस्ते मुलींना MHM किटचे वाटप करण्यात आले. तसेच या कार्यक्रमास निरामय हेल्थ फाऊंडेशनचे प्रकल्प समन्वयक श्री. मंगेश भंडारे, तसेच हेल्थ वर्कर्स सौ. दर्शना मरागजे, सौ. पौर्णिमा गायकवाड व सौ....

पक्षी चोरीप्रकरणी कर्जत पोलिसांची मोठी कामगिरी

Image
चेन्नईतून लाखो रुपयांचे मौल्यवान विदेशी पक्षी हस्तगत ; दोन चोरटे अटकेत खोपोली/ खलील सुर्वे :- कर्जत तालुक्यातील मौजे टेंभरे-आंबीवली येथून चोरी गेलेल्या साडेअकरा लाख रुपयांच्या मौल्यवान विदेशी पक्ष्यांचा शोध घेऊन त्यांची सुखरूप सुटका करण्यास कर्जत पोलिसांना यश आले आहे. चेन्नई, तामिळनाडूतून हे पक्षी हस्तगत करतांना दोन चोरट्यांना अटक करण्यात आली. कर्जत पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.   गुन्हा आणि आरोपी :- १७ जुलै २०२५ रोजी रात्री १.१९ वाजता दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक १८४/२०२५ अंतर्गत आरोपींनी ७ आफ्रिकन ग्रे पॅरट, १ ब्ल्यू-गोल्ड मकाव आणि १ स्कार्लेट मकाव असे एकूण नऊ दुर्मिळ विदेशी पक्षी चोरीस नेले होते. या पक्ष्यांची बाजारातील किंमत तब्बल ११ लाख २५ हजार रुपये इतकी आहे. - आफ्रिकन ग्रे पॅरट (प्रत्येकी ७५ हजार) – बुद्धिमत्ता पाच वर्षांच्या मुलाइतकी ; संवादक्षम व ४० वर्षांचे आयुष्य - ब्ल्यू-गोल्ड मकाव (२ लाख) – उत्तम शब्दसंग्रह व ६०-७० वर्षांचे आयुष्य - स्कार्लेट मकाव (४ लाख) – आकर्षक, बोलक्या स्वभावाचे, संग्रहालयातही मागणी अशा मौल्यवान पक्ष्यांची चोरी केल्याप्रकरणी अनिल र...

भारत भूषण पुरस्कारप्राप्त तटकरे दाम्पत्याचा कर्जत येथे भव्य नागरी सत्कार

Image
पोलिस मैदानावर सोहळा ; पक्षातील नेते, कार्यकर्त्यांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती  आगामी निवडणुकांची चाहूल ; डॉं. सुनिल पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलणार सुधाकर घारे यांचे आवाहन : नगरपालिका असो वा जिल्हा परिषद, राष्ट्रवादी नंबर वन राहील प्रफुल पटेल, रुपाली चाकणकर, धनंजय मुंढे यांसह अनेक दिग्गजांची उपस्थिती युवक, महिला, विद्यार्थी, सामाजिक घटकांचा मोठा सहभाग   स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण कर्जत / मानसी कांबळे :- रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे लोकमत समुहाचा 'भारत भूषण' हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल दत्तात्रेय तटकरे व सौ. वरदा तटकरे यांचा नागरी सत्कार सोहळा आज कर्जत येथे पार पडला. पोलिस मैदानावर झालेला हा भव्यदिव्य सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत चांगलाच रंगला. नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी काही महिन्यांवर आली असतानाच हा कार्यक्रम झाल्याने कर्जत-खोपोली परिसरात चांगलीच राजकीय रंगत आली आहे. विशेष म्हणजे, खोपोलीच्या राजकारणातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानल...

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्जत पोलिस ठाणे येथे बैठक संपन्न

Image
  पोलिस प्रशासनाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष यांना दिल्या सूचना कर्जत/नरेश जाधव :- आगामी होत असलेल्या नवरात्र उत्सव - 2025 अनुषंगाने कर्जत पोलीस ठाणे हद्दतील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ अध्यक्ष यांची दिनांक 19/09/2025 रोजी 17.40 ते 18.30 या दरम्यान मिटिंग घेण्यात आली सदर मिटिंग करीता 45 ते 50 मंडळ आध्यक्ष व सदस्य उपस्थित राहिले होते. त्यांना सणाचे अनुषंगाने खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत. 1) सर्व मंडळ आध्यक्ष यांनी "आपले सरकार " या online side वरून उत्सव साजरा करण्या बाबत परवागी अर्ज सादर करावा. 2) कोणीही मंडळ जबरदस्ती ने वर्गणी गोळा करणार नाही. 3) देवींची मूर्ती व मंडपाचे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मंडळाचे स्वयंसेवक 24 तास उपलब्ध करून ठेवणे  4) मंडपामध्ये करण्यात येणारे देखावे या मुळे कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अथवा कोणत्याही विशिष्ठ समाजाच्या भावना दुःखावणार नाही असे फलक, पताके लावणार नाहीत. 5) हजर मंडळाचे आध्यक्ष यांना ध्वनी प्रदूषणाबाबत सूचना देण्यात आल्या. 6) मंडळ परिसरात पुरेसा प्रकाश असावा तसेच त्या ठिकाणी करण्यात येणारी रोशनायी / ...

होनाड येथे राष्ट्रीय पोषण अभियान 2025 उत्साहात साजरा

Image
खालापूर/सुधीर देशमुख : - ग्रुपग्रामपंचायत होनाड अंतर्गत अंगणवाडी केंद्र होनाड येथे राष्ट्रीय पोषण अभियान हा कार्यक्रम घेण्यात‌ आला. या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस उपस्थित होत्या. टेभेंवाडी, होनाड, आडोशी, चिंचवली गोहे, आतकरगाव ,ह्या गावांचा कार्यक्रमा मध्ये समावेश होता. गावातील महिला, किशोर वहीन मुली, लहानमुले, तसेच गरोदर मातांचा ह्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थिती होती. पोषण आहारामध्ये विविध पोषक आहार व गरोदर मातांना देण्यात येणारे आहार व त्यांच्या लहान मुलांचे संगोपन या विषयी माहिती अंगणवाडी शिक्षिका यांनी दिली.  कार्यक्रमामध्ये अंगणवाडी शिक्षिका सौं अर्चना देशमुख, सौं आरती देशमुख, सौं वनिता देशमुख, सौं कल्याणी देशमुख, सौं गीता पाटील आणि त्याच बरोबर मदतनीस तसेच गावातील महिला यांची मोलाची साथ मिळाली म्हणून हा कार्यक्रम खूप छान झाला.

कारगाव ग्रामस्थांचा पुढील पिढीसाठी कंपनी व खालापूर प्रशासनाविरुद्ध अस्तित्वाची लढाई

Image
  खालापूर/सुधीर देशमुख :- कारगावचे ग्रामस्थ हे कोयना धरण प्रकल्पग्रस्त असून त्यांना शासनानी दिलेल्या जागेतील वाहिवाटीस असलेल्या मौजे कारगाव तालुका खालापूर जिल्हा रायगड येथील खाजगी जमिनीतून पावसाळी वाहणारा ओढा व पाण्याचे झरे हे पुढे जाऊन पिण्याच्या पाण्याच्या चार विहिरी व एक बोरिंग च्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ पूर्वीपासुन आजपर्यंत वापर करत आहेत .सदरील गाव हे कोयना धरण प्रकल्पग्रस्त पुनर्वसन केलेले गाव असून त्या गावाला विहिरी व बोरिंग शासनाकडे पाठपुरावा करून मंजूर करून बांधून दिलेले आहे. खोपोली पाली रोड वरील कारगाव गावाच्या शेजारी जवळच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक वारसा असलेली उबरखिंड हे नाजिकच आहे व परिसरात घनदाट जंगल व झाडे, वनस्पती, औषदी झाडे व शुद्ध हवामान आहे. नैसर्गिक वारसा असलेल्या जागेवर भविष्यात गावाजवळ केमिकल कंपनी,"ब्राईट इनव्हायरनमेंट सोल्युशन्स या नावाची कंपनी आपले केमिकल कंपनीसाठी जागा घेऊन वातावरण व लोकांच्या आरोग्याची हानी कंपनीमुळे होणार आहे.  सदर मिळकतीचे पुर्वीचे मालक निमीत हंसराज बाफना यांनी ग्रामस्थांची फसवणुक गेली २०१५ पासु...

तांबटी येथे राष्ट्रीय पोषण माह उत्साहात साजरा

Image
    खालापुर/सुधीर देशमुख: -  तांबाटी गावात ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी सभाग्रुहात निरामय हेल्थ फाऊंडेशन आणि गोदरेज इंटरप्राइजेस ग्रुप यांच्या संयुक्त संयोगाने आरोग्यसमृद्धी प्रकल्प अंतर्गत राष्ट्रीय पोषण माह उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून आयरन युक्त रेसिपी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमास तांबटी ग्राम पंचायतचे सरपंच श्री. अविनाश आमले, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचे वरिष्ठ व्यवस्थापक CSR श्री. तानाजी चव्हाण, ICDS च्या सुपरवायझर सौ. अर्चना मॅडम, निरामय हेल्थ फाऊंडेशनच्या CEO डॉ. क्षमा निकम मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  यावेळी या उपक्रमात ५६ महिलांनी स्वतः बनवलेल्या आयरन युक्त पौष्टिक रेसिपी सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच ICDS अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनीही मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. राष्ट्रीय पोषण माहाच्या निमित्ताने घेतलेल्या या उपक्रमाद्वारे महिलांमध्ये पोषणाविषयी जागरूकता निर्माण होऊन आरोग्यदायी आहाराचे महत्त्व अधोरेखित झाले. विजेता महिलांची नावे : पहिला क्रमांक सौ ...

लालपरीची बससेवा खोपोलीकरांसाठी डोकेदुखी

Image
    खोपोली–पनवेल मार्गांवरील एसटी बससेवा प्रवाशांसाठी त्रासदायक अनुभव  प्रवाशांकडून आंदोलनाचा इशारा खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली येथून खालापूर, पनवेल, वाशी या मार्गांवर सुरू असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एसटी) बससेवा प्रवाशांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय ठरत आहे. शहर व ग्रामीण भागातील शेकडो प्रवासी दररोज या बससेवेवर अवलंबून असले तरी बस वेळेवर न येणे, चालक-वाहकांची अरेरावी, प्रवाशांना वाईट वागणूक, सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद असे अनेक गैरप्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.   वेळेवर न येणाऱ्या बसेस : - प्रवाशांच्या मते, खोपोली ते पनवेल दरम्यानच्या बसेसकडून वेळापत्रकाचे पालन होत नाही. बसेस ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा येतात किंवा काही वेळा अजिबात येत नाहीत. परिणामी, विद्यार्थ्यांना शाळा–कॉलेजला उशीर होतो तर नोकरदार वर्गांलाही दररोजच्या प्रवासात प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागते.   चालक–वाहकांची मनमानी : - या मार्गांवर कार्यरत असलेले काही चालक व वाहक प्रवाशांशी मनमानी वर्तन करतात, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. थांब्यावर प्रवासी उभे असतानाही बस थांबवली जात नाही. बस पुढ...

खोपोलीच्या विकासासाठी डॉं. सुनील पाटील हवेच!

Image
    खोपोली नगराध्यक्षपदी डॉं. सुनील गोटीराम पाटील हेच एकमेव पर्याय खोपोली / फिरोज पिंजारी :- नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. खोपोलीच्या गल्लोगल्ली, चौकाचौकांत चर्चा रंगू लागली आहे की, आगामी नगराध्यक्ष कोण? इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत आहे. परंतु खोपोली शहराच्या राजकारणात आणि विकासाच्या वाटचालीत गेल्या दोन दशकांपासून सातत्याने चर्चेत राहिलेले नाव म्हणजे डॉं. सुनील गोटीराम पाटील...नगरसेवक, गटनेते, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष अशी विविध पदे भूषवितांना त्यांनी खोपोलीच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. आता पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची रणधुमाळी जवळ येत असून नागरिकांमध्ये, खोपोलीच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व कोण ? या प्रश्नाचे एकच उत्तर ठळकपणे पुढे येत आहे, ते म्हणजे डॉं. सुनील गोटीराम पाटील!   भूतकाळातील उल्लेखनीय कार्य :- डॉं. पाटील यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळात खोपोली शहराने खर्‍या अर्थाने विकासाची गती पकडली होती. रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईट्स, शौचालये, बागबगीचे (गार्डन), पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधांच्या उभार...

महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटीची बैठक संपन्न

Image
  बागवान समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 100 व्यक्तींचा सन्मान करणार  पुणे /प्रतिनिधी :- पुण्यातील शासकीय विश्रामगृह क्रमांक दोन, आमदार निवास येथे महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटीची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील बागवान समाजासाठी कार्य करणाऱ्या प्रतिष्ठित पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. या बैठकीचे अध्यक्षस्थान कमिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉं. शरीफ बागवान यांनी भूषवले. सुरुवातीला आलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून समाजाच्या प्रगतीसाठी कमिटीची ध्येयधोरणे आणि आगामी योजनांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला की, महाराष्ट्रातील बागवान समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 100 मान्यवरांचा पुण्यात सन्मान केला जाणार आहे. डॉंक्टर, वकील, सरकारी अधिकारी, अभियंते, शिक्षक, शास्त्रज्ञ, उद्योगपती, व्यापारी आणि विद्यार्थ्यांचा यात समावेश असेल. या सर्वांचा मुख्यमंत्री, आमदार-खासदार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते ट्रॉंफी, प्रमाणपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव केला जाणार आहे. हा कार्यक्रम दोन महिन्यांत पार पडणा...

रॉयल्टीचोरांना पाठीशी घालणाऱ्या प्रातांधिकारी यांना निलंबित करा!

Image
  चौथास्तंभ पोखरला गेला असल्याचे संकपाळ यांचे मत   रॉयल्टीचोरांवर कार्रवाई करण्यास दाखवली असमर्थता आरटीआय कार्यकर्ते गावडे करणार कार्रवाईची मागणी अवैध उत्खनन व भराव करणाऱ्यांवर कार्रवाईबाबत अधिकाऱ्याची डोळ्यावर पट्टी, कानावर हात ? कर्जत / खलील सुर्वे :-  तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, निवासी नायब तहसीलदार (महसूल) व तहसिलदार कामात कसूर करीत असतील...शासनाचे नुकसान करीत असतील... भ्रष्टाचार करीत असतील, सर्वसामान्यांना न्याय देत नसतील तर त्याबाबत प्रातांधिकारी अर्थात उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागितली जाते, परंतु कर्जत-खालापूर तालुक्यात तर प्रातांधिकारी हेच कामात कसूर करीत असल्याचे दिसून येत आहे. ऐवढेच नव्हे तर राज्य शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असतांना मला काय करायचे...मला तर पगार आणि *** मिळत आहे ना ? शासनाचे नुकसान झाले तर झाले, ज्यांना शासनाचा पुळका आला असेल ते पाहतील...अवैध उत्खनन व भराव विरोधात तक्रार, आंदोलन, निवेदन, उपोषण, आत्मदहन केले तरी मी कार्रवाई करणार नाही, मी कार्रवाई करू शकत नाही, अशी भुमिका कर्जत प्रातांधिकारी प्रकाश संकपाळ यांनी घेतली असल्याच...

पत्रकारितेत उत्कृष्ट योगदानासाठी संपादक फिरोज पिंजारी यांना आंतरराष्ट्रीय सन्मान

Image
  खोपोली/मानसी कांबळे :- ज्येष्ठ पत्रकार व संपादक फिरोज बशीर पिंजारी यांना पत्रकारिता व जनसंचार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी International Journalism Council तर्फे “Certificate of International Recognition in Journalism & Mass Communication” या आंतरराष्ट्रीय सन्मानाने गौरविण्यात आले आहे. पत्रकार फिरोज पिंजारी हे केपी न्यूज ग्रुपचे प्रमुख असून, दैनिक कोकण प्रदेश न्यूज, दैनिक कोकण प्रजा, KP News Spark, KP News Nation, KP Khandesh Plus News, KP Mystery Cast, कोकण प्रवाह आणि KP News खोपोली अशा अनेक वृत्तपत्रांचे ते संपादक आहेत. ते DK Foundation and Freedom and Justice चे महाराष्ट्र राज्य डिप्टी चीफ ऑब्झर्व्हर तसेच News Journalist Association चे संस्थापक अध्यक्ष आहेत. 17 वर्षांहून अधिक काळ त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात कार्य करीत समाजातील प्रश्न निडरपणे मांडले असून, 2023 मध्ये त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘चौथास्तंभ’ राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता. त्यांचा हा सन्मान त्यांच्या नेतृत्वक्षमतेची आणि पत्रकारितेतल्या उत्कृष्ट योगदानाची आंतरराष्ट्रीय पातळीवरी...

अखेर बेपत्ता नौसैनिकाचा मृतदेह शोधण्यात यश

Image
    पाली भुतवली डॅम परिसरातील जंगल भागात आढळले शव !   सह्याद्री रेस्कीव टीम व नेरळ पोलिस पथकांच्या प्रयत्नांना यश !  कर्जत /नरेश जाधव :- मुंबई कुलाबा येथील डॉकयार्ड नौदलातील कार्यरत जवान सूरजसिंग चौहान हा काही दिवसांपासून रहस्यमयरीत्या बेपत्ता होता. सदर जवानाचे फोन लोकेशन हे कर्जत तालुक्यातील भिवपूरी रेल्वे स्थानक ते पाली भुतिवली डॅम परिसरातील जंगल भागात दिसून येत होते. 33 वर्षीय सुरजसिंग अमरपालसिंग चौहान हे भिवानी, राजस्थान येथील रहिवासी असून ते मुंबई येथील कुलाबा डॉकर्याड एफटीटीटी नौदल विभागामध्ये मास्टर चीफ इएआर क्लास दोन या पदावर सेवेत कार्यरत होते. 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास ते घरामधून निघून गेले होते. त्याचा नौदलाच्या जवानांनी सकाळपासून शोध घेतला व त्यांच्या फोनवर संपर्क केला असता, त्यांचा फोन बंद लागत असल्याने नौदलाने कफ परेड पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. सदर बेपत्ता जवान सुरजसिंग अमरपालसिंग चौहान यांच्या फोनचे लोकेशन हे कर्जत तालुक्यातील नेरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भिवपूरी रेल्वे स्थानकांच्या ते पाली भूतिवली धरण पर...

भारत भूषण खासदार सुनील तटकरे यांचा कर्जतमध्ये होणार ऐतिहासिक भव्य सत्कार सोहळा!

Image
  वावोशी येथील आढावा बैठकीत उत्साहाची लाट – कार्यकर्त्यांचा निर्धार ठाम   खालापुर/सुधीर देशमुख :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे भाग्यविधाते खासदार सुनीलजी तटकरे यांना लंडन येथे भारत भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या अभूतपूर्व सन्मानाने संपूर्ण रायगड जिल्हा अभिमानाने उजळून निघाला असून, आता त्यांच्या सत्काराचा ऐतिहासिक सोहळा 21 सप्टेंबर रोजी कर्जत येथे भव्य थाटात साजरा होणार आहे.        या संदर्भात वावोशी येथे झालेल्या आढावा बैठकीत उत्साहाची लाट उसळली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकरभाऊ घारे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून, “हा सत्कार आपला अभिमान आणि स्वाभिमान आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने यात सहभागी होऊन इतिहास घडवावा,” असे ठाम आवाहन केले. यावेळी खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांनी विशेष मार्गदर्शन करत, “हा सोहळा रायगडच्या जनतेचा आहे. कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नांनी कार्यक्रम अविस्मरणीय व्हावा,” असे सांगून कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश निर्माण केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल...

तहसील पुरवठा विभागात दलालांचा सुळसुळाट ?

Image
  कर्जतच्या पुरवठा विभागात भोंगळ कारभार  सर्वसामान्य नागरीकांची होतेय आर्थिक लूटमार अधिकारी करतात जाणीवपूर्वक डोळेझाक तहसिलदारांकडे तक्रारीनंतर पत्रकाराच्या घरी धाव कर्जत / विशेष प्रतिनिधी :- रेशन कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. रेशन कार्ड असलेल्या लोकांना परवडणाऱ्या किंमतीत विशिष्ट प्रमाणात आणि चांगल्या गुणवत्तेचे अन्नधान्य सरकारकडून दिले जाते. कर्जतच्या तहसील विभागात अनागोंदी कारभार सुरू असल्याचे दिसून येत असून या ठिकाणी अनधिकृतपणे काही लोक महसूल कर्मचारी असल्याचा वाव आणत जनसामान्य लोकांची विविध कामासाठी अर्थिक लूटमार करीत असल्याचे समोर आले आहे. सरकारी टेबलवर बसणाऱ्या खासगी व्यक्तींना त्याच विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याची चर्चा रंगू लागली असून त्याच्या वरकमाईत आर्थिक समभाग असल्याचे समजत आहे. या सर्व प्रकारची चौकशी करण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत. काही सामान्य व्यक्ती रेशनकार्ड संदर्भात पुरवठा विभागात गेल्यास अपुऱ्या कागदपत्रामुळे अधिकारी वर्गांकडून माघारी पाठविण्यात येते. यावेळी मात्र तेथील टेबलवर काम करणारे लोक अधिकाऱ्यांची नजर चुकवून या लोकांचा ...

मुंबई प्रादेशिक कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर संपन्न.....

Image
  मुंबई/प्रतिनिधी :- दि.14 सप्टेंबर रोजी ऑल इंडिया पोस्टल एससी/एसटी एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन, मुंबई क्षेत्र च्या वतीने मुंबईतील कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन शिबीर आज दास बंगला टिटवाळा कल्याण येथे आयोजित करण्यात आले.सदर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र गोवा राज्याचे संघटनेचे सर्कल सेक्रेटरी मा.जयराम जाधव यांनी केले. आपल्या उद्घाटन पर भाषणात श्री. जाधव यांनी उपस्थित कामगारांना संबोधित करताना संघटनेचे महत्व आणि या निमित्ताने आपली एकजुट किती आवश्यक आहे याचे महत्व पटवून दिले..आपल्या सारखे निष्ठावंत कार्यकर्ते हीच माझी ताकत आहे. त्यामुळे संघटनेच्या पाठी आपण एकदिलाने उभे रहा. मुंबई क्षेत्रातील बारा डिव्हिजन तसेच शेजारील ठाणे, नवी मुंबई ,कराड डिव्हिजन मधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.के. आर.शिलवंत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्कल उपाध्यक्ष सर्वश्री, तानाजी कांबळे, नवी मुंबई रिजनल सेक्रेटरी संजय जाधव, ठाणे डिव्हिजनचे सेक्रेटरी प्रविण जाधव, सर्कल ऑर्गनायझेशन सेक्रेटरी प्रविण बनसोडे, दिगंबर सोनवले,असी.सर्कल खजिनदार सुरेश रोडेवाड इत...

खोपोली शहरातील महिलांनी घेतला नृत्य स्पर्धेचा आस्वाद

Image
    आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व शिवसेना महिला आघाडी खोपोली शहर आयोजित नारी वैभव भारत दर्शन उत्साहात साजरा खोपोली / मानसी कांबळे :- आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व खोपोली शहर शिवसेना महिला आघाडी आयोजित नारी वैभव भारत दर्शन नृत्य स्पर्धा कार्यक्रम शनिवार, 13 सप्टेंबर रोजी महाराजा मंगल कार्यालय खोपोली येथे पार पडला. भारत देशातील विविधतेने नटलेली संस्कृती आपल्या नृत्य शैलीतून सादर करण्यात आली. महाराष्ट्रातील विविध भागातील संस्कृती या नृत्य अविष्कारातून सादर करीत महिलांनी नृत्य स्पर्धेचा आस्वाद घेतला. महाराष्ट्रातील कोकणी, कोळी, लावणी, आदिवासी, धनगर नृत्य, लोक नृत्य तसेच गुजरात, राजस्थान, आसाम, गोवा, केरळ, पंजाब, काश्मीर कर्नाटक आदी विविध राज्यातील सांस्कृतिक लोकनृत्य यावेळी सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मराठी चित्रपट अभिनेत्री भार्गवी चिरमुले या कार्यक्रमासाठी परिक्षक म्हणून उपस्थित होत्या.    यावेळी महिलांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तीन क्रमांक काढण्यात आले. प्रथम क्रमांक खोपोली पंजाबी नृत्य ग्रुप यांना ...

अहिल्यादेवी होळकर सामाजिक आणि शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीने 140 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

Image
  वाशी येथे पार पडला भव्य सत्कार समारंभ....   खालापुर/सुधीर देशमुख:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने अहिल्यादेवी होळकर सामाजिक आणि शैक्षणिक विकास ट्रस्ट यांच्या माध्यमातून समाजातील 300 कर्तृत्ववान आणि समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याचा तिसरा टप्पा नुकताच नवी मुबंई वाशी येथे पार पडला आहे.    अहिल्यादेवी होळकर सामाजिक आणि शैक्षणिक विकास ट्रस्टचे अध्यक्ष तथा ऑल इंडिया नगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील धनगर समाजातील महिलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या कर्तृत्ववान महिलांचा मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी नुकताच कराड येथे आयोजित कार्यक्रमात 146 महिलांचा, पुणे 90 येथे महिलांचा आणि आता वाशी येथे 140 अश्या एकूण 300 महिलांचा सत्कार करून अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती साजरी करण्यात आली.      यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार रामहरी रुपणवर, मुबंई महानगरपालिकेचे उपायुक्...

आरपीआय वर्धापन दिनाच्या जय्यत तयारीला लागा !

Image
   मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांचे कायकर्त्यांना आवाहन कर्जतमध्ये वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न   कर्जत तालुकाध्यक्ष हिरामण गायकवाड यांना शाबासकीची थाप नूतन रायगड जिल्हा संपर्क प्रमुख राहुल सोनावळे यांचा सत्कार  कर्जत/नरेश जाधव :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचा 68 वा वर्धापन दिन 3 ऑक्टोबर 2025 रोजी संपन्न होत असून यंदा या सोहळ्याचा मान रायगड जिल्ह्याला मिळाला आहे. महामानव डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड नगरीत राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वर्धापन दिन सोहळा संपन्न होणार आहे. त्याच अनुषंगाने कर्जत तालुकाध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील शेळके बँक्वेट हॉल किरवली येथे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत शहर व तालुका कार्यकारिणीची बैठक, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 68 वा वर्धापन दिन सोहळा आढावा बैठक व रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी राहुल सोनावळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा विश...

शिळफाटा येथील पोस्ट ऑफिस सुरू करा!

Image
    अन्यथा आम आदमी पार्टी आंदोलन करणार    मागील चार महिन्यापासून पोस्ट ऑफिस बंद खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद हद्दीतील शिळफाटा येथील पोस्ट ऑफिस हे पावसाळ्यात पाण्याच्या गळतीमुळे बंद करण्यात आलेले असून शिळफाटा व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिकांना खोपोली शहरात आपल्या पोस्टाच्या कामाकरीता करण्याकरीता जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.  पोस्ट ऑफिस हे गळत असल्याकारणाने बंद करण्यात आलेले असून आम्ही नवीन जागा शोधत आहोत, अशी माहिती अधिकाऱ्यांमार्फत मिळालेली आहे.  शिळफाटा येथील पोस्ट ऑफिस हे मागील चार महिन्यापासून बंद आहे व त्यामुळे सर्व नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, तरी सदर पोस्ट ऑफिस तातडीने सुरू न झाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉं. रियाज पठाण यांनी दिला आहे.