पावसाळ्यापूर्वी दरडग्रस्त सुभाषनगर परिसर संरक्षित करा !
* भूस्खलनापासून सुभाषनगरच्या बचावासाठी उपाययोजना करण्याची माजी नगरसेवक मंगेश दळवी यांची मागणी खोपोली / मानसी कांबळे :- मे महिना सुरू झाला आहे. मान्सून एका महिन्यांवर येवून ठेपला आहे. पावसाळा जसजसा जवळ येतो, तसतसा सुभाषनगरांचा जीव टांगणीला लागतो. मागील अनेक वर्षापासून मृत्यूला सुभाष नगरकर हुलकावणी देत आहेत, पण यंदा काय होईल ? दरड कोसळेल का ? सुभाषनगरची इर्शाळवाडी, तळई, माळीण होईल का ? असे विविध प्रश्न मनात पिंगा घालत असतात. यंदाही अशीच भिती उद्भवत असून पावसाळ्यापूर्वी दरडग्रस्त सुभाषनगर परिसरात संरक्षण उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. खोपोली नगर परिषदेचे माजी सभापती तथा प्रभाग क्रमांक 1 चे नेते मंगेश दळवी यांनी खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉं. पंकज पाटील यांना या संदर्भात निवेदन दिले असून निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रायगड जिल्ह्यातील खोपोली नगर परिषद हद्दीतील सुभाषनगर वस्ती डोंगराच्या पायथ्याशी वसली आहे. सरासरी 3000 ते 3500 लोकवस्ती असलेल्या या परिसरात दर पावसाळ्यात भितीचे वातावरण असते. खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथील घटनेनंत...