Posts

Showing posts from August, 2025

रायगड मित्र मंडळ प्रणित रायगड ग्रुप यशवंत नगर येथे गणेशोत्सव

Image
  खोपोली / मानसी कांबळे :- गणपती ही संघटनेची देवता आहे. ऋग्वेदात ब्रह्मणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे, असे त्यात म्हटले आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा 27 ऑगस्ट 2025 ते 2 सप्टेंबर 2025 रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून रायगड मित्र मंडळ प्रणित रायगड ग्रुप यशवंत नगर येथे 27 ऑगस्ट 2025 रोजी ढोलताशाच्या गजरात गणपतीचे आगमन झाले. गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीचे स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य आदी सोळा उपचारांनी पूजा केली. यशवंत नगर परिसर तसेच आजुबाजुच्या परिसरातील भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येत आहेत. या गणेशोत्सवाला माजी नगरसेवक आनंद नायडू, मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत आठवले, उपाध्यक्ष संतोष नायडू, सनी पुजारी, सूरज परदेशी, प्रकाश मचकुरे, सुजल गायकवाड, भीमा मचकुरे, इरफान शेख, तुषार साळुंखे, उस्मान शेख, सतीश साळुंखे, निखिल शितोळे, ओंकार पवार, सत्यम गिरी, गणेश गोसावी, ऋषिक...

श्रीपत सूर्यवंशी शिळफाटा खोपोली येथे गणरायाचे आगमन

Image
  खोपोली /मानसी कांबळे :- गणपती ही संघटनेची देवता आहे. ऋग्वेदात ब्रह्मणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे, असे त्यात म्हटले आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा 27 ऑगस्ट 2025  ते 2 सप्टेंबर 2025 रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असुन शिळफाटा नवनाथ कॉलनी येथे श्रीपत गणपत सुर्यवंशी, संतोष श्रीपत सूर्यवंशी यांच्या घरी 27 ऑगस्ट 2025 रोजी ढोलताशाच्या गजरात गणपतीचे आगमन झाले. गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीचे स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य आदी सोळा उपचारांनी पूजा केली. यशवंत नगर परिसर तसेच आजुबाजुच्या परिसरातील भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येत आहेत. यावेळी गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीचे स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य आदी सोळा उपचारांनी पूजा करून मोदकाचा नैवेद्य देण्यात आला. आर...

भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडीच्या तालुका उपाध्यक्षपदी स्वप्नील फराट यांची नियुक्ती

Image
  खालापुर/ दिपक जगताप :- भारतीय जनता पार्टी खालापुर तालुका पूर्व मंडळात विविध पदाधिकाऱ्यांची नवनियुक्ती जाहीर करण्यात आले असता यामध्ये ओबीसी मोर्चा खालापूर तालुका, कामगार आघाडी खालापूर तालुका व ट्रान्सपोर्ट आघाडी खालापूर तालुका याची नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आल्याने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.        भाजपाचे नेते तथा आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी व खालापूर तालुका अध्यक्ष सनी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ओबीसी मोर्चा खालापुर तालुका अध्यक्ष भरत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी मोर्चाच्या तालुका सरचिटणीसपदी महेश निरगुलकर, उपाध्यक्ष दिनेश  जंगम, उपाध्यक्ष योगेश महाडिक, चिटणीस रोणित म्हात्रे चिटणीस भगवान गणेशकर, कोषाध्यक्ष रोहित बोरीटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर कामगार आघाडीचे तालुका अध्यक्ष निलेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली कामगार आघाडीच्या तालुका उपाध्यक्षपदी मोहन घाडगे व स्वप्नील फराट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आंदोलक नवी मुंबईत दाखल होण्यास सुरुवात

Image
  मराठा आंदोलन : एपीएमसीत मुक्कामाची सोय   महापालिका-सिडकोकडून अद्याप सहकार्य नाही वाहनांमुळे खोपोली व खालापुरात वाहतूक कोंडी  खोपोली / मानसी कांबळे :- मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची भूमिका ठाम ठेवत मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. राज्यभरातून लाखो मराठ्यांनी त्यांना पाठींबा दिला असून अनेकजण या आंदोलनात सहभागी होताना दिसत आहेत. शुक्रवार, 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील बेमुदत आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. त्यांचा ताफा लवकरच मुंबईत पोहचणार आहे. आंदोलक खोपोली, खालापूर मार्गे नवी मुंबई व मुंबईत प्रवेश करीत आहेत. हजारों मराठा आंदोलक बोरघाटातून खोपोलीत उतरल्याने खोपोली शहर व शिळफाटा येथे काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सकल मराठा मोर्चाच्या निमित्ताने वाहतुकीचे नियोजनाचे अवलोकन करण्यासाठी खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्यासमवेत खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी दौरा केला होता. तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉं. विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाल...

सौ.आश्विनी खंडागळे ठरल्या पहिल्या आगळ्यावेगळ्या वाढदिवसाच्या पैठणी विजेत्या..

Image
  खोपोलीत महिलांसाठी अनोखा उपक्रम : पाताळगंगा नदी पूजनासह एकत्रित वाढदिवस सोहळा संपन्न. खालापूर/दिपक जगताप :- सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या सहज सेवा फाउंडेशन तर्फे खोपोली येथे शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी महिलांसाठी आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. दर महिन्याला वाढदिवस असणाऱ्या महिलांचा पाताळगंगा नदीकिनारी नदी पुजन व आरतीनंतर सामूहिक वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला.सुरुवातीस सामूहिक नदी पूजन व आरती करण्यात आली. यानंतर ऑगस्ट महिन्यात वाढदिवस असणाऱ्या महिलांना सौ. रेखा भालेराव यांच्या हस्ते औक्षण करण्यात आले. ऑगस्ट महिन्यात वाढदिवस असणाऱ्या महिलांचा सामूहिक केक कापून आनंद साजरा करण्यात आला.यावेळी लकी ड्रॉ द्वारे काढलेल्या ड्रॉ मध्ये आश्विनी खंडागळे या विजेत्या ठरल्या.विजेत्या महिलेस खोपोली नगरपालिकेच्या मा.नगरसेविका निर्मला शेलार यांच्या हस्ते पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आली. महिलांच्या सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाची आखणी करण्यात आली असून, सहज सेवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व सहभागी सर्वांनी या नवीन प्रयोगाबाबत उत्साह व्यक्त केल...

सालवड येथे विज वाहिनी कोसळून चिमुकल्याचा मृत्यू

Image
  जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी  कर्जत तालुका विज ग्राहक संघर्ष समिती व शिवसेना ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा    कर्जत/नरेश जाधव :- कर्जत तालुक्यातील सालवड गावात दि.२४ ऑगस्ट २०२५ रोजी विज वाहिनी अंगावर पडून केवळ ९ वर्षांच्या शिव रुपेश भोसले या निरागस चिमुकल्याचा मृत्यू झाला आणि संपूर्ण तालुक्यात संतापाचा भडका उडाला. गावकऱ्यांनी ही दुर्घटना केवळ अपघात नसून महावितरणच्या निष्काळजीपणाचे थेट परिणाम असल्याचे ठासून सांगितले आहे. दोन दिवसांपूर्वीच विज वाहिनीची दुरुस्ती झाली असताना थातुरमातुर व निष्काळजी कामामुळेच हा बळी गेला असून यासाठी असिस्टंट इंजिनिअर सिंग थेट जबाबदार आहेत, असा रोष व्यक्त करण्यात आला आहे. मात्र इतक्या गंभीर घटनेनंतरही पोलीस प्रशासनाने केवळ एडीआर दाखल करून मामला दडपण्याचा प्रयत्न केल्याने नागरिकांचा संताप आणखी भडकला आहे.        सोमवार, दि.२५ ऑगस्ट रोजी कर्जत तालुका विज ग्राहक संघर्ष समिती व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने कर्जत पोलीस ठाण्यावर धडक देत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोस...

फिट इंडिया मोहिमेंतर्गत कर्जत खालापूर रस्त्यावर सायकलथॉनमध्ये शेकडो सायकलपटूंचा सहभाग.

Image
  रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षिका आंचल दलाल यांनी स्पर्धेला दाखवला हिरवा झेंडा.  खालापूर/ दिपक जगताप :- भारत सरकारच्या निर्देशानुसार व फिट इंडिया मोहिमेअंतर्गत रायगड जिल्हा पोलीस आयोजित सायकलथॉन 2025 चे आयोजन खालापूर तालुका पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आले. या अभूतपूर्व अशा सायकल स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षिका श्रीमती आंचलदलाल यांची विशेष उपस्थिती होती. पळस दरी ते हॉलिडे बँक्वेट हॉल अंजरूण या दरम्याच्या दहा किलोमीटर एवढ्या अंतराच्या स्पर्धेस त्यांनी हिरवा झेंडा दाखवला.  सायकल इंडियाचे सायकल पटू, हौशी सायकल पटू, पोलिस अधिकारी आणि कर्मचारी, होमगार्ड, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यांचा शेकडोच्या सहभागातून सायकलथॉन स्पर्धेचा उत्साह ओसंडून वाहत होता.  खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या सायकलथॉन स्पर्धेत अविनाश पोळ यांनी 20.22 सेकंदात दहा किलोमीटरचे अंतर पार करून प्रथम क्रमांक मिळवला तर अनुक्रमे आर्यन सणस आणि विश्वजित पाटील यांनी काही सेकंदाच्या फरकाने दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. त्यांचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात आले त्...

कोट्यावधींचा खर्च तरी शहरात स्वच्छतेची बोंबाबोंब ?

Image
    रिकाम्या तळ्यात, कचऱ्याचा साठा...बहिरा म्हणतो वार्ता काय, आंधळा म्हणतो नाचते गाय...खोपोली शहरात नक्की चाललंय तरी काय ? खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली शहरात समस्यांचा डोंगर उभा आहे...कचरा, पाणी, खड्डे, अस्वच्छता आणि बेसुमार भष्ट्राचार, अशा परिस्थितीत मुख्याधिकारी रायगड जिल्ह्यातील' बेस्ट सिओ' ठरले आहेत. नेमका पुरस्कार मिळाला कसा... पुरस्कार देतांना कोणत्या कामाचे मोजमाप झाले आणि पुरस्कार घ्यायला गेले कसे ? हा खरे तर संशोधनाचा विषय आहे. पण मिळाला, तो मिळाला...त्यासाठी खोपोली करांनी साहेबांचे अभिनंदन करायलाच हवे...आणि पुरस्कारातून बाहेर येवून साहेबांनी आता खोपोली शहरातील समस्यांचा डोंगर भुईसपाट करावा, अशी अपेक्षा खोपोलीकर सुज्ञ जनतेतून होत आहे.  स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे विविध आजार पसरतात, आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि पर्यावरणाचीही हानी होते. यामध्ये वैयक्तिक स्वच्छता न राखणे, परिसर अस्वच्छ ठेवणे, प्लास्टिकचा वापर आणि कचरा योग्य ठिकाणी न टाकणे...संसर्गजन्य रोग, हवामानातील बदल आणि एकूणच जीवनशैलीवर गंभीर परिणाम होतात. खोपोली शहरात अनेक शाळांसमोर घाणीचे ढीग साच...

खोपोली नगर परिषदेसाठी मजुरांचा जीव स्वस्त ?

Image
    तात्पुरत्या आणलेल्या मजूर सुरक्षेपासून वंचित ? सुरक्षा साधनांशिवाय राबताहेत मजूर कामगार ? पर्मनंट कामगारांचा जीव महत्वाचा, पण तात्पुरत्या मजुरांचा गेला तरी चालेल ?  मुख्याधिकारी साहेब सुरक्षा फक्त पर्मनंट कामगारांसाठी आहे का ? खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली नगर परिषद कार्यालयाचे काम करण्यासाठी रोजंदारीवर तत्काळ स्वरूपात आणलेले कामगार मजुर सुरक्षा साधनांच्या कमतरतेमुळे असुरक्षित असल्याचे पहायला मिळत असून त्यांना मिळणा-या सोयीसुविधा अपु-या असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे दिसून येत आहे. रोजंदारी स्वरूपात कामास घेऊन तात्काळ कामापुरते त्यांचा वापर केला जात आहे. पण हे काम करतांना त्यांच्या सुरक्षिततेची काळजी खोपोली नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक, संबधित विभागाचे अधिकारी व प्रशासनाला नसल्याचे दिसून येत आहे. खोपोली नगर परिषदेत पर्मनंट (कायमस्वरूपी) कामाला असणारी व्यक्तीच माणूस आहे, तात्पुरत्या स्वरूपात रोजंदारीवर आणलेले मजूर माणूस नाहीत...त्यांचा जीव महत्वाचा नाही...त्यांच्या जीवाची कोणतीच किंमत नाही...ते काम करता करता सुरक्षे अभावी मेले तरी त्याचे...

जयराम जाधव यांचा सन्मान

Image
  नांदेड/जावेद अहेमद :- संघटनेतर्फे ऑल इंडिया पोस्टल एससी एसटी एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशनचे महाराष्ट्र सर्कलचे सर्वेसर्वा, ज्यांना केवळ नाम ही काफी है असं म्हटलं जातं, आमचे आधारस्तंभ तसेच भारतीय डाक विभागाची शान जयराम जाधव सर यांची महाराष्ट्र पोस्टल वेल्फेअर बोर्डावर निवड झाल्याबद्दल त्यांचे आपल्या सेंट्रल सॉ. डिव्हिजन शाखेतर्फे अभिनंदन करण्यात आले.  सदर प्रसंगी प्रमुख उपस्थिती आमचे रिजनल सेक्रेटरी पिराजी सदावर्ते सर यांनी दाखवली तसेच मुंबई सेंट्रल सॉर्टिंग विभागाचे सचिव आयु.सुरेश रोडेवाड मुंबई सॉर्टिंग विभागाचे अध्यक्ष आयु.अर्जुन भोसले, खजिनदार संदीप पांचाळ , नरिमल पॉईंट पोस्टमन नागनाथ कोरुळे , श्रीरंग वाजे व आदी कर्मचारी उपस्थित होते.             

मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून 200 वर्षापूर्वीचे पिंपळाचे वृक्ष तहसीलदार अभय चव्हाण , खालापूर नगरपंचायत आणि हेल्प फाउंडेशन यांच्या मदतीने हटविले..

Image
  तहसीलदार अभय चव्हाण यांच्यासह नागरिक भाऊक  खालापूर दिपक जगताप :- संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाने धुमाकुळ घातला असून अशा परिस्थितीमध्ये काळजीवाहू तहसीलदार अभय चव्हाण ॲक्शन मोड मध्ये कार्यरत असून सतत फोन कॉल, व्हॉट्सॲप मेसेज यांच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील प्रत्येक ठिकाणची अपडेट घेऊन प्रसंगी स्वतः उपस्थित राहून जनतेला धीर देत सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत. आज खालापूर शहरामध्ये असणारा प्राचीन शंकर मंदिरालगत 200 वर्षापूर्वी पासून असलेले पिंपळाचे झाड पडण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली असता स्वतः निर्णय घेत खालापूर नगरपंचायत,हेल्प फाउंडेशन आपत्ती व्यवस्थापन व खालापूर नागरिक यांच्या मदतीने 200 वर्षापूर्वीचे पिंपळाचे झाड बाजूला करण्याचे उत्तम प्रकारे केले. खूप वर्षे जुने असलेले पिंपळाचे झाड कसे तोडायचे हा विचार सर्वांच्या मनात येत असताना दुसरीकडे बाजूला असलेल्या नागरिकांची घरे व लगत असलेले भगवान श्री शंकराचे मंदिर यांचे मोठे नुकसान होऊ नये या साठी तहसीलदार अभय चव्हाण यांनी नागरिकांच्या विनंती वरून ते झाड बाजूला करण्याचे उत्तम काम केले. यावेळी तहसीलदार यांच्यासह नागरिक भाऊक झ...

संसदेत 130 वा संविधान दुरुस्ती विधेयक सादर : सत्ता वापरून तुरुंगातून राज्य करणाऱ्यांना मोठा धक्का – तुषार तानाजी कांबळे

Image
  नवी दिल्ली/प्रतिनिधी:- संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच 130 वा संविधान दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केले. या विधेयकानुसार प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री किंवा राज्य मंत्री जर गंभीर फौजदारी गुन्ह्यातील आरोपामुळे सलग 30 दिवस तुरुंगात राहिला, तर 31 व्या दिवसापासून त्याचे पद आपोआप संपुष्टात येईल. यानंतर राष्ट्रपती किंवा राज्यपाल अशा व्यक्तीला पदावरून हटविण्याचा औपचारिक आदेश देतील. सरकारचे म्हणणे आहे की हा कायदा भ्रष्टाचार रोखण्यासाठी, राजकारणातील शुचिता वाढविण्यासाठी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक सत्ता गैरवापर करू नयेत यासाठी महत्त्वाचा आहे. नेते तुरुंगात असताना सत्तेच्या माध्यमातून पुरावे नष्ट करणे, तपासात अडथळे निर्माण करणे किंवा साक्षीदारांवर दबाव आणणे थांबावे, हा यामागचा उद्देश आहे. मात्र या विधेयकावर संसदेत तीव्र विरोधही झाला. विरोधकांचे म्हणणे आहे की, हा कायदा राजकीय सूडबुद्धीने वापरला जाऊ शकतो. खोट्या गुन्ह्यात फसवून एखाद्या नेत्याला तुरुंगात डांबले गेले, तर तो निर्दोष असूनही त्याचे पद जाईल. यामुळे लोकशाहीची घडी विस्कळीत होऊ शकते, असा इशारा ...

प्रत्येक घरातून उभा राहिला पाहिजे नवा 'डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम' – आमदार श्री महेंद्र थोरवे

Image
  खालापुर/ सुधीर देशमुख :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे आणि प्रत्येक घरातून नवे 'डॉ. कलाम' घडावेत या उद्देशाने आमदार श्री. महेंद्र थोरवे यांच्या हस्ते आज दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता रायगड जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा, कळंब (कर्जत) येथे अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा (ई-लर्निंग क्लासरूम) चे उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले तसेच प्रयोगशाळा व क्रीडांगणासाठी मोठा निधी मंजूर करण्याची घोषणा करण्यात आली.  याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “मोबाईलपेक्षा संगणकाचा वापर करा. ग्रामीण भागातील मुलेच देशाचे भविष्य आहेत. आज केंद्र व राज्य शासनाच्या डिजिटल उपक्रमांमुळे गावागावांत दर्जेदार शिक्षण पोहोचत आहे. त्याचा लाभ घ्या आणि प्रत्येक घरातून नवा डॉ. कलाम घडवा.” तसेच कळंब शाळा डिजिटल शिक्षणाच्या नव्या पर्वात पदार्पण करत आहे तसेच ही रायगड जिल्हा परिषदेची आदर्श केंद्र शाळा आहे व भविष्यात राहील असा व्यक्त केला. कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी अनंत खैरे, केंद्रप्रमुख माधुरी पाटील, मुख्याध्यापक एच. के. लोहकरे...

नांदेडहून मुंबईपर्यंत सेवा व सामाजिक एकोप्याची गौरवयात्रा

Image
शेख सलीमाबी चाँद साब यांना ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार नांदेड/जावेद अहमद :- नांदेड जिल्ह्यातील हिप्परगा थडी येथील ग्रामीण भागातून सामाजिक सेवेची सुरुवात केलेल्या बिलोली तालुक्यातील अटकळी येथील रहिवासी शेख सलीमाबी चाँद साब (वय 32) यांचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार शिवराज बहुउद्देशी विकास संस्थेतर्फे जाहीर झाला आहे. भारतीय डाक विभागात कार्यरत असलेल्या शेख सलीमाबी गेल्या पाच वर्षे ग्रामीण डाक सेवक म्हणून काम करत, विभागाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आहे. त्यांनी जात आणि धर्म या सीमांच्या पलीकडे जाऊन सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी निरंतर प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत ‘एक्सप्रेस’ वृत्तपत्राद्वारे हिरकणी पुरस्कार मिळाला होता. तसेच, 2023–24 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे डाक विभागाच्या वतीने उत्कृष्टता पुरस्कारही सन्मान स्वरूपात देण्यात आला आहे. नुकतंच त्यांनी सामाजिक सद्भावनेची जागरूकता जपत रक्षाबंधन साजरे केले, ही बाब कौतुकास्पद आहे. या उपक्रमाबद्दल संस्थेच्या संस्थापक व अध्यक्ष खुशी कांबळे यांनीही आपले कौतुक व्यक्त केले आणि शेख सलीमाबी यांच्या कार्याचा सामाजिक दृष्टीकोनातून मान...

कर्जतकरांनी अनुभवला जोश पूर्ण दहीहंडीचा थरार..

Image
कर्जत/नरेश जाधव :- आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व शिवसेना कर्जत शहर आयोजित दहीहंडी उत्सव दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता रॉयल गार्डन शेजारी मैदान कर्जत रायगड येथे आयोजित करण्यात आला होता.       या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहून दहीहंडी उत्सवानिमित्त आलेल्या गोविंदाशी संवाद साधला दहीहंडी उत्सव हा एकात्मतेचे प्रतीक आहे हा उत्सव संपूर्ण देशभर साजरा केला जातो. शिवसेनेचे मुख्य नेते मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी गोविंदा पथकांसाठी विमा घोषित केला व प्रत्येक गोविंदाची काळजी घेण्याचा वचन दिले त्यामुळे हा दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे मी सर्व गोविंदां पदकांचे त्या निमित्ताने अभिनंदन करतो आपण हा जल्लोषपूर्ण थरार या ठिकाणी अनुभवत आहात व दहीहंडीला सलामी देत आहात. तसेच कर्जतकरांनी या दहीहंडी महोत्सवाला जी साथ दिली त्याबद्दल समस्त कर्जतकरांचे देखील अभिनंदन व आभार तसेच अजय पाल व विजय पाल यांच्यासह गुंडगे मधील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याबद्दल त्यांचे देखील पक्षात स्वागत केले व येणाऱ...

वावोशी गावातील टिळक परिवाराची १५० वर्षांची परंपरा असणारा कृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्सवात साजरा..

Image
    सोहळ्यात भाजपा नगरसेविका मृणाल पेंडसे यांची विशेष उपस्थिती.. खालापुर/सुधीर देशमुख:- वावोशी गावातील टिळक कुटुंब आयोजित पारंपरिक कृष्ण जन्माष्टमी उत्सव यावर्षीही मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. तब्बल १५० ते १७५ वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव टिळक कुटुंबाच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात पार पडतो. मात्र ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग असल्याने हा खासगी उत्सव सामूहिक सोहळ्यात रूपांतरित झाल्याचे पाहायला मिळते.      या प्रसंगी ह. भ. प. शेखर बुवा व्यास यांच्या कीर्तनासह पाळणा, न्हाऊ-माखू, कृष्ण लीला, टिपरी खेळ, तसेच “राधा कृष्ण जय कुंजविहारी” या भजनावर फेर अशा कार्यक्रमांना उपस्थितांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. मंद प्रकाशातील पारंपरिक काचेच्या हंड्यांमध्ये पार पडलेला कृष्णजन्म सोहळा अविस्मरणीय ठरला. यामध्ये तबलजी बल्लाळ ढवले यांनी दिलेली साथ आणि अनन्या अथर्व देव यांनी सादर केलेल्या अभंगामुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. या सोहळ्याला ठाणे येथील भाजपा महिला अध्यक्ष व नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. त्यांनी रविंद्र टिळक व मामा टिळक यांच्य...

गावातील ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकापर्यंत आता सर्वांवर असणार केंद्र सरकारची नजर !

Image
  सरकारचा ऐतिहासिक निर्णय खालापुर/सुधीर देशमुख :- तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये, ग्रामपंचायतच्या कारभारामध्ये सरपंच किंवा ग्रामसेवक मनमानी करतोय का? मग आता चिंता करू नका. केंद्रातील सरकारने अशा मनमानी कारभार करणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवकांचा बंदोबस्त करण्यासाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. या नव्या प्रणालीचा काल 15 ऑगस्ट पासून अर्थातच स्वातंत्र्य दिनापासून शुभारंभ झाला असून या नव्या प्रणालीमुळे ग्रामीण शासन व्यवस्थेत पारदर्शकता येणार असल्याचा विश्वास व्यक्त होतोय. खरे तर ग्रामपंचायतीत सरपंचाकडून तसेच तेथील ग्रामसेवकांकडून मनमानी कारभार चालवला जातोय असा आरोप सातत्याने केला जातो. गावागावांमध्ये असे प्रकार बिनधास्त सुरू आहेत. या लोकांना शासनाचा अजिबात वचक राहिलेला नाही. काही गावांमध्ये ग्रामसभाच घेतल्या जात नाहीत. ग्रामसभा फक्त कागदावर राहते. मात्र आता यापुढे अशी कोणतीच घटना होणार नाही. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय च्या मदतीने ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या कारभारावर करडी नजर ठेवली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने सभासार ही नवीन प्रणाली लॉन्च केली आहे. या नव्या प्रणालीम...

वृंदावन अपार्टमेंट मध्ये गोकुळाष्टमी सण साजरा

Image
  खालापुर/सुधीर देशमुख :- गोकुळाष्टमी हा एक महत्वाचा हिंदू सण आहे, जो भगवान श्रीकृष्णाच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या दिवशी, भक्त उपवास करतात, कृष्णाची पूजा करतात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो. दरवर्षी प्रमाणे वृंदावन अपार्टमेंट मध्ये पारंपरिक सण साजरे केले जात असून आज सर्व सभासद व लहान मुले तसेच मोठ्या मुलांनी व सर्व सभासदारांनी गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. यावेळी वृंदावन अपार्टमेंट येथील मुलांनी दही हंडी फोडून तेथील वातावरण आनंदमय आणि उत्साही करत दहीहंडी हा सण साजरा केला. गोकुळाष्टमीचे महत्व भगवंताचा जन्म गोकुळाष्टमी हा भगवान विष्णूचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाच्या जन्माचा दिवस आहे. हा दिवस भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला येतो.  भक्ती आणि श्रद्धेचा दिवस: - या दिवशी, भक्त उपवास करतात, कृष्णाची पूजा करतात, आणि कृष्णाच्या बाललीलांचे स्मरण करतात. यामुळे भक्तांमध्ये भक्ती आणि श्रद्धेची भावना वाढते.  सांस्कृतिक आणि सामाजिक महत्व:- गोकुळाष्टमी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरी केली . या दिवशी, दहीहंडी फोडणे, पार...

आमदार श्री महेंद्र थोरवे यांचा कर्जत खालापूर मतदारसंघावर करिष्मा कायम....

Image
भिवपुरी ग्रामपंचायत हद्दीतील उद्धव बाळासाहेब गट व राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश.... कर्जत /नरेश जाधव :- दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सायं 6.00 वाजता बाळासाहेब भवन, जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे भिवपुरी ग्रामपंचायत हद्दीतील उद्धव बाळासाहेब गट व राष्ट्रवादीतील पक्षातील कार्यकर्त्यांनी आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला याप्रसंगी उपसरपंच हरिचंद्र निसाळ, संतोष घाडगे, प्रशांत दळवी भरत गाडे मच्छिंद्र गाडे ,रामचंद्र निसाळ ,मधु पवार ,महेंद्र गाडे ,विजय लोहट ,राजेश पठार ,अनिल पठार ,विलास नवले ,सागर दिसले ,संतोष लांगी ,संतोष सावंत ,पुंडलिक गोडे ,दशरथ मोकणे ,सुरज साळुंखे ,संदीप शिंदे ,मंगेश शिंदे ,अक्षय गाडे ,चेतन बुरगुने, गोपाळ मांडे, संजय वाघमारे ,विजय वाघमारे ,सुनील वाघमारे ,अंकुश वाघमारे ,सुधीर दाते ,मंथन सावंत ,मुकुंद सावंत ,अनिल वाघमारे ,किसन वाघमारे, रमेश बीड ,जयेश वाघमारे ,सुनील जाधव ,दत्ता वाघमारे ,श्याम मुकणे ,लहू वाघमारे ,मारुती भोसले ,गोविंद मोकणे ,अर्जुन हिलम, गणेश वाघमारे, मारुती वाघमारे ,जयवंत न...

आमदार महेंद्र थोरवे यांनी खालापूर तालुक्यातील उजळोली ते करंबेळी ठाकूरवाडी रस्त्याची मंजुरी मिळवून दिल्याने स्थानिकांनी मानले आभार..

Image
  खालापुर/ सुधीर देशमुख:- तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या उजळोली ते करंबेळी ठाकूरवाडी कडे जाण्यासाठी येथील रहिवाश्यांना रास्त न्हवता. रस्ता होता पण पायवाट त्यामुळे येथील डोंगराळ भागातील गावामध्ये राहणाऱ्या नागरिकांना गेली अनेक वर्षे जीव मुठीत घालून लांबचा प्रवास करावा लागत होता. याबाबत येथील नागरिकांनी कर्जत खालापूर विधानसभा युवासेना अध्यक्ष रोहित विचारे यांना रस्त्याची समस्या मंडळी त्यामुळे युवासेना अध्यक्ष रोहित विचारे यांनी सदरील रस्त्याची पाहणी करून माहिती घेतली असता सदरील पायवाट रस्ता हा वनविभाग मधून जात असल्याचे समजले. याबाबत रोहित विचारे यांनी कर्जत खालापूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांना उजळोली ते करंबेळी ठाकूरवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याची समस्या सांगत रस्ता करून देण्याची मागणी केली. याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांनी शासनाच्या सर्व परवानगी घेऊन , महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास संस्था अंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील उजळोली ते करंबेळी ठाकूरवाडी रस्ता मंजूर करून कार्यारंभ आदेश मिळवून दिल्याने येथील स्थानिकांनी फटाक्याची आतिषबाजी कर...

नागरिकांना विहित वेळेत आणि सुरळीत डिजिटल सेवा द्या....

Image
महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे.... रायगड /प्रतिनिधी :- रायगड जिमाका दि. 15- आधार कार्ड नोंदणी आणि प्रमाणिकरण प्रक्रियेला गती देण्यासाठी शासनाने आधारसंच उपलब्ध करून दिले आहे. तरी या सर्व संच धारकांनी वेळेत आणि सुरळीत नागरिकांना सुविधा दयाव्यात अशा सूचना महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांनी दिल्या.  नियोजन भवन येथे महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यासाठी प्राप्त नवीन आधार संचाचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आचल दलाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपवनसंरक्षक राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी डॉ रविंद्र शेळके उपस्थित होते. जिल्ह्यात 71 संचचे वाटप यावेळी करण्यात आले.  यावेळी मार्गदर्शन करताना कु. तटकरे म्हणाल्या, आधार कार्ड आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांना ही सेवा वेळेत आणि सुरळीत मिळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते. माहिती व तंत्रज्ञान विभागाने उपलब्ध करून दिलेल्या या किट्समुळे महानगरी भागांपासून अगदी दुर्गम ...

सार्वजनिक बांधकाम विभाग खालापूर यांच्या वतीने प्राथमिक शाळा खालापूर येथे स्तुत्य उपक्रम...

Image
  आरोग्य तपासणी, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप... खालापूर/ मानसी कांबळे :- सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल अंतर्गत सार्वजनिक बांधकाम उपविभाग खालापूर यांचे मार्फत ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत रा जि प शाळा खालापूर या ठिकाणी १३ ऑगस्ट चित्रकला स्पर्धा,१४ ऑगस्ट निबंध स्पर्धा व १५ ऑगस्ट २०२५ रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.  चौक ग्रामीण रुग्णालयचे डॉ.राम शेट्टी, डॉ. ओव्हाळ मॅडम,डॉ.नूतन डॉ.मोहित व त्यांचे सहकारी यांनी आरोग्य शिबीर यशस्वीपणे संपन्न केले. सकाळी 9:30 वाजता बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या वेळी विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह ओसंडून वाहत होता.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविल्याने पालकांनी सर्व अधिकारी वर्गाचे आभार मानले.कार्यक्रमाच विशेष आकर्षण ठरले ते खालापूर तालुक्यातील कारगिल युद्धातील व १९७१ युद्धाचे युद्धवीर, माजी सैनिक मेजर प्रकाश महाडिक, मेजर बी एन भोसले, मेजर रमाकांत मोदी, मेजर शरद विचारे, मेजर शैलेश मंगले,...

पत्रकार अनिल पवार यांची डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

Image
  मुंबई / मानसी कांबळे :- केपी न्यूज चैनल, दैनिक कोकण प्रजा, दैनिक कोकण प्रदेश न्यूजचे राष्ट्रीय संपादक व न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव, निर्भिड, धडाडीचे पत्रकार अनिल वसंत पवार यांची मानवी हक्क, अधिकार व मुल्यांसाठी लढणाऱ्या डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.  महाराष्ट्र राज्य उपमुख्य पर्यवेक्षक फिरोज पिंजारी यांच्या शिफारशीनुसार डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेचे डायरेक्टर दानिश खान यांनी सदर नियुक्ती केली असून पत्रकार अनिल यांच्यावर सोलापूर जिल्ह्यात संघटन बाधणी व संघटनेच्या प्रचार, प्रसाराची जबाबदारी देण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या सूचनांनुसार सोलापूर जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्यासह संस्थेच्या नियमांनुसार गरीब, गरजू लोकांना न्याय देण्याचे काम अनिल पवार करतील आणि सोलापूर जिल्ह्यात संपूर्ण टीमचे पर्यवेक्षण पत्रकार पवार करतील, असे नियुक्ती करतांना डायरेक्टर दानिश खान यांनी सांगितले.  दरम्यान, नवनियुक्त सोलापूर जिल्हाध्यक्ष पत्रकार अनिल पवार म्हणाले की, डीके फाउंडे...

डॉं. शरीफ बागवान यांची डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षपदी नियुक्ती

Image
  डॉं. शरीफ बागवान यांची डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षपदी नियुक्ती मुंबई / मानसी कांबळे :- महाराष्ट्र बागवान वर्कींग कमिटीचे संस्थापक अध्यक्ष, बीव्ही (BV) न्यूज 24 चे मुख्य संपादक व न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान यांची मानवी हक्क, अधिकार व मुल्यांसाठी लढणाऱ्या डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.  महाराष्ट्र राज्य उपमुख्य पर्यवेक्षक फिरोज पिंजारी यांच्या शिफारशीनुसार डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेचे डायरेक्टर दानिश खान यांनी सदर नियुक्ती केली असून डॉं. शरीफ बागवान यांच्यावर उत्तर महाराष्ट्रातील जळगांव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर आदी जिल्ह्यात संघटन बाधणी व संघटनेच्या प्रचार, प्रसाराची जबाबदारी देण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या सूचनांनुसार उत्तर महाराष्ट्र विभागातील रिक्त पदे भरण्यासह संस्थेच्या नियमांनुसार गरीब, गरजू लोकांना न्याय देण्याचे ते काम करतील आणि उत्तर महाराष्ट्रातील संपूर्ण टीमचे...

पत्रकार खलील सुर्वे यांची डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या महाराष्ट्र राज्य मंडळ कोकण अध्यक्ष नियुक्ती

Image
  रायगड / मानसी कांबळे :- साप्ताहीक खालापूर वादळ चे मुख्य संपादक...केपी न्यूज चैनल, दैनिक कोकण प्रजा, दैनिक कोकण प्रदेश न्यूजचे उपसंपादक...न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष निर्भीड पत्रकार खलील सुर्वे यांची मानवी हक्क, अधिकार व मुल्यांसाठी लढणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटना डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या महाराष्ट्र राज्य मंडळ कोकण अध्यक्ष नियुक्ती करण्यात आली.  महाराष्ट्र राज्य उपमुख्य पर्यवेक्षक फिरोज पिंजारी यांच्या शिफारशीनुसार डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेचे डायरेक्टर दानिश खान यांनी सदर नियुक्ती केली असून पत्रकार खलील सुर्वे यांच्यावर महाराष्ट्र राज्यात संघटन बाधणी व संघटनेच्या प्रचार, प्रसाराची जबाबदारी देण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या सूचनांनुसार रायगड जिल्ह्यांमधील रिक्त पदे भरण्यासह संस्थेच्या नियमांनुसार त्या सर्व काम करतील आणि महाराष्ट्रातील संपूर्ण टीमचे पर्यवेक्षण करतील, असे नियुक्ती करतांना डायरेक्टर दानिश खान यांनी सांगितले.  दरम्यान, नवनियुक्त महाराष्ट्र राज्य मंडळ कोकण अध्यक्ष खलील सुर्वे म्हणाले की, डीके फ...

कर्जत रेल्वे पोलिसांची प्रामाणिक कामगिरी

Image
  हरवलेली पिशवी व 21 हजार रुपये प्रवाशाला परत नरेश जाधव / कर्जत: - प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा उत्तम आदर्श घालून देत कर्जत रेल्वे पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी हरवलेली पिशवी व त्यातील 21 हजार रुपये मालकाला सुखरूप परत केले. या कामगिरीबद्दल प्रवाशांनी कर्जत रेल्वे पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले. मिळालेल्या माहितीनुसार, दि. 14 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9.00 ते रात्री 9.00 या वेळेत कर्जत रेल्वे स्टेशनवर दिवसपाळी ड्युटी सुरु असताना CRO मार्फत कळविण्यात आले की, मुंबईहून कर्जतला येणाऱ्या सकाळी 11.55 वाजताच्या लोकलच्या CSMT बाजूच्या चौथ्या जनरल डब्यात एक काळ्या रंगाची प्लास्टिक पिशवी राहिली आहे. त्यानुसार पोलिस शिपाई (ब.क्र. 373) गोरख मासाळ, महिला होमगार्ड मोहिनी जाधव, कल्याणी काळेकर आणि प्रणाली गोळे यांनी तत्काळ गाडी तपासून पिशवी शोधून काढली. पिशवीत महत्त्वाची कागदपत्रे व रोख 21,000 रुपये सापडले. यानंतर ठाणे अंमलदार महिला पोलिस हवालदार (ब.क्र. 2262) सुमित्रा दोंदे यांनी पिशवीतील तपशीलावरून बदलापूर, जिल्हा ठाणे येथील 69 वर्षीय प्रवासी सय्यद जावेद जफर आबीदी (मो. 8369163873) यांच्याशी संप...

खालापूर शहरात तिरंगा यात्रा व पालखी सोहळ्याचे आयोजन...

Image
  खोपोली / खलील सुर्वे :- देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर खालापूर नगरपंचायत यांच्या वतीने दिनांक 14 ऑगस्ट रोजी तिरंगा यात्रा व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी विठू नामाच्या गजरात व भारत मातेच्या जयघोषात खालापूर शहरात वातावरण न्हाऊन निघाले. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 वी जयंती चे औचित्य साधत पालखीचे आयोजन करण्यात आले. विठुरायची पालखी व हातात तिरंगा घेऊन यात्रेची सुरवात स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथून करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांना अभिवादन करून खालापूर शहरात मार्गक्रमण करत खालापूर तहसील कार्यालय येथे यात्रेचा समारोप करण्यात आला. यात्रे दरम्यान विठू नामाच्या गजर व भारत माता की जय, वंदे मातरम् आणि जय हिंदच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. या रॅलीत खालापूर नगराध्यक्षा रोशना मोडवे, सभापती किशोर पवार, नगरसेविका लता लोते, नगरसेविका उज्ज्वला निधी, नगरसेविका सुनीता पाटील, नगरसेवक राजेश पारठे, मुख्याधिकारी कोमल कराळे, नायब तहसीलदार मिलिंद तिऱ्हेकर, पोलिस निरीक्षक सचिन पवार, प्रणित भोसले नगरपंचायत रचना सहाय्यक, जितेंद्र याद...

नारंगी ग्रामपंचायत मध्ये विकास कामांची बोंबा बोंब......

Image
  तरीही सरपंचाला उत्कृष्ट सरपंच म्हणून पुरस्कार..... मिळाला कसा  ?   खालापूर/सुधिर देशमुख:- नारंगी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पंचशील नगर व आदिवासी वाडी येथील नागरिकांनी आज सकाळी गावात जाणारा रस्ता अडवून  बैठा आंदोलन वृध्द ,महिला ,तरुण वर्ग व गावातील रहिवाशी यांनी मिळून नारंगी ग्रामपंचायतिच्या विरोधात घोषणा दिल्या ,पंचशिल नगर भागातील मुख्य रस्ता मंजूर होऊन एक वर्ष व सात महिने झाले अनेक वेळा मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन म्हणून एकवीस नारळ आजपर्यंत फुटले .आजच्या घडीला रस्त्याची अवस्था इतकी खराब आहे पावसाळ्यात चिखल आणि खड्या मुळे रहदारी ही मोठे आव्हान बनली आहे शाळकरी मुले, वृध्द, आणि महिला वर्गाना प्रचंड त्रास होत आहे.तसेच संपूर्ण परिसरात रोड वर लाईट न चालू असल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे अपघात,चोरी, आणि महिलांच्या सुरक्षाचा प्रश्न गंभीर झाला आहे.गावकऱ्यांनी वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.स्थानिक ग्रामस्थांचा विशेष करून महिलांचा उद्रेग दिसून आला.यावेळी प्रशासनाविरोधात बोलताना लोकांनी आपल्या व्यथा मांडल्...

रायगडचा तिरंगा अदिती तटकरेच्या हाती! राज्य सरकारचा भरतशेठना झटका, शिवसेना संतप्त

Image
  रायगडच्या ध्वजारोहणावरून शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने राज्य सरकारचा धक्का, आदिती तटकरेच फडकावणार तिरंगा   खालापुर/सुधीर देशमुख:- रायगडच्या पालकमंत्रिपदावरून पेटलेला शिवसेना विरुद्ध अजित पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद आता स्वातंत्र्यदिनी तिरंगा कोण फडकावणार, या प्रश्नावर येऊन ठेपला होता. अखेर राज्य सरकारच्या एका परिपत्रकाने हा वाद थेट ‘धगधगत्या’ टप्प्यावर पोहोचवला आहे.          15 ऑगस्टच्या ऐतिहासिक दिवशी जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरे यांना देण्यात आला आहे. यामुळे हा मान मिळेल, अशी आतुरतेने वाट पाहणारे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांना जबर धक्का बसला आहे. शिवसेनेतील अनेक नेते व मंत्री “भरतशेठच फडकावतील रायगडचा तिरंगा” असा जाहीर सूर लावून बसले होते. पण, शासनाच्या या निर्णयाने त्यांची स्वप्ने क्षणात चुराडा झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच पालकमंत्रिपदावर स्थगिती दिल्याने, "स्वातंत्र्यदिनी तिरंगा कोण फडकावणार?" या प्रश्नावर संपूर्ण रायगडची नजर होती. मात्र सरकारच्या या परिपत्रकाने तिरंगा तटकरे यांच्या हाती दिला आ...

हाळ खुर्द गावातील पाण्याची टाकी घेतेय अखेरचा श्वास ?

Image
  मुख्य कॉलमला तडे गेल्याने कोसळण्याची भिती?  टाकी कोसळल्यास हाळ वासियांचे होणार हाल ? दुर्घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येणार का ? खोपोली/खलील सुर्वे :- ग्रामपंचायतीच्या काळात रहिवाशांची तहान भागवून जीवनदायिनी ठरलेली पाण्याची टाकी आज मोडकळीस आली असून, शेवटच्या घटका मोजत आहे. टाकीच्या मुख्य कॉलमला तडे गेल्याने टाकीशेजारी राहणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, संबंधित प्रशासन दुर्घटना घडण्याची वाट पाहणार आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अंदाजे २००३ मध्ये हाळ गावातील रहिवाशांची तहान भागविण्यासाठी पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले होते. या टाकीची अंदाजे ५० हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता असल्याचे समजते. मात्र, प्रत्येक वेळी कर्मचारी व स्थानिकांनी तोंडी ग्रामपंचायत व प्रशासकीय अधिकारी यांना वस्तुस्थिती सांगितल्यानंतर सुद्धा टाकी पाडण्याविषयी कुठलीही कारवाई झाली नसून उलट दररोज पाणी भरले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पाण्याच्या टाकीला अंदाजे २२ वर्षाचा कालावधी होऊन गेला असल्याची चर्चा आहे. ऊन व पावसाच्य...

भावी नगरसेवकासाठी सक्षम कार्य व नेतृत्व गुण

Image
  नागरिकांच्या समस्येला धावून जाणारा " शिवसेना ठाकरे गटाचा कट्टर शिवसैनिक " प्रमोद दादा खराडे !   मुद्रे ( खुर्द ) परिसरात विश्वसनीय जनसंपर्क...... कर्जत/प्रतिनिधी :- नागरिकांच्या " समस्येला " धावून जाणारा व " सामाजिक बांधिलकीची " जाणीव ठेवणारा अतिशय नम्र स्वभावाचे , सर्वांचा आदर ठेवणारे कर्जत नगर परिषद हद्दीतील मुद्रे खुर्द येथील " प्रमोद दादा खराडे " लोकप्रतिनिधी होण्यासाठी विश्वसनीय जनसंपर्क व सक्षम गुण असलेला " शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे " पक्षाचे कट्टर " शिवसैनिक " आहेत , हे त्यांच्या आजवरच्या कार्यावरून दिसत आहे.            प्रमोद दादा खराडे हे तरुण पणापासून " शिवसेनेचे " कट्टर शिवसैनिक आहेत. " हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे " यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेच्या " ज्वलंत अग्निकुंडात " त्यांनी झेप घेत २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण करत कट्टर शिवसैनिक म्हणून प्रामाणिकपणे काम करत आहेत.सुरुवातीच्या काळात शिवसैनिक म्हणून नागरिकांच्या अनेक समस्या सोडवण्याची...

सुरक्षेचे बंध आणि स्नेहबंधन; कर्जत पोलीस ठाण्यात रक्षाबंधन

Image
  कर्जत महिला आघाडीचा अनोखा रक्षाबंधन सोहळा कर्जत शहर महिला आघाडी अध्यक्ष सौ. शर्वरी कांबळे यांचा पुढाकार  नरेश जाधव / कर्जत:- आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कर्जत शहराध्यक्ष सौ. शर्वरी संतोष कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. रोजच्या जीवनात पोलीस बांधव आपल्या कुटुंबापासून दूर राहून जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असतात. जेव्हा नागरिक आपापले सण-उत्सव साजरे करतात, तेव्हा हे पोलीस बांधव आपले कर्तव्य पार पाडत असतात. त्यांच्या या निस्वार्थ सेवेसाठी आणि भाव-भगिनीच्या नात्याचा सन्मान राखण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही सौ. शर्वरीताई कांबळे यांच्या पुढाकाराने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भोसले साहेब तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सौ. शर्वरी कांबळे यांनी आपल्या भाषणात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या वेळी पोलीस बांधवांनी प्रत्...