केएमसी एनसीसी कॅडेट राज्यस्तरीय कॅम्पमध्ये अव्वल
कॅप्टन शितल गायकवाड यांच्या मार्गदर्शन, कौशल्य आणि मेहनतीची प्रशंसा खोपोली/मानसी कांबळे : - 5 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन मुंबई ग्रुप A यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कॅम्प व त्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये खोपोली येथील केएमसी (KMC) कॉलेजच्या एनसीसी कॅडेट यांनी कॅप्टन शितल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेत एक मोठे यश मिळवले आहे. या यशाने कॅडेटच्या शिस्तबद्धता, नेतृत्व आणि देशभक्तीच्या भावनांवर प्रकाश पडला आहे. एनसीसी कॅडेटच्या या राज्यस्तरीय कॅम्पमध्ये केएमसी एनसीसी कॅडेटने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दरम्यान, एनसीसी कॅडेटचा राज्यस्तरीय कॅम्पमध्ये प्रथम क्रमांक मिळविणे हे केवळ एक यश नाही, तर ते विद्यार्थ्यांच्या विकासासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे, जे त्यांच्यात शिस्त, नेतृत्व आणि देशभक्तीच्या भावना वाढवते जो एनसीसी (NCC) च्या मुख्य मूल्यांपैकी एक आहे. एनसीसी आत्मविश्वास, शिस्त, जबाबदारी आणि स्वावलंबन यासारखे गुण जोपासते, जे कॅडेटच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, अशी प्रतिक्रिया कॅप्टन शितल गायकवाड यांनी व्...