Posts

Showing posts from June, 2025

नको अमली पदार्थांची नशा,आयुष्याची होईल दूर्दशा!

Image
  खोपोली पोलीस ठाणे तर्फे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त खोपोलीतील जनजागरूकता भव्य रॅलीचे आयोजन ... 5 MAH GIRLS BN NCC व जनता विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला रॅलीत सहभागी... खोपोली/प्रतिनिधी:- जागतिक अंमली पदार्थांच्या गैरवापर आणि अवैध तस्करीविरुद्ध दिनाचे औचित्य साधून खोपोली पोलीस ठाणे '5 MAH GIRLS BN NCC MUMBAI-A खोपोली पोलीस स्टेशन च्या PSI पूजा मॅम, महिला दक्षता सदस्य इशिका शेलार व डॉ ठाकूर वानखेडे, कॅप्टन शितल कृष्णा गायकवाड यांच्या मदतीने खोपोली शहरातील जनजागृतीसाठी भव्य रॅली काढण्यात आली व विशेष कार्यशाळा व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीत NCC च्या 40 मुली,तेसच जनता विद्यालय शाळेची 200 मुले,मुली विद्यार्थ्यां, पोलीस, सह सहभागींनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांबाबत मूलभूत माहिती देण्यात आली.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या विरोधात शपथही देण्यात आली.मार्गदर्शनात अंमली पदार्थ म्हणजे काय?, त्याचे प्रकार कोणते?, सेवनामुळे होणारे शरीरावर व मनावर परिणाम, अशी परिस्थिती टाळण्यासाठी घ्या...

सर्वांच्या ह्रदयाच्या देखभालीसाठी आरोग्य सहल

Image
    माधवबाग व सहजसेवा फाउंडेशनचा उपक्रम  खालापुर / मानसी कांबळे :- माधवबाग व सहजसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर सहलीचे 13 जून, शुक्रवार रोजी खालापूर येथील माधवबाग क्लिनिक येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये आरोग्य शिबिरात जवळजवळ 30 महिला-पुरुषांशी सहभाग घेतला होता. निसर्गमय वातावरणात व वृक्षवेलीच्या सानिध्यात यावेळी मोफत शुगर, बीपी, ईसीजी, ट्रेस टेस्ट तसेच ह्रदय विकाराशी निगडीत तपासण्या करण्यात आल्या. यावेळी सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉं. शेखर जांभळे आणि माधवबाग क्लिनिकचे को-ऑर्डिनेटर तुषार पाटील यांनी माधवबाग क्लिनिकविषयी माहिती दिली. माधवबाग हा दवाखाना नसून रुग्णाला अनुकूल वातावरणात आजारांवर लढण्याची शक्ती व सकारात्मक विचार देणारे स्थान आहे.            माधवबाग हे फक्त मधुमेह, रक्तदाब, कॉलेस्टॉलची काळजी नाही करीत तर आपल्याला हृदयाची काळजी करते. संपूर्ण हृदय शुद्धीकरण थेरपी येथे केली जाते. विना शस्त्रकिया, आयुर्वेदिक उपचार, नो साईड इफेक्ट्स, वेदना शुन्य उपचार या ठिकाणी उपलब्ध आहेत. परंतु ज्या सर्वसामान्य लोकांना येथे...